Monday, July 21, 2025

निमित्त माजी नगरसेवक सुहास पवार यांच्या "आखाडी ' चे...पडद्यामागे राजकारण घडतंय पालिका निवडणुकीसाठी "मनोमिलना ' चे ?

वेध माझा ऑनलाईन
सध्या शहरातील आजी-माजी नेत्यांचा आखाडीचा दणका ठिकठिकाणी सुरू आहे तर वाढदिवस मोठा साजरा करून काही नेते लोकसंपर्क वाढवताना दिसत आहेत  शहरातून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी या नेत्यांची ही जणू तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे माजी आ बाळासाहेब पाटील गटाचे माजी नगरसेवक सुहास पवार व मित्र परिवाराने नुकतेच आखाडी च्या निमित्ताने जेवणावळीचे आयोजन केले आहे तसा मचकूर असणारे फ्लेक्स शहरातील महत्वाच्या चौकात लागले आहेत त्यावर भाजप आमदार डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे फोटो आहेत स्वतः हे दोन्ही आजी-माजी  आमदार या कार्यक्रमाला येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे या कार्यक्रमातून संकेत मिळत आहेत का? अशी चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू आहे

माजी नगरसेवक सुहास पवार हे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते निष्ठावन्त म्हणून देखील ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा त्यांना व पार्टीला मतदाराच्या रूपाने नेहमीच झालेला दिसून आलेला आहे 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुहास पवार यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले याना  उघडपणे केलेली मदत शहरात चांगलीच गाजली त्यां दोघांचे एकमेकांशी असणारे मित्रत्वाचे संबंध यानिमित्ताने शहरासमोर आले त्यानंतर आता यावर्षीच्या  होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत पुन्हा एकमेकाला मदत करणार का? अशी चर्चा यानिमिताने होऊ लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुहास पवार यांनी अरेंज केलेली उद्याची आखाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे होणाऱ्या या आखाडी च्या कार्यक्रमाला हे दोन्ही आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळाली आहे

एकूणच शहरातील होणाऱ्या पालिका निवडणूकीसाठी अशा एकत्रिकरणाच्या सार्वजनिक कार्यक्रमातून कोणा- कोणाचं आणि काय - काय राजकीय समीकरण साधलं जाणार? हे लवकरच समजणार आहे...तोपर्यंत शहरात अजून कुठं... कुठं... आणखी काय- काय पडद्याआड घडतंय हेच आता आपल्याला पहायचं आहे...!


No comments:

Post a Comment