Thursday, June 12, 2025

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना ; एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं : तब्बल 200 हून अधिक प्रवासी विमानातून प्रवास करत असल्याची माहिती ;


वेध माझा ऑनलाइन
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना घडली आहे.अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात  एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं. रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची माहिती आहे.
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अपघात फारच भीषण असून विमानातून तब्बल 200 हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.

विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसतंय. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.अहमदाबाद विमानतळावरून विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला.विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे.अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.




No comments:

Post a Comment