महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री, तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला कराडकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, सुरेश पाटील व राहुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेषतः महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाजासमोरील आपले कर्तव्य पार पाडले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
हा उपक्रम राहुल भोसले आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
No comments:
Post a Comment