Friday, July 18, 2025

“सामाजिक भान आणि सेवाभावाची परंपरा” जपणाऱ्या मा. रणजीत (नाना) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज कराड येथे एक भव्य मोफत महाआरोग्य व सेवा शिबिर ; नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, आयोजकांच्या वतीने आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन ।
“सामाजिक भान आणि सेवाभावाची परंपरा” जपणाऱ्या मा. रणजीत (नाना) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे एक भव्य मोफत महाआरोग्य व सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वाखाण रोड, कराड अर्बन बँकेसमोर, पाटील गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हे शिबिर पार पडणार आहे.

या शिबिरात विविध आरोग्य सेवा मोफत दिल्या जाणार असून, शेकडो नागरिकांना याचा लाभ होणार आहे. विशेषतः नेत्र तपासणीसह मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी (प्रत्येक महिलेस खास भेटवस्तू), जनरल मेडिसिन, दंतचिकित्सा, हाड तपासणी, बीपी, शुगर व ईसीजी तपासणी तसेच आवश्यक औषधांचे वाटप यांचा समावेश आहे. एच. व्ही. देसाई आय सेंटर, ऑन्को लाईफ सेंटर, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवले जात आहेत.
आरोग्य तपासणीबरोबरच समाजहिताच्या इतर उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व फुलझाडांचे वाटप, तसेच शैक्षणिक दाखले, रेशनकार्ड, मतदान नोंदणीसंदर्भातील मार्गदर्शन, पीएम किसान योजना व शेती विमा माहिती यांचा समावेश आहे.
गांधी फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, “सेवा हीच खरी श्रद्धा” ही भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा ठरतो आहे.
कराड परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment