राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये, पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये नमूद पदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Friday, June 27, 2025
ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा,;
वेध माझा ऑनलाईन
हिंदी सक्ती विरोधाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधुंकडून येत्या ५ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंकडून एकत्रितपणे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला आता शरद पवार यांच्याकडून जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये शरद पवार यांचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. ‘महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी, आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे ह्या मागणीसाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा जाहीर पाठिंबा… सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊयात !’, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगण्यात आलंय.
भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने 40 हून अधिक भाविक गंभीर जखमी
वेध माझा ऑनलाईन
पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने 40 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुरी येथील श्री नहर (राजाचा राजवाडा) जवळ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. चेंगराचेंगरीनंतर अनेक भाविक बेशुद्ध पडले होते. यातील काहींना पुरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रथयात्रेतील ‘पहाडी’ सोहळ्यादरम्यान गजपती दिव्य संघदेवाच्या राजवाड्याजवळ लोकांची गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अडचण येत होती. यात गर्दीदरम्यान भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे भाविकांनी अचानक धावपळ केली, ज्यामुळे काही लोक चेंगरून बेशुद्ध पडले.
Thursday, June 26, 2025
खंडू इंगळे यांची स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र प्रदेश शाखेच्यावतीने सातारा जिल्हा अध्यक्षपदी दैनिक कर्मयोगीचे कार्यकारी संपादक खंडू नागू इंगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली असून राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र दिले असून सदरचे पत्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे यांनी खंडू इंगळे यांना दिले. तसेच त्यांचा येथोचित सत्कार केला.
खंडू इंगळे हे गेल्या २४ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असून २००५ सालापासून दैनिक कर्मयोगीचे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांची पत्रकारिता सातारा जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न, विकासाच्या संधी आणि लोकशाही मूल्यांना चालना देणारी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली संघटना सातारा जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.
या नियुक्तीच्या अनुषंगाने खंडू इंगळे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन बळकट करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी ठोस काम करण्यावर भर राहील. नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करून जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. तसेच, संघटनेच्या शिस्त व तत्वांचे पालन करून पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न राहील, असेही सांगितले.
असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष गोरख तावरे, सचिव संतोष शिंदे, सुलतान फकीर, उद्धव बाबर, प्रमोद तोडकर, शंकर शिंदे, धनंजय सिंहासने, रोहित अहिवळे, शैलेश धुमाळ यांनी खंडू इंगळे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन संघटनेस सहकार्य करण्याचे आवाहन खंडू इंगळे यांनी केले आहे.
कराडच्या वाढीव भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित राजेंद्रसिंह यादव यांची माहिती; दौलत, रेव्हिन्यू कॉलनीत फेज टू कामांचा शुभारंभ ;
कराड शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचा एकही प्रश्न आगामी काळात शिल्लक ठेवणार नाही. पाणी पुरवठा, भुयारी गटार योजनेसह सुमारे १९४ कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केले.
कराड शहर वाढीव भागामध्ये असणारी ड्रेनेज लाईनची समस्या लक्षात घेऊन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी लक्ष घालून दौलत आणि रेव्हीन्यू कॉलनी येथे भुयारी गटार योजनेच्या फेज २ कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, शहराच्या हद्दवाढ भागात घरे अगोदर झाली. नंतर मागणीप्रमाणे मुलभूत सुविधा होत आहेत. मात्र यात एकसुत्रीपणा नसल्याने पाणी पुरवठा व ड्रेनेजच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कराडला ३२५ कोटींचा निधी निधी मंजूर झाला आहे. यात सुमारे दोनशे कोटी हद्दवाढ भागासाठी आहेत. त्यामुळे या भागाचा भविष्यात कायापालट होणार आहे.
हद्दवाढ भागात घनकचरा प्रकल्पाशेजारी अकरा लाख लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाण्याची समस्या संपुष्टात येईल. हद्दवाढ भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार असणार आहेत. २०५६ साली शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना, भुयारी गटार योजनेची कामे होणार आहेत. त्यामुळे या भागात वेगाने नागरीकरण होईल, असेही राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक निशांत ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज इंगवले, विनोद भोसले, अनिस भालदार,प्रवीण पवार, मुसा मुजावर,फैजल बागवान, इस्माईल मुल्ला, कादर नाईकवाडी,टिपू मुल्ला,गाडे सर, कांबळे साहेब,आसिफ शेख,शाहरुख मुल्ला,समीर दिवाण, रियाज मोमीन,अयान शेख, सैफ मुजावर, विक्रम मोहिते,अदनान शेख, व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
Tuesday, June 24, 2025
कोयना धरण पायथा विद्युतगृह जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ; ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद;मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता ;
वेध माझा ऑनलाईन
कोयना धरण पायथा विद्युतगृह या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी या पायथा विद्युतगहाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकूण ८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.
सुधारित मान्यतेमुळे प्रकल्पाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यास परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प धरणाच्या पायथ्याशी उभारला जाऊन डाव्या तीरावर वीजनिर्मिती केली जाणार आहे. कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड सचिव ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदार ला.गिरीश शहा ; 2 जुलै रोजी होणार पदग्रहण समारंभ
लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबच्या सन 2025 - 26 या वर्षासाठी अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सचिवपदी ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदारपदी ला.गिरीश एम. शहा यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ कराड मेन क्लबच्या संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेत ला.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या.
समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल ही संघटना जागतिक पातळीवर काम करत आहे. या संघटनेचा विस्तार 214 देशात असून याची सदस्य संख्या 14 लाखापेक्षा अधिक आहे. लायन्स इंटरनॅशनल संघटनेच्या माध्यमातून गरजूंना अनेक वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संघटनेच्या या कार्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळतो आहे.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत असलेल्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबची वाटचाल सुरू आहे.
कराड मेन क्लबच्या माध्यमातून कराड पाटणसह परिसरात अनेक सामाजिक उपक्रम व वैद्यकीय सेवा पुरवल्या जात आहेत.
लायन्स इंटरनॅशनलच्या रिवाजाप्रमाणे बुधवार दि.2जुलै रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ कराड येथील हॉटेल पंकज येथे होणार आहे. या कार्यक्रमास पदप्रदान अधिकारी म्हणून पुणे प्रांताचे माजी प्रांतपाल MJF ला.राज मुछाल तर शपथ प्रदान अधिकारी फलटणचे MJF ला.मंगेश दोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच रिजन चेअरमन ला.नीलम लोंढे पाटील व झोन चेअरमन ला. वृषाली गायकवाड यांचे सह लायन्स परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा-एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू आहे का ?
वेध माझा ऑनलाइन।
मुंबईतल्या मंत्रालयात आज (24 जून) मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांनी निधीवाटपावरून शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीदेखील आक्रमक पवित्रा धारण केल्याचं बोललं जातंय. अजित पवार यांच्या खात्यावर वॉच ठेवा असं शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे संघर्ष चालू झाला आहे का? असं विचारलं जात आहे
आज मंत्रालयात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांत बैठक पार पडली. या बैठकीत जे आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला मिळालंच पाहिजे, अशी भूमिका घेत शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना अजित पवार यांच्या अर्थखात्यावर नजर ठेवण्याचं सांगितल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता शिवसेनेचा अजित पवार यांच्या अर्थखात्यावर वॉच राहणारा का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडल्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार स्वत: एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतंय? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे
दुसरीकडे या घडामोडीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. याआधीही शिंदे यांचे मंत्री तसेच आमदार यांच्यात आणि अजित पवार यांच्यात निधिवाटपावरून अनेकदा संघर्ष झालेला आहे. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का? असे अजित पवार या आधी म्हणाले होते. भाजपाच्या आमदारांनीही निधीवाटपावरून अजित पवार यांची तक्रार थेट केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाहा यांच्याकडे केली होती. त्यामुळे निधीवाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात संघर्ष चालू आहे, अशी चर्चा रंगली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ;
वेध माझा ऑनलाईन
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या महामार्गास अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक होतील, असे दिसून येते. तसेच, राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णयही या बैठकी घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने घेतलेले निर्णय
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• आदिवासी शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यामध्ये वाढ. दरमहा मिळणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यात दुपटीने वाढ, वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ. (आदिवासी विकास विभाग)
• कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
• महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून, आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणणार. (वित्त विभाग)
• सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार. (वित्त विभाग)
• वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावे लागणारे ३१ कोटी ७५ लाख रुपयांचे शुल्क माफ. याठिकाणचे विस्थापितांचे अनिवासी व निवासी गाळे सार्वजनिक बांधकाम विभागास निशुल्क हस्तांतरीत होणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• पिंपरी - चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मौ. चिखली येथील “दफनभुमी” च्या १ हेक्टर ७५ आर क्षेत्रापैकी ४०% क्षेत्र (७००० चौ.मी.) मैला शुध्दीकरण केंद्रासाठी (STP) वापरण्यास मंजुरी. (नगर विकास विभाग)
• महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या २ हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा, त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय. यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्य पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीचे ८२२ कोटी २२ लाख, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिःसारण प्रकल्पासाठी २६८ कोटी ८४ लाख रुपये व मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीच्या ११६ कोटी २८ लाख रुपयांच्या मागणीचा समावेश. (नगरविकास विभाग)
राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप ;
वेध माझा ऑनलाईन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गेल्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले असा आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे.
यावर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचा दाखला देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले. म्हणजेच लोकसभेनंतर विधानसभेसाठी 8 टक्के मतदार वाढले. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले. काही अनोळखी मतदारांची नोंद करण्यात आली आहे, असा आरोप करत निवडणूक आयोग यावर गप्प का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांचा अजित पवारांवर निशाणा : माळेगाव कारखान्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य ;
वेध माझाऑनलाईन
बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा आहे. बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच माळेगाव कारखान्यावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय? हे आता समोर आलं आहे.
गेल्या ४० वर्षांपासून माळेगाव कारखाना माझ्या विचारांवर चालणारा होता. तर सत्तेतील लोकांनीच कारखान्याची निवडणूक लढवणं योग्य नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये हे मत व्यक्त केलंय. कारण सत्तेत बसलेली व्यक्ती कारखान्यावर असेल तर कारखान्यातील विरोधी गटाने एखादा मुद्दा उपस्थित केला तर कारखान्यातील सत्तेतील लोकं त्यांना न्याय देऊ शकत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार देवदास मुळे यांना जाहीर ;
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली यात 2021 सालचा राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक तरुण भारत संवाद चे कराड कार्यालय प्रमुख देवदास प्रल्हाद मुळे यांना जाहीर झाला आहे.
रोख 51 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हा राज्यस्तरीय आहे. या पुरस्कारासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेतून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे एका वर्षातील लिखाणाचे प्रस्ताव मागवण्यात येतात. या प्रस्तावांमधून एका प्रस्तावाची निवड करण्यात येते. २०२१ या वर्षात कोरोना महामारीचे संकट होते. त्यावेळी स्वच्छता मोहिमेसही महत्व होते. त्या वर्षात स्वच्छता विषयक केलेल्या लिखाणाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
देवदास मुळे यांनी २०१८ सालापासून कराड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उपक्रमांना प्रसिद्धी देऊन कराडकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे. कराड नगरपालिकेच्या अभ्यास दौऱ्यातून देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर इंदूर (मध्य प्रदेश), अंबिकापूर (छत्तीसगड) लोणावळा आदी शहरांना भेटी देऊन त्याविषयी लिखाण केले आहे. कराड नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी पालिका प्रशासनाला मदत केली आहे.
कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे, रमाकांत डाके, तत्कालीन आरोग्य समिती सभापती विजय वाटेगावकर, तत्कालीन नगर अभियंता एम. एच. पाटील, ए. आर. पवार, रफिक भालदार यांचे मार्गदर्शन लाभले. तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमूख दीपक प्रभावळकर, जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, डेस्क इन्चार्ज राजेंद्र वारागडे, सुरेश दळवी, उपसंपादक प्रदीप कुंभार, मिलिंद पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोक चव्हाण, गोरख तावरे, शशिकांत पाटील, सतीश मोरे, सचिन शिंदे, प्रमोद सुकरे, सचिन देशमुख, हेमंत पवार, सुरेश डुबल यांचेही सहकार्य लाभले.
Monday, June 23, 2025
अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांची उपस्थिती : पवारांचं नेमकं चाललंय काय?राज्यात चर्चा;
वेध माझा ऑनलाईन।
अजित पवार गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्या उरळी कांचनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे दादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात ताईंनी उपस्थिती दर्शवल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेल्या काही सूचक विधानांनी या चर्चांना आणखी बळ मिळालं होतं. तर शरद पवार यांनी लबाड्या करणाऱ्यांना सोबत घेणार नाही अस म्हणत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात हजर राहिल्याने पवारांचं नेमकं चाललंय काय ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा दणका बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील तीन्ही घटक पक्षांचे मिळून राज्यात 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे.
संजय राऊत आणि दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत बड्या नेत्याने शिवसेना सोडली-
वेध माझा ऑनलाईन
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लाखे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. 14 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती. मात्र ती तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही, संजय राऊतांनी सांगलीत संजय पाटलांशी समझोता केला, त्यामुळे सांगतील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.अंबादास दानवेंनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली, असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू;
वेध माझा ऑनलाईन
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या स्वागत करायला आलेल्या गर्दीत एका 70 वर्षीय वृद्धाचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी सत्तेनपल्ली येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, त्यांच्या कारच्या ताफ्यासमोरच कार्यकर्त्यांनी धाव घेतल्याने सुरक्षा यंत्रणेला देखील ही गर्दी नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे, जगमोहन रेड्डी ज्या कारमधून तिथं पोहोचले, त्याच कारच्या चाकाखाली एका 53 वर्षीय व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला आहे. चिल्ली सिंगा असं मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.
कराड-चिपळूण महामार्ग उद्यापासून बंद राहणार :
वेध माझा ऑनलाईन।
गुहागर-विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ ई वर रुंदीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यानच, सहा दिवसापूर्वी दि. १६ जूनला जोरदार पावसात या मार्गावरील पर्यायी रस्ताच वाहून गेला होता. यानंतर मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून दि. १७ जुन रोजी हलक्या वाहनांना खुला करण्यात आला होता. मात्र, कराड- चिपळूण मार्गावर दि. २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवण्यात येणार आहे. आता या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.
संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड- चिपळूण मार्गावर दि. २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच राहणार आहे. केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. अवजड वाहतुकीसाठी मार्गामध्ये बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसानी केले आहे.
शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलेल्या आमदाराची निष्ठा एकनाथ शिंदे आणि अजितदादांशी...!
वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होऊन केवळ 8 महिने उलटले आहेत. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला जवळपास 230 जागा मिळाल्या, तर विरोधकांना फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे बडे नेते देखील पराभूत झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा निवडून आल्या आहेत. त्यातही शरद पवारांना केवळ सोलापूर जिल्ह्यानेच साथ दिल्याचं पाहायला मिळालंय. शरद पवारांचे 10 पैकी 4 आमदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यातीलच सोलापुरातील मोहोळचे आमदार राजू खरे हे आहेत...
राजू खरे 8 महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या पक्षातून निवडून आले. मात्र, राजू खरे हे शरद पवारांचा पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक साधताना दिसले आहेत.
राजू खरे हे सोलापुरातील मोहोळचे आमदार आहेत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांतच "मी नावालाच तुतारीवाला आहे, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली", असं वक्तव्य राजू खरे यांनी केलं. इतकंच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंच्या अनेक कार्यक्रमात राजू खरे यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. एवढचं नाही तर मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाचा मूहुर्त देखील काढला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजू खरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असं भरत गोगावले म्हणाले होते. आता राजू खरे यांनी वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली आहे. यामध्ये राजू खरे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. यापूर्वी देखील राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी स्थानिक दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या होत्या. राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले होते.
शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, ; शिवसेनेचे नेते मंत्रीवगुलाबराव पाटील यांचा खळबळजनक दावा : राजकारणात खळबळ :
वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या 3 वर्षात दोन्ही शिवसेना पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत निवडणुकांनाही ते सामोर गेले आहेत. आधी लोकसभा, नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही तसाच सामना रंगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
कराड इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी आदिती पावसकर, सचिव पदी श्रावणी घळसासी
वेध माझा ऑनलाइन।
इनरव्हील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था आहे. या संस्थेला यावर्षी 101 वर्ष पूर्ण होत आहेत. इनरव्हील क्लब ऑफ कराड ही या संस्थेचा एक भाग आहे.इनरव्हील क्लब ऑफ कराडला यावर्षी 36 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 करिता इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी आदिती पावसकर तर सचिव पदी श्रावणी घळसासी यांची निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारी मंडळ ही नियुक्त करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष ऋता चाफेकर ,आयपीपी नम्रता कंटक, खजिनदार सीमा पाटील, आयएसओ राजश्री रामदुर्गकर, संपादक वैष्णवी कुंभार ,सीसी निता सपकाळ यांची निवड करण्यात आली .तर चार्टर् प्रेसिडेंट रेखा काशीद ,लक्ष्मी सिकची ,अलका गोखले ,शितल शहा, पद्मजा इंगळे यांची एक्झिक्यूटिव्ह सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .सन 2025-26 करिता इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पुण्याच्या आशा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्लब मधील सर्व सभासदांच्या सहकार्याने वृक्षारोपण ,महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य तसेच शैक्षणिक संवर्धन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा अध्यक्ष आदिती पावसकर व सचिव श्रावणी घळसासी आणि त्यांचे कार्यकारी मंडळ यांचा मानस आहे.
इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या सामाजिक कार्याच्या वाटचालीत कराड शहरातील व पंचक्रोशीतील अनेकांचे सहकार्य मिळते ते यापुढेही मिळेल अशी खात्री इनरव्हील क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
वेध- माझाच्या प्रश्नावर...राजू शेट्टींचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना टोला... म्हणाले "ते' घाबरणार नसतील तर आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी होतील ;
सध्या मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुराचा धोका भविष्यात दिसून येत आहे म्हणूनच अल्लमट्टी धरणाचा धोका सांगली, कोल्हापूरच्या सामान्य जनतेला भविष्यात होऊ नये म्हणून त्याबद्दलचा योग्य तो तोडगा राज्य सरकारने काढायचा आहे...
15 ऑगस्ट नंतर त्याठिकाणी पाणी अडवले तरी चालेल... मात्र जुलै महिन्यात होणारा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यापूर्वी पाणी अडवू नये... अशी आमची या प्रश्नावर मुख्य मागणी आहे...याविषयी माझी प्राथमिक बोलणी राज्य शासनाबरोबर झाली आहेत त्याबाबत आवश्यक त्या आणखी काही मागण्याबाबत आम्ही आग्रही आहोत... जर आमच्या या भूमिकेकडे शासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत... असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला
त्याच विषयाचा धागा पकडत, सांगली जिल्ह्यातील शासनाच्या विरोधातील इतर राजकीय नेत्यांना तुम्ही बरोबर घेणार का... या वेध माझाच्या प्रश्नाचे उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले जे कोणी आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊ पण सरकारला ते नेते घाबरले नाही पाहिजेत...
हा तुमचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत आहे का असे विचारले असता राजू शेट्टी म्हणाले ते तुम्हीच ठरवा...मी कोणाचे नाव घेतले नाही ...तुम्ही काय काढायचा तो अर्थ काढा...अस म्हणत हा टोला त्यांनी जयंत पाटील यांनाच लगावल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष पत्रकारांना सुचवले...
दरम्यान राजू शेट्टी यांनी यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तर अलमट्टी धरणाचा सांगली जिल्ह्याला धोका होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात असे सांगत त्यापैकी काही उपाययोजना त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सुचवल्या...
याबाबत राज्य शासनाशी प्राथमिक चर्चा केली आहे, पण कर्नाटक सरकारशी चर्चा झाली नाही असेही ते म्हणाले...
Saturday, June 21, 2025
मलकापरचे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे भाजप किंवा सेनेत जाणार का?...वेध माझ्याच्या प्रश्नावर मनोहर भाऊ झाले निरुत्तर... हाताने खूण करून म्हणाले...इथंच आहे...वेध माझाने विचारले...इथे म्हणजे आतातरी इथे... उद्या कुठे माहीत नाही असा अर्थ घ्यायचा का? भाऊ काय म्हणाले...
सातारा जिल्ह्यात काँग्रेस ची काहीप्रमाणात पडझड झाली आहे याची कबुली देत यापुढे जिल्ह्यात काँग्रेस बळकट करणार असल्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रणजित देशमुख यांनी सांगितले
दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे भाजप किंवा शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना रणजित देशमुख म्हणाले ते कुठेही जाणार नाहीत...ते काँग्रेसमध्ये च राहणार आहेत...अफवांवर विश्वास ठेवू नका...
याबाबत मनोहर शिंदेंना वेध माझाने प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही...यावरून ते आता काही दिवसच काँग्रेसमध्ये दिसतील अशी चर्चा सुरू झाली आहे... यावेळी मनोहर शिंदे यांना वेध माझाचे पत्रकार म्हणाले, भाऊ तुम्ही बोला की, त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले पण ठामपणे आपण काँग्रेसमध्येच राहणार असे सांगितले नाही...त्यांनी फक्त हातानी खूण करून इथेच आहे...असे सांगितले त्यानंतर वेध माझाने विचारले... इथे म्हणजे आतातरी इथे आहे... उद्या कुठे हे माहीत नाही असा अर्थ घ्यायचा का? त्यावेळी भाऊंनी मौन बाळगून वेळ मारून नेली
दरम्यान यावेळी रणजित देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यानंतर आज त्यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली
ते म्हणाले सातारा जिल्हा कोग्रेसचा बालेकिल्ला होता तेच दिवस पुन्हा काँग्रेसला आणण्यासाठी जिल्ह्यात पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत करणार आहे
जिल्ह्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस पक्षचिन्हावर लढणार असून महाआघाडी करण्यासाठी आवश्यक तेथे चर्चा करून निर्णय घेणार आहोत
दरम्यान तालुक्यात मनोहर शिंदे हे भाजप-किंवा सेनेत जाणार अशी चर्चा सुरू आहे त्याबाबत मनोहर शिंदे यांनी कोणतेच उत्तर दिले नाही...मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही...मी काँग्रेसमध्येच राहणार...असेही ठामपणे ते म्हणाले नाहीत...आणि भाजप किंवा सेनेत जाणार असेही त्यांनी म्हटलेले नाही...शेवटी रणजित देशमुख यांनी ते कुठेही जाणार नाहीत असे म्हणत या प्रश्नाचे उत्तर दिले
दरम्यान मनोहर शिंदे यांना वेध माझाचे पत्रकार म्हणाले, भाऊ तुम्ही बोला... त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले पण ठामपणे आपण काँग्रेसमध्येच राहणार असे सांगितले नाही...त्यांनी फक्त हातानी खूण करून इथेच आहे...असे सांगितले त्यानंतर वेध माझाने विचारले... इथे म्हणजे आतातरी इथे आहे उद्या कुठे हे माहीत नाही... असा अर्थ घ्यायचा का? त्यावेळी भाऊंनी मौन बाळगून वेळ मारून नेली पण उत्तर दिले नाहीच...
त्यामुळे मनोहर शिंदे यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे...
Friday, June 20, 2025
माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीवर नियुक्ती /
वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असलेल्या उच्चाधिकार समितीची राज्य सरकारने पुनर्रचना केली आहे. त्या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्यांचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (१९ जून) रोजी जारी केला.
या समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, आ. जयंत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. रोहित आर पाटील, आ. राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्षनेता, विधानपरिषद विरोधी पक्षनेता, माजी मंत्री प्रकाश आवाडे अशा १८ सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कराडच्या विमानतळाचा आढावा ; दिल्या सूचना /
वेध माझा ऑनलाईन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उच्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाची स्थिती तसेच कराड विमानतळासह कोल्हापूर, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांसाठी भूसंपादन स्थितीबाबत व नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड (पूर्व, पश्चिम आणि विस्तार), भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गाचा आढावा घेतला.
यावेळी “राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे तातडीने भूसंपादन करा, कोणतेही प्रकल्प हे लांबणीवर पडू नये यावर भर द्या, भूसंपादनाची कामे निर्धारित वेळेनुसार पूर्ण करा,” असे महत्वाचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले ...कोणत्याही प्रकल्पाला विलंब होऊ नये. याची सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. प्रकल्प विलंबनामुळे प्रकल्पाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्व विभागांना विशिष्ट वेळापत्रके देण्यात आली आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत म्हंटले. अधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याच्या आणि भूसंपादन तातडीने, गांभीर्याने आणि कार्यक्षमतेने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच या प्रकल्पासाठी वित्त विभागाकडे निधी देण्याची शिफारस देखील केली
कोयना धरणात पाणीसाठा किती झाला आहे?
वेध माझा ऑनलाइन।
आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने कमी हजेरी लावली. दरम्यान, कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 33.56 TMC इतका पाणीसाठा झाला आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून आठवडाभरात धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले.
उद्धव ठाकरेंनी विधानसभेत 20 ऐवजी 60 जागा आल्या असत्या तर आमच्याशी युती करण्याचा विचार केला असता का? मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल /
वेध माझा ऑनलाईन।
मनसेची स्थापना होऊन 19 वर्षे झाली, पण या आधी आमच्याशी कधीही युतीचं सूचलं नाही. मग आताच का उत्साह वाढलाय? असा प्रश्न मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. विधानसभेत जर 20 ऐवजी 60 जागा आल्या असत्या तर आमच्याशी युती करण्याचा विचार तरी केला असता का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था आता बिकट आहे म्हणून त्यांना युतीचं सूचलं असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे जाहीर संकेत दिले. त्यानंतर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाशी संभाव्य युतीवरून उद्धव ठाकरेंना कठोर सवाल विचारले आहेत.
मनसेसोबत जायचं का असं उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत. त्यावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली. या आधी कधी विचारले का शरद पवारांसोबत जाऊ का? काँग्रेससोबत जाऊ का? तेव्हा बैठका घेतल्या का आमदारांच्या बैठका?
तुमच्या पक्षावर वाईट वेळ आली आहे मान्य आहे. पक्ष वाचविण्यासाठी हे सर्व करत आहात. पण युतीसाठी आमच्यावर दबाव टाकू नका. या युतीसाठी दोन वर्षांपूर्वी उत्साह का दाखवला नाही. आम्ही दोन वेळा युतीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावेळी शिवसैनिकांनी उत्साह का दाखवला नाही. या आधीही मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावेत असे बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी युतीसाठी पुढे का आला नाही? आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक;
वेध माझा ऑनलाईन।
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक घेतली. राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. जर युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी द्यायचा आहे
दरम्यान मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल.
Wednesday, June 18, 2025
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईत फायदाच होईल ; मुंबईत या युतीला अनुकूल वातावरण ; उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची कबुली ;
वेध माझा ऑनलाईन
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना व मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिल्याने दोन्ही बाजुने कार्यकर्ते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. माजी नगरसेवकांसोबत आज झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, मनसेसोबत युती करायची का नाही याबाबतही उद्धव ठाकरेंनी विचारणा केली असून, युती केली तर फायदाच होईल, अशी कबुली नगरसेवकांनी दिल्याचे समजते. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचेही माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी बोलताना म्हटले. त्यामुळे, पुढील काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का ते पाहायचे आहे
अनाथ मुलांना दप्तर, वह्या, युनिफॉर्मचे वाटप - श्री व सौ संदीप पवार या दाम्पत्याची दानत मोठी ; सर्वत्र होतय कौतुक ;
कराडची आस्था सामाजिक संस्था ही दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू मुलांना करत असते..यावर्षीदेखील नगरपालिकेच्या शाळेमध्ये दप्तराचं वाटप करण्यात आले.. महिला मर्चंट च्या चेअरमन सौ कविता संदीप पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले.. समाजकार्याचा वसा आणि वारसा चालवणारे संदीपदादा पवार आणि सौ. कविताताई पवार या दोघांचे समाजकार्य खूप महान आहे.. समाजासाठी द्यायची पण दानत असावी लागते आणि ती आज या दांपत्याकडे आहे..
सौ कविता पवार यांनी शिक्षक हे गुरु आहेत आणि मुलांना घडवण्याचे काम ते करत असतात..आणि इथून पुढे शाळेला काही मदत लागल्यास आम्ही नक्की करू असे आश्वासन दिले. मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय शिक्षणाचे साहित्य बऱ्याच संस्था वाटप करत असते. आज आईवडील नसलेली 35 मुलामुलींना दफ्तर वाटण्यात आले..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटले..लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतात आणि त्यांना आकार द्यायचं काम शिक्षक करत असतात..आज शाळेकडून छोट्या मुलींना ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले.. लक्ष्मीचे पावले कागदावरती उमटवून त्याची पूजा करून मुलींना लक्ष्मीचा मान दिला..शालेय पुस्तके वाटण्यात आली.. तसेच शेंगदाण्याची चिक्की खाऊ म्हणून वाटण्यात आली..कराड नगरपालिका शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थींना लागेल ते सहकार्य करण्यास त्या तत्पर असतात.
कविताताई म्हणाल्या, सामाजिक कार्य करताना आमच्या हातून जे घडतेय ते अनेकांच्या जगण्यात आनंद निर्माण करते. कै. समीर पवार हे आमच्या कुटूंबातील प्रत्येकाच्या मनातील भावनिक नाव आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जे करत आहोत ते यापुढेही करत राहू.
सुनीता पवार यांनीही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नात्याचं कौतुक केले..मुख्याध्यापक संकपाळ सर यांनी आभार मानले.. अंगणवाडी शिक्षिका सौ सुचिता सोनावणे, अश्विनी भोसले,अविनाश भोसले सर, आलेकरी सर, आणि पूर्ण स्टाफ यांचे सहकार्य लाभले..
एसटी बँकचे 18 पैकी 12 संचालक आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार ; गुणरत्न सदावर्ते याना शह देण्याचा प्रयत्न , भाजप शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता !
वेध माझा ऑनलाईन।
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना शह देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून होतोय का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण एसटी बँकचे 12 संचालक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 18 पैकी 12 संचालक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे चर्चेनं शिंदे गटानं ऑपरेशन लोटस राबवत एकप्रकारे गुणरत्न सदावर्तेंना झटका दिल्याचे बोललं जात आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना मोठा दणका दिला असून एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे संचालक फोडाफोडीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची शक्यता ही वर्तवली जात आहे. गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता लक्षात घेता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंचा राज्यातील शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध ; म्हणाले ... मोदी-शाह यांच्या राज्यात हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रात का?
वेध माझा ऑनलाईन।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.
लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. हे मराठी संपवून टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू… सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का? असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत
शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल, असा अध्यादेश समोर आणला. अशातच हिंदी भाषा सक्तीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर भाष्य केलं. तसेच, यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारला हिंदी भाषेबाबत लिहिलेली दोन पत्र वाचून दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मी एकाच विषयावर बोलेल जो अत्यंत महत्तवाचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारनं शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली आहे. 17 तारखेला मी पत्र लिहलं होतं. शैक्षणिक धोरणाविषयी आजची पत्रकार परिषद घेत आहे. हिंदी भाषेबाबत राज्य सरकारला 2 पत्र लिहली आहेत.
राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले...
आजची तातडीने पत्रकार परिषद बोलवली कारण राज्याचे शिक्षण धोरण हा आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे पहिली पासून हिंदी सक्तीची करणे. मी दोन पत्र काढली आहेत. उजळणी म्हणून पुन्हा ते पत्र वाचत आहे. १७ एप्रिलचं पहिलं पत्र… हिंदी सक्ती महाराष्ट्र निर्माण सेना खपवून घेणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. आम्ही पहिलीपासून का शिकायची?
हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे.
जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू. आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का?
गुजरात सरकारचा जीआर आहे पहिलीपासून गुजराती, गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही.
महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू भगिनी शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. हे मराठी संपवून टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू… सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?
ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; त्या नेत्यावर अगोदर भाजपकडून गंभीर आरोप ,प्रवेश केल्यानंतर भाजपकडून त्या नेत्याला क्लीन चिट ??
वेध माझा ऑनलाईन।
ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून सुधाकर बडगुजर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. सलीम कुत्ता याच्यासोबतचे सुधाकर बडगुजर यांचे कनेक्शन देखील भाजपने समोर आणले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पनाच नव्हती. मात्र चंद्रशेखर बावनकुळे ऐनवेळी सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला हजर झाले. त्यामुळे काल दिवसभर सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात गाजला. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की, त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणे यांनी रिलीज केला होता. पण, त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की, जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर चौकशीअंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ते शिवसेनेत असताना ते तेव्हा या पक्षात आले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याविरुद्धचे उमेदवार ते होते. शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली.शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेली आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचे स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की, त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागले पाहिजे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांना क्लीन चीट दिली आहे.
Monday, June 16, 2025
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार ; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ४.७० कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड दक्षिणमधील ११ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ११ गावांमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यासाठी, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे ४ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीतून कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर व कसे वस्तीमध्ये सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करणे (४५ लाख), चचेगाव येथील सिद्धार्थनगर, संत रोहिदास नगर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर (५० लाख), गोटे (३० लाख), गोळेश्वर येथील गणेश नगर, थोरात वस्ती, दुपटे वस्ती, झिमरे वस्ती व झिमरे-साळुंखे वस्ती (६५ लाख), गोवारे (३५ लाख), घोणशी येथील जय मल्हार कॉलनी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (२० लाख), कार्वे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर, संत रोहिदास नगर (५५ लाख), वारुंजी येथील लक्ष्मी वॉर्ड, जिजामाता नगर व सिद्धनाथ कॉलनी (५० लाख), विंग येथील समता नगर, संत रोहिदास नगर व पंचशील नगर (४५ लाख), ओंड (२५ लाख), वहागाव येथील पंचशील नगर, जय मल्हार नगर, संत रोहिदास नगर, अहिल्यानगर (५० लाख) येथे सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी केली जाणार आहे.
याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून, या विकासकामांसाठी तातडीने आराखडा सादर करुन, निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या मूलभूत सोयीसुविधांचे काम मार्गी लागून, कराड दक्षिणमधील ११ गावांमधील विविध अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहती हायमास्ट दिव्यांनी उजळणार आहेत. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
Sunday, June 15, 2025
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मोठा गौप्यस्फोट ; ...म्हणाले...आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. ..महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते,...
वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी ही झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मविआतील काही आमदार एअरपोर्टला गेले होते, त्यांना घेऊन आले होते, असा दावा त्यांनी केलाय.
बाळासाहेबांनी कोणतेही पद घेतले नाही, ते देखील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्यावेळी पद घेऊ शकले असते. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव साहेब हे पद घेणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी पद स्वीकारले, त्यासोबतच आदित्य ठाकरेंना देखील मंत्रिपद दिले. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. स्त्री हट्टापुढे उद्धव ठाकरे काय करणार, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर केंद्रात आता श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिले असते, आम्ही देखील बोललो द्या. पण, त्यांनी तसे केले नाही, असे देखील गोगावले यांनी स्पष्ट केले.
मालवणमधील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली ; पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाडही पडले! ; चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट झाल्याचं स्पष्ट
वेध माझा ऑनलाइन।
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. त्या ठिकाणची जमीन खचल्याने मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपला साथ देणार ? गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांची घेतली भेट.
वेध माझा ऑनलाइन
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यामुळे अरुण गवळींचा पक्ष महापालिका निवडणुकीत भाजपची साथ देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गीता गवळी या अरुण गवळीची कन्या असून त्या 2017 ला मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा भाजपला दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीला गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाने त्यांना तिकीट न दिल्याने गीता गवळी निवडणूक लढल्या नाहीत.
भाजपच्या एका आमदाराच्या निवासस्थानावर शेतकऱ्याचा पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न ;
वेध माझा ऑनलाइन
राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण चांगलेच तापले असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानावर एका शेतकऱ्याने पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेवर प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील विशाल मुरुड या शेतकऱ्याने हातात पेट्रोलचा कॅन घेऊन कुटे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो ओरडत होता की, "माझ्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मी आमदारांचा बंगला पेटवतो."
यावेळी आ. कुटे यांच्या स्वीय सहाय्यकाने तत्काळ हस्तक्षेप करून मुरुड याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी BNS 333 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारकडून मदतीचा मोबदला वेळेत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे, आणि याचेच परिणाम म्हणून लोक आता थेट
लोकप्रतिनिधींवर तुटून पडताना दिसत आहेत.
संजय कुटे हे 2004 पासून सलग विधानसभेवर निवडून येत असून, भाजपचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. या घटनेनंतर जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
पत्नीनेच केली पतीची कुऱ्हाडीने हत्या ; मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन केला...
वेध माझा ऑनलाइन
पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पतीचा मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा येथे उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. यशवंत मोहन ठाकरे असे या मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे. तिने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत ठाकरे हे 14 एप्रिल 2025 पासून घरातून बेपत्ता होते. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडिलांनी पत्नी प्रभा ठाकरे हिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी यशवंत हे गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे पत्नीने आई-वडिलांना सांगितले. मात्र, पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढली.
यानंतर त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराची ओसरी खड्डा करून शेण आणि मातीने सारवलेला कुटुंबियांना दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी महसूल विभागासमवेत पंचनामा करीत घरातील ओसरीवरील खड्डा खोदला. मात्र तिथे मृतदेह आढळून आला नाही. प्रभाने तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आणि ती काही झालेच नाही, अशी वावरत होती. लहान भावाच्या पत्नीला संशय आला अन्...दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने मांडीखाली लपवली. त्यामुळे उत्तमच्या पत्नीला संशय आला आणि तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्याजवळ कुजलेला वास येत होता. तसेच शोषखड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्यातील माती उकरुन पहिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून कुजलेल्या अवस्थेतील यशवंतचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला असता आपणच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली दिली.
तळेगाव दाभाडे जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला ; 25 जण वाहून गेल्याची भीती ;
वेध माझा ऑनलाइन
मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Friday, June 13, 2025
गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात कराडच्या सोमवार पेठेतील ढवळीकर कुटुंबातील मुलगी व जावयाचा दुर्दैवी मृत्यू ; सर्वत्र हळहळ व्यक्त ;
लंडनला जाणाऱ्या विमानाला गुरुवारी गुजरातमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण देश या बातमीने हादरून गेला या अपघातात कराडच्या सोमवार पेठेतील ढवळीकर कुटुंबातील एक विवाहिता व तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी विमानात एकूण मिळून 242 जण प्रवासी होते. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विमानामधील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह देखील ओळखता येत नव्हते. परंतु, इतक्या भीषण अपघातामधून रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी बचावला गेला आहे
दरम्यान कराडमधील सोमवार पेठेतील प्रकाश ढवळीकर यांची कन्या कल्याणी व त्यांचा जावई गौरव या दोघांचाही या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे दाम्पत्य कम्पनी कामानिमित्त लंडनला निघाले होते
कल्याणी ही लंडनला काही वर्षांपूर्वी शिक्षण घेत होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह गुजरात अहमदाबाद येथील गौरव ब्रम्हभट याच्याशी झाला या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत
कल्याणीचा पती गौरव हा लंडनमधील एका कंपनीचा ब्रँड आंबेसेडर म्हणून कार्यरत होता दरम्यान हे दोघेही लंडनला गौरव काम करत असलेल्या कम्पनीच्या कॉन्फरन्ससाठी सदर विमानाने लंडनला जाण्यासाठी चालले होते दरम्यान त्यांचा या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला
सुरुवातीला हे दोघेही जखमी झाले आहेत असे प्रथमदर्शनी सांगण्यात आले त्यानंतर कराडमधून ढवळीकर कुटुंबीय गुजरातला रवाना झाले त्यावेळी मृतांच्या जाहीर केलेल्या नावांच्या लिस्टमध्ये त्यांची मुलगी व जावई यांच्या नावांचा उल्लेख केला गेला त्यादरम्यान या उभयतांचे मृतदेह ताब्यात दिले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही
कर्जबाजारीपणमुळेा युवा शेतकऱ्याची आत्महत्या ; तरुण मुलाच्या आत्महत्येच्या धक्याने वडिलांचा मृत्यू ; आईलाही हृदयविकाराचा झटका ; संपूर्ण गावात शोककळा ; कुठे घडली घटना?
वेध माझा ऑनलाइन
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. मात्र, तरुण मुलाच्या आत्महत्येच्या धक्याने वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यातच आईलाही हृदयविकाराचा झटका आल्याचा ह्रदयद्रावक प्रकार घडल्याने गावात शोककळा पसरली आहे. अवघ्या 27 वर्षाच्या युवा शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला, आर्थिक संकटाला कंटाळून मृत्युला कवटाळले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पीडित कुटुंबीयांना आधार देत पुढाकार घेतला आहे. मात्र, ग्रामस्थ करुन करुन काय करणार आहेत, आता शासनानेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देऊ करावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
लॉजवर नेऊन प्रियेसीचा केला खून ; कोल्हापुरातील घटना;
वेध माझा ऑनलाइन
लॉजवर गेल्यानंतर प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला आणि या वादातून प्रियकराने प्रियसीला क्रूरपणे संपवल्याची घटना कोल्हापुरात घडलीये. सांगली कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर प्रियकराने प्रेयसी महिलेचा निर्घृणपणे खून केलाय. सुमन सुरेश सरगर असे मृत महिलेचे नाव असून आदमगौस पठाण असं संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, सांगली कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर महिलेचा खून झालाय. प्रियकराने प्रियसी महिलेचा हातोड्याचे घाव घालून निर्घृणपणे खून केलाय. सुमन सुरेश सरगर खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून आदमगौस पठाण आरोपी प्रियकराचं नाव आहे. प्रियकर पठाण आणि सुमन हे रुकडे येथील सागरिका लॉजवर गेले होते. मात्र, यावेळी प्रियकर पठाण आणि सुमन सरगर यांच्यात आर्थिक वाद झाला आणि त्यातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
पठाणने यापूर्वी बायकोचाही केला होता खून
दरम्यान, प्रेयसीची हत्या करणाऱ्या पठाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. लॉजवर नेऊन प्रेयसीला संपवणाऱ्या पठाणने यापूर्वी स्वत:च्या पत्नीची देखील क्रूरपणे हत्या केली होती. दरम्यान, आता त्याने आर्थिक वादातून प्रेयसी सुमन सुरेश सरगर हिला देखील क्रूरपणे संपवलं आहे.
विमान अपघातामधून बचावलेले एकमेव प्रवासी रमेश विश्वासकुमार हे स्वतः चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले.; त्यांनी सांगितले नेमके काय घडले...
वेध माझा ऑनलाइन।
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी विमानात प्रवाशी आणि क्रू मेंबर्स मिळून 242 जण होते. हे विमान मेघानी नगर परिसरात
कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विमानामधील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह देखील ओळखता येत नव्हते. परंतु, इतक्या भीषण अपघातामधून रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी बचावला. रमेश विश्वासकुमार यांना दुखापत झाली असली तरी ते अगदी चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी विमान अपघातावेळी नेमके काय घडले, याची माहिती दिली.
रमेश विश्वासकुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भावासोबत भारतात आले होते. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर मी उठलो तेव्हा माझ्या आजुबाजूला मृतदेह पडले होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. माझ्या अवतीभवती सगळीकडे विमानाचे तुकडे पसरले होते. त्यानंतर काही लोकांनी मला धरले आणि रुग्णालयात आणले, असे रमेश विश्वासकुमार यांनी सांगितले.
या भीषण दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. मात्र, एकटे रमेश विश्वासकुमार कसे वाचले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रमेश विश्वासकुमार यांनी विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उडी मारली की शेवटपर्यंत विमानातच बसून होते, याविषयी नेमकी खातरजमा होऊ शकलेली नाही. मात्र, रमेश विश्वासकुमार हे विमानातील 11ए या आसनावर बसले होते. त्यांचा भाऊ अजय विमानात वेगळ्या रांगेत बसला होता. रमेश विश्वासकुमार हे विमानातील इमर्जन्सी एक्झिटजवळ बसेल होते. त्यामुळे अपघात होतोय असे वाटताच ते या इमर्जन्सी दरवाजातून रमेश विश्वासकुमार यांनी उडी टाकली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. रमेश विश्वासकुमारने यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर तपास यंत्रणांना त्याच्याकडून माहिती घेऊन हा विमान अपघात नेमका कसा झाला, हे कळण्यास मदत होऊ शकते.
Thursday, June 12, 2025
विमान अपघात: एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक
वेध माझा ऑनलाइन
गुजरातच्या अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली आहे. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सर्वच प्रवासी मृत्युमुख पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. तर, जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला.
आज मुंबईमध्ये घडली राजकीय घडामोड ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेशी पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट ;
वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत राजकारणामध्ये एकत्र येण्यासाठी काहीच अडचण नसल्याचे वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता दुभंगलेली शिवसेना यांच्यामध्ये युतीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी चर्चा गेल्या 18 वर्षांपासून होत आहे, त्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर पकडला होता. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखतीमध्ये संकेत दिल्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तेव्हापासून दोनवेळा याबाबत जाहीरपणे भाष्य केलं आणि नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यामध्ये ते म्हणाले की, आता थेट बातमीच देऊ. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी सुद्धा सुरू होती. त्यामुळे कुठेतरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आज एक वेगळीच राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (12 जून) राज ठाकरे यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेत तब्बल एक तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला, तरी आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आणि संभाव्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असावी, असा राजकीय अंदाज लावला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यापासून फारकत घेत महायुतीशी जुळवून घेणार की हे सर्व बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेणार? याबाबत तर्कवितर्क पुन्हा लावले जात आहेत.
अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता,पण...
वेध माझा ऑनलाइन
गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाच्या विमानानं टेक ऑफ करताच ते क्रॅश झालं. दुर्घटनेवेळी विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विमान अपघाताबाबत माहिती समोर आली आहे, त्यातील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे, अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता, जो धोक्याचे संकेत देत होता मात्र त्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळलं.
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना ; एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं : तब्बल 200 हून अधिक प्रवासी विमानातून प्रवास करत असल्याची माहिती ;
वेध माझा ऑनलाइन
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना घडली आहे.अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं. रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची माहिती आहे.
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अपघात फारच भीषण असून विमानातून तब्बल 200 हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.
विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसतंय. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.अहमदाबाद विमानतळावरून विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला.विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे.अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
Wednesday, June 11, 2025
कराडमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ; कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ;
वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका युवक - युवतीची एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील महिन्यात 20 मे रोजी एका युवतीला एका अनोळखी व्यक्ती व्हॉटस् अॅपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्या ग्रुपमध्ये 26 अन्य लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस् अॅप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि संबंधित महिला डॉक्टरशी ओळख नसणार्या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून एक अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ संबंधित गु्रपवर पोस्ट करण्यात आला होता. त्याच कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे व्हिडीओ बनविताना मजकूर, व्हिडीओला अश्लील भाषेतील आवाज सुद्धा जोडण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्या - ज्या लोकांचे अश्लील व्हिडीओ बनविले आहेत, त्या सर्वाना शोधून काढत कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. परराज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना समजले आहे. त्याचबरोबर संबंधिताचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असून संशयित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Tuesday, June 10, 2025
शरद पवार म्हणाले; आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं ; सुप्रिया सुळे म्हणाल्या; अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही ; काय आहे बातमी?
वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात आपला 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ध्वजारोहणाने वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन सोहळा सुरु होण्याआधीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मोठं विधान केलं आहे.
आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे. या मेळाव्याआधी आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. सहन करायला शिका, असं सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवलं होतं. यावर आज सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं. माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवला, ते माझं वयक्तिक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील शरद पवारांना म्हणाले : मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा / जयंत पाटील असे का म्हणाले
वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात आपला 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पहिलचं भाषण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे भर सभागृहात मोठी मागणी केली.मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मोठी मागणी जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.या सोहळ्यात जयंत पाटील शरद पवारांच्या शेजारीच बसले होते. जयंत पाटील यांनी यावेळी चांगलेच भाषण गाजवले. मात्र भाषणाच्या शेवटी मलाप्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा, अशी मागणी केली. जयंत पाटील यांनी हे विधान करताच सभागृहात जयंत पाटील यांच्या नावाच्या घोषणा सुरु झाल्या. जयंत पाटील तुम आगे बढो, हम तु्म्हारे साथ है, अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितले.तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
आम्ही पदाधिकारी यांना निमंत्रण दिलं. कार्यकर्ते नाराज झाले. फोन आले. पावसाळ्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलवून त्यांची अडचण नको म्हणून बोलवलं नाही. प्रशांतने वेळ घेतली म्हणून पुण्यात कार्यक्रम. चांगलं त्याचं कौतुक. त्रुटींची जबाबदारी माझी, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
Monday, June 9, 2025
चंद्रहार पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
वेध माझा ऑनलाइन
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरोबर एक वर्षानं चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
Sunday, June 8, 2025
कराड शहरलगत सहापदरी उड्डाणपुलाचे काम चालू ; त्याठिकाणचे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आमदार अतुलबाबांची आग्रही मागणी ; नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला अतुलबाबांची भेट ;
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाअंतर्गत कराड शहरालगत सहापदरी उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र या कामाच्या दिरंगामुळे कराड परिसरातील महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, परिणामी अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. काही घटनांमध्ये दुर्दैवाने जीवितहानीदेखील झाली आहे. याची गंभीर दखल घेत, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी थेट नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला भेट देत, अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.
पुणे - बंगळुरू महामार्ग हा राष्ट्रीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा दळणवळण मार्ग असून, यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे ही केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. पण हे काम संथगतीने सुरू असून, या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन, गंभीर अपघाताचे प्रकार घडत आहेत. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
याची गंभीर दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु असणे हे स्वागतार्ह असले, तरी त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण वाढणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे महामार्ग रस्ते कामातील आणि उड्डाणपूल उभारणीच्या कामातील दिरंगाई दूर करण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणी त्यांनी केली. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कर्मचारी, योग्य दिशादर्शक फलक, अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर आणि पथदिवे आदींची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी श्री. पाटील यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसह डी. पी. जैन समूहातील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून सूचना दिल्या. तसेच सर्व संबंधितांची केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांच्यासमवेत तात्काळ बैठक आयोजित करण्याची ग्वाही श्री. पाटील यांनी आ.डॉ. भोसले यांना दिली.
Subscribe to:
Posts (Atom)