Thursday, July 17, 2025

कराड शहरातील वाढीव पाणीपट्टी रद्द करावी -- सुशिक्षित बेरोजगार संघटना आक्रमक;

वेध माझा ऑनलाइन
आर्थिक चालू वर्षी कराड नगरपरिषदेने अचानकपणे पाणीपट्टी दरात पाचशे रुपयेची वाढ करुन कराड शहरातील सर्व सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे.शहरतील नागरिकांना या वाढीव पाणीपट्टी दराची पुसटशी ही माहिती न देता वार्षिक पाणीपट्टी दरामध्ये पाचशे रुपये वाढ केली आहे. या बाबत राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना यांच्या वतीने कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. प्रशांत व्हटकर यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला तालुका मार्गदर्शक राकेश पवार, सचिन भिसे,विकी शहा, साजिद मुल्ला,पंकज मगर, सामाजिक कार्यकर्ते निखिल ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
निवेदनातील माहिती अशी की, पालिकेने वार्षिक चालू पाणीपट्टी दरात पाचशे रुपये वाढ केली आहे ती वाढ करत असताना शहरातील पाणीपट्टी धारक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता केलेली वाढ हि येत्या आठ दिवसांत रद्द करावी यावेळी मुख्याधिकारी कराड नगरपरिषद यांनी सांगितले की येत्या आठ दिवसात या गोष्टीचा मी स्वतः अभ्यास करून आपणास कशा पद्धतीने ती वाढ झाली आहे व का झाली आहे ते आपणास चर्चा करून कळविण्यात येईल असे सांगितले. तसेच या वाढी संदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी ठराव केला असल्याचेही त्यांनी सांगितले परंतु यावर तोडगा काढण्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करू असे सांगितले मुख्याधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानून केलेली वाढ रद्द करावी यासाठी विनंती केली.अन्यथा कराड नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांना ही पाठवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment