वेध माझा ऑनलाइन
मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदान येथे आंदोलन करता येणार नाही असा निर्णय दिला. एका जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मार्ने यांनी हा निर्णय दिला. या निर्णयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. आझाद मैदान का नाही? आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकील कोर्टात जाणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले की मा. न्यायदेवता तसं म्हणत असेल जर खारघर, नवी मुंबईत परवानगी देता येते तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अडचण काय आहे? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत. आम्ही रितसर मार्गानं, संविधानाच्या मार्गानं अर्ज केलेले आहेत.न्यायदेवता 100 टक्के परवानगी देणार म्हणजे देणार, असं मनोज जरांगे म्हणाले. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडचणी आहेत. कायदा जनतेसाठी आहेत, जनतेचं गाऱ्हाणं ऐकून घेणं सरकारचं, न्यायदेवतेनं ऐकून घ्यावं, आमच्या वकिलांच्याकडून न्यायदेवतेसमोर आमची बाजू मांडली जाणार आहे. न्यायदेवता 100 टक्के आम्हाला न्याय देणार, लोकशाही मार्गानं केलं जाणारं आंदोलन रोखता येणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
No comments:
Post a Comment