विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले यांचं आज सभागृहात आक्रमक वर्तन पहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. “या सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही. कारवाई झाली पाहिजे” असं नाना पटोले म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. “तुमच्याकडून अससंसदीय भाषेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही. हे योग्य नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले. नाना पटोले आपल्या जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. तिथे ते आक्रमकपणे बोलत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं.
No comments:
Post a Comment