सध्या शहरातील आजी-माजी नेत्यांचा आखाडीचा दणका ठिकठिकाणी सुरू आहे प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक व युवकांचे आशास्थान असलेले सुहास पवार यांची आखडी मंगळवारी दिनांक 22 रोजी पार पडली आमदार डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे राजकीय एकत्रिकरण या कार्यक्रमात कराडकराना पहायला मिळणार का? व याचे परिणाम होणाऱ्या शहराच्या पालिका निवडणुकीत मनोमिलनाच्या रूपाने शहराला दिसणार का? अशी चर्चा होती
या आखडी कार्यक्रमासाठी डॉ अतुल भोसले व बाळासाहेब पाटील यांचे फोटो एकत्रित फ्लेक्सवर झळकल्याने त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आणले होते
दरम्यान आमदार डॉ अतुल भोसले बाहेरगावी असल्याने त्यांनी सुहास पवार यांना फोनवरून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तर माजी आमदार बाळासाहेब पाटील हे स्वतः कार्यक्रमस्थळी हजर असलेले पहायला मिळाले
सदर आखडी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती महिला देखील मोठ्या प्रमाणात हजर होत्या या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे
सध्या शहराच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार आपली तयारी दाखवत काही सामाजिक इव्हेंट साजरे करताना दिसत आहेत त्यासाठी सध्या आखडीचे आयोजन तसेच काहीजण वाढदिवस मोठा साजरा करून लोकसंपर्क वाढवताना दिसत आहेत शहरातून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी या नेत्यांची ही तयारी असल्याचे मानले जात आहे माजी आ बाळासाहेब पाटील गटाचे माजी नगरसेवक सुहास पवार व मित्र परिवाराने नुकतेच आखाडी च्या निमित्ताने जेवणावळीचे आयोजन केले होते तसा मचकूर असणारे फ्लेक्स शहरातील चौकात लागले होते त्यावर भाजप आमदार डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे फोटो असल्याने स्वतः हे दोन्ही आजी-माजी आमदार या कार्यक्रमाला येणार अशी चर्चा गावात झाली त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे या कार्यक्रमातून संकेत मिळत आहेत का? अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली
विधानसभा निवडणूकीत सुहास पवार यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले याना उघडपणे केलेली मदत शहरात चांगलीच गाजली त्यां दोघांचे एकमेकांशी असणारे मित्रत्वाचे संबंध यानिमित्ताने शहरासमोर आले त्यानंतर आता यावर्षीच्या होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत पुन्हा एकमेकाला मदत करणार का? अशी चर्चा नगरसेवक पवार यांच्या या आखडी च्या निमिताने शहरात सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवर ही आखाडी जोरदार चर्चेची ठरली
माजी नगरसेवक सुहास पवार हे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते निष्ठावन्त म्हणून देखील ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा त्यांना व पार्टीला मतदाराच्या रूपाने नेहमीच झालेला दिसून आलेला आहे कोरोना काळात त्यांचे कार्य न विसरता येण्यासारखे आहे सुहास पवार यांचा संपर्क प्रत्येक समाजात खूपच मोठा असल्याने त्यांच्या आखडी च्या कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजरी लावत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलेले दिसले गेली 15 वर्षे सुहास पवार प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या आखडीचे निमित्त डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मनोमिलन होण्याला कारणीभूत ठरणार का?हेच काही दिवसांनी कळणार आहे अशी चर्चा आहे...
दरम्यान या "आखडी' कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब पाटील माजी उपनगराध्यक्ष सुभाष काका पाटील, लोकशाही आघाडी चे अध्यक्ष जयंत काका पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील लोकशाही आघाडी चे गटनेते सौरभ पाटील तात्या, जयंत बेडेकर दादा , रमेश मोहिते, गंगाधर जाधव, अख्तर भाई अंबेकरी, रणजीत पाटील नाना ,सुरेश पाटील नाना, शिवराज इंगवले, राहुल खराडे तसेच आमदार डॉ अतुल भोसले यांचे समर्थक कार्यकर्ते त्याचबरोबर प्रभागातील तरुण कार्यकर्ते व महिलांची मोठी उपस्थिती होती
No comments:
Post a Comment