Friday, August 15, 2025

महापालिका निवडणुकीची ट्रायल? ठाकरे बंधूंचे एकत्रित पॅनल ; विरोधात फडणवीसांचे शिलेदार ! कोण मारणार बाजी?

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सातत्याने पाहायला मिळतात. आगामी मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल, अशी चर्चा सुरु असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल हे एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. आता ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी खेळी केली आहे.बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलं आहे. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात उतरणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपचं सहकार समृद्धी पॅनल हे निवडणूक लढणार आहे. भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे बेस्ट पतपेढी निवडणूक ही अटीतटीची ठरणार असल्याचे बोललं जात आहे.

No comments:

Post a Comment