Tuesday, August 26, 2025

मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला ; जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध ;

वेध माझा ऑनलाइन मराठा समाजाने एल्गार पुकारत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील चलो मुंबईची हाक दिली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलन हा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजामध्ये सध्या मतभेद वाढत असल्याचे दिसत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी जातीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाज या मागणीला तीव्र विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील नियोजित आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी त्यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने राजेंद्र साबळे हे जरांगे पाटलांना भेटले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही बाजूंच्या अपेक्षांवर चर्चा केली. तसेच येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग जाणून घेण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आंदोलन पुढे ढकलता येईल का, ही विनंती करण्यासाठी आल्याची माहिती राजेंद्र साबळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment