Monday, August 18, 2025

मुंबईत धुव्वाधार... शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर,; आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, बीएमसीकडून आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन
रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच पावसाचा जोर आता वाढताना दिसतोय. मुंबईतील सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागतेय तर दुसरीकडे पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनं पाण्यात बुडले आणि रस्त्यातच गाडी बंद पडल्याने चालकांना आपली गाडी धकलत वाट शोधताना नाकीनऊ येताना दिसतंय. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे तर रस्ते वाहतूक पूर्णतः मंदावली असल्याने नागरिकांचा मोठा खोळंबा झाला आहे.मुंबईत मुसळधार पावसाचा जोर आणखीन वाढत असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना, ज्यांची वेळ दुपारी १२ वाजेनंतर आहे, त्यांना आज, सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली. तर सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घरी घेऊन जावं, असं आवाहन पालकांना शाळांकडून केलं . या सगळ्या पार्श्वभूमीवर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन बीएमसी कडून मुंबईकरांना करण्यात आलं.

No comments:

Post a Comment