कराड शहरात वाखान परिसरासह अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे त्याठिकाणी नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक सुहास पवार यांनी थेट पालिका गाठत प्रशासनाला केली आहे
माजी नगरसेवक सुहास पवार यांनी शहरासह वाखान परिसरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेला केली आहे त्याकरिता त्यांनी कराड पालिकेत जाऊन मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येवर उपाय काढण्याची विनंती केली आहे
या मोकाट कुत्र्यांनी शहरातील विविध भागातील वृद्ध तसेच महिला व लहान मुलांना झुंडीने हल्ला करत चावा घेतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील मोकाट कुत्र्यांनी वाखाण परिसरातील लहान मुले व काही महिलांना चावा घेतल्याची घटना घडल्याने त्याठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याठिकाणच्या रहिवास्यानी सुहास पवार यांना भेटून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केल्याने सुहास पवार यांनी पालिका गाठत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येबाबत उपाययोजना करा असे सांगितले आहे त्यानंतर पालिकेने या मोकाट कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदी देखील करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे त्यामुळे आता ही समस्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे
No comments:
Post a Comment