Tuesday, June 10, 2025

शरद पवार म्हणाले; आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं ; सुप्रिया सुळे म्हणाल्या; अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष  आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात आपला 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ध्वजारोहणाने वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन सोहळा सुरु होण्याआधीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मोठं विधान केलं आहे. 
आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे. या मेळाव्याआधी आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. सहन करायला शिका, असं सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवलं होतं. यावर आज सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं. माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवला, ते माझं वयक्तिक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment