सध्या शहरातील आजी-माजी नेत्यांचा आखाडीचा दणका ठिकठिकाणी सुरू आहे तर काही युवा नेते देखील असे आखाडीचे कार्यक्रम आयोजित करून लोकसंपर्क वाढवत शहरातून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी जणू तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे शहरातील युवा नेते व प्रभाग क्रमांक दोनमधील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते विनायक विलासराव कदम यांनी आखाडीच्या निमित्ताने आपल्या वॉर्डमधील नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे त्यासाठी त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन पत्रिका देत आमंत्रण दिले आहे या उपक्रमास आमदार डॉ अतुल भोसले, सेना नेते राजेंद्रसिह यादव, भाजप नेते विक्रम पावसकर यांच्यासह शहर व परिसरातील अनेक राजकीय नेते नगरसेवक उपस्थित राहणार आहेत
विनायक कदम हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचे सामाजिक काम मोठे आहे त्यांचा लोकसंपर्क देखील दांडगा आहे त्यांनी कोरोना काळात मोठं काम केले आहे
तसेच आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून विनायक कदम व मित्रपरिवार यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना, आयुष्यमान कार्ड याचा भव्य कॅम्प घेत त्याचा फायदा जनतेला मिळवून देण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न आजही शहरात चर्चेत आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारासाठी त्यांनी मेहनत घेतली होती.
त्यांचे समाजासाठी असलेलं योगदान तसेच त्यांचा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुख कार्य हे त्यांना युवा नेता म्हणून ओळख देण्यासाठी बळकटी देत आहे.
No comments:
Post a Comment