Friday, July 4, 2025

मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का ? राऊतांचे संकेत काय ?

वेध माझा ऑनलाइन :
होणार विजयी मेळावा ठाकरे बंधूंचा असला तरी त्यात इतर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हजर राहणार असल्याची माहिती आहे. मुंबईतल्या वरळी डोंबच्या सभागृहात जवळपास सात ते आठ हजार लोक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉल बाहेर रस्त्यावर सुद्धा एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. हिंदी सक्तीच्या जीआर विरोधात आधी ठाकरे बंधूंनी मोर्चांची घोषणा केली होती. पण सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याच आयोजन करत एकत्र येण्याच ठरवलं. म्हणजेच दोघांनीही एकत्र यायचं हे यातनं सिद्ध होतं आणि संजय राऊतांनी पाच तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या गोष्टी घडतील असंही म्हटलंय. म्हणजेच वरळीतला मेळावा दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे.मेळाव्यासंदर्भात एक टीझर सुद्धा जारी करण्यात आलाय. ज्यामध्ये दोन सिंह दाखवले असून एका सिंहाच्या मदतीला दुसरा सिंह जातो त्यावरून नेमकं अडचणीत कोण आहे हे टीझरमधून स्पष्ट होत नाही, असं म्हणत शिंदेंचे मंत्री शिरसाठ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.

No comments:

Post a Comment