Monday, July 14, 2025

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा फोटो ; सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ;

वेध  माझा ऑनलाईन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून, शहरात शेकडो शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, काही बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा फोटो लावण्यात आला आहे, जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
परळीतील लावलेल्या या शुभेच्छा बॅनरांवर वाल्मिक कराड याचा फोटो दिसून आला आहे. विशेष बाब म्हणजे, कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या दोषमुक्तीबाबतचा निर्णय 22 जुलै रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या बॅनरवर त्याच्या फोटोचा समावेश असल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

No comments:

Post a Comment