Monday, July 14, 2025

मालवाहू ट्रकची विमानाला धडक... ; मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला ;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे. टेकऑफपूर्वी एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला धडक दिली. हे विमान मुंबईवरुन दिल्लीला जाणार होते. या अपघातात विमानासह आणि ट्रकचेही नुकसान झाले आहे. या अफघातानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले व प्रवासांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 4.54 वाजता घडली. अकासा एअरलाइन्सचे विमान बेंगळुरूवरून मुंबईला आले होते, ते बे A-7 वर पार्क केले होते. काही वेळानंतर हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते. या विमानातून माल उतरवला जात होता, त्यावेळी बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेसचा एक ट्रक विमानाच्या उजव्या पंखावर आदळला, यामुळे विमानसह ट्रकचेही नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment