वेध माझा ऑनलाइन
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अद्याप प्रत्यक्ष संवाद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नातेवाईकांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात संवाद सुरू आहे. मागील दोन महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या संदर्भात चर्चा सुरू आहेत. मात्र अजूनही कुठलाही प्रस्ताव किंवा युतीबाबत थेट चर्चा दोन्ही भावांमध्ये झालेली नसल्याचं सूत्रांची माहिती आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके सुरू आहेत. आज मनसेच्या केंद्रीय समितीची पुन्हा बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकानंतर पुन्हा एकदा 2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसेप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील ही चर्चा रंगली आहे. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत.
No comments:
Post a Comment