राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या संकेतानुसार अनेक बड्या मंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागणार आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.त्यामध्ये कराड दक्षिण चे आमदार डॉ अतुल भोसलेना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे
हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरतं मर्यादित असेल की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. अनेक मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील. खांदे पालट होईल, अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यात डॉ अतुल भोसले याना संधी मिळणार अशी पक्की बातमी आहे
No comments:
Post a Comment