वेध माझा ऑनलाईन
राज्यभरातून विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा सरकारने केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता त्रिभाषा सूत्राअंतर्गत कोणत्या भाषेचा समावेश करायचा? हे ठरवले जाणार आहे. दरम्यान, सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोऱणाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष संयुक्तपणे मुंबईत मोर्चा काढणार होते. मात्र हा मोर्चा काढण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर केली आहे.
राज ठाकरे यांनी काय पोस्ट केला आहे?
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
No comments:
Post a Comment