महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही दिल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंची शिवसेनाही रणनीती आखत असून आता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ‘नगरसेवक’ हा शब्द देशभरात नेण्याची शिंदेसेनेची रणनीती असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, नगरसवेक या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. सन 1967 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी महापालिकेत निवडून जाणाऱ्या सदस्यांना नगरसेवक म्हणण्याचा आदेश दिला, तेव्हापासून नगरपालिका सदस्यांना नगरसेवक म्हटले जात आहे. आता, देशभरात हाच पॅटर्न राबविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून येत आहेत.
No comments:
Post a Comment