वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ‘व्होट चोरी’चे आरोप केल्यानंतर भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने सोनिया गांधी यांच्या नावाचा संदर्भ देत काँग्रेसवर निवडणुकीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, सोनिया गांधी या 1983 साली भारतीय नागरिक बनल्या, पण 1980 सालच्या मतदारयादीत त्यांचे नाव कसे काय आले असा प्रश्न भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला. अमित मालवीय यांनी या संबंधित पुरावे देत असल्याचा दावा केला आणि काँग्रेसवर निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.भाजपाच्या IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या माहितीनुसार, 1980 मध्ये सोनिया गांधी यांचा नाव नवी दिल्लीतील मतदार यादीत समाविष्ट आहे. परंतु त्यावेळी त्या भारतीय नागरिक नव्हत्या, तर इटलीच्या नागरिक होत्या असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. सोनिया गांधी यांना 1983 साली भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याचं अमित मालवीय म्हणाले.
No comments:
Post a Comment