Thursday, October 9, 2025

रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील ‘या’ चार बँकांवर निर्बंध :

वेध माझा ऑनलाईन।
रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांवर कठोर निर्बंध लादले आहेत. या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कर्ज देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ठेवीदारांचा पैसा वेळेवर परत करण्यास बँका असमर्थ ठरल्यामुळे ही मोठी आणि महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्बंधांमुळे प्रभावित झालेल्या बँकांमध्ये जिजामाता महिला सहकारी बँक, सातारा. समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर. समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, धाराशिव आणि द शिरपूर मर्चंट्स सहकारी बँक लिमिटेड, शिरपूर यांचा समावेश आहे.रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि अनियमितता आढळल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि एकूणच बँकिंग प्रणालीमध्ये विश्वासार्हता व स्थिरता राखण्यासाठी घेण्यात आला आहे. संबंधित बँकांना आता पुढील वाटचाल RBI च्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावी लागणार आहे. या कारवाईमुळे सहकारी बँकांच्या कामकाजावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि आर्थिक शिस्त पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

No comments:

Post a Comment