गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शहरातील बैल बाजार परिसरात बीपीसीएल पाईपलाईनच्या कामाला अखेर आज सुरुवात झाली आहे. बीपीसीएल आणि नगरपालिका प्रशासनातील अडथळा दूर झाल्यानंतर पाईपलाईनचे काम सुरू झाले असून, ते पूर्ण होताच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी प्रतिक्रिया त्याठिकाणचे नगरसेवक भाजप नेते शिवाजी पवार यांनी दिली आहे
बैल बाजार रस्त्याच्या विकासासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या कामाची वर्क ऑर्डर युनिटी कन्स्ट्रक्शन या कंपनीला यापूर्वीच देण्यात आली आहे. मात्र, बीपीसीएलची पाईपलाईन चे काम झाल्याशिवाय रस्त्याचे हे काम सुरू करता येणार नाही अशी परिस्थिती आहे
दरम्यान, नगरपालिका प्रशासन आणि बीपीसीएल यांच्यातील हा अडथळा आता दूर झाला आहे. बीपीसीएलकडून सुमारे ९ कोटी ३२ लाख रुपयांची रक्कम यापूर्वीच भरण्यात आली होती. अखेर चार दिवसांपूर्वी वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आज प्रत्यक्ष पाईपलाईनचे काम सुरू झाले.
याबाबत या विभागाचे नगरसेवक तथा भाजपचे नेते पक्षप्रतोद शिवाजी पवार यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना, बीपीसीएलच्या काम झाल्यानंतर येथील रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन वास्के, बीपीसीएलचे अधिकारी तसेच कामगार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment