वेध माझा ऑनलाईन
हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हिंदी धोरणाचा जीआर रद्द झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंची एकत्र विजयी सभा होणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. तर हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषा सक्ती विरोधात एकत्रित रस्त्यावर उतरणार होते. मात्र आता सरकारने एक पाऊल मागे घेत हा जीआर रद्द केल्यानंतर आता ५ तारखेच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दुसरीकडे मनसेची आज सकाळी दहा वाजता यासंदर्भात एक बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरे आता नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून आहे.
No comments:
Post a Comment