जवळच्या व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडणे हा जीवनातील सर्वात कठीण प्रसंग असतो. कराडचे नितीन ओसवाल यांच्यावरही काही दिवसांपूर्वी असा प्रसंग ओढावला. त्यांच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने स्पंदन हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले. तेथूनच ओसवाल कुटुंबाला जणू नवी आशा व कुटुंबासारखी साथ मिळाल्याचा अनुभव आला.
डॉ. अमित बोत्रे, डॉ. प्रशांत पवार आणि डॉ. संदिप बानुगडे या डॉक्टरांच्या योग्य निदान, मार्गदर्शन आणि वेळेवर केलेल्या उपचारामुळे कुटुंबीयांचा विश्वास अधिक दृढ झाला. “प्रत्येक दिलासा आणि केलेला प्रयत्न आमच्यासाठी मोठा आधार ठरला,” असे श्री. ओसवाल यांनी सांगितले.
नर्सिंग स्टाफ व कर्मचारी वर्गाने दाखवलेली निष्ठा, संयम आणि सेवाभाव याचे त्यांनी विशेष कौतुक केले. “दिवस-रात्र प्रत्येक क्षणी रुग्णाची काळजी घेतली जात असल्याचे पाहून खरी सुरक्षिततेची आणि माणुसकीची जाणीव झाली,” असे ते म्हणाले.
स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा – अतिदक्षता विभाग, डायलिसीस युनिट, व्हेंटिलेटर, डिजिटल एक्स-रे, 2D-इको, अल्ट्रासोनोग्राफी, सेंट्रल सक्शन, कार्डीयाक मॉनिटर, फार्मसी विभाग तसेच स्वच्छ व आरामदायी खोल्या – या सुविधा रुग्णांच्या जीवनासाठी जीवनदायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या श्री. ओसवाल यांचे वडील प्रकृतीसुधाराकडे वाटचाल करत असून, “या पुनर्जन्मामागे स्पंदन हॉस्पिटलची संपूर्ण टीमच कारणीभूत आहे,” असे त्यांनी मनापासून सांगितले. शेवटी “सेवाभाव, माणुसकी आणि आधुनिक उपचार यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या स्पंदन हॉस्पिटलचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो,” अशा शब्दांत नितीन ओसवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
No comments:
Post a Comment