Tuesday, August 26, 2025

मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे मनोज जरांगे यांच्या भेटीला ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील भर गणेशोत्सवात मुंबईत धडक देणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे पण गणेशोत्सवात विघ्न नको, असं म्हटलंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा सरकार उलथवणार असा अल्टिमेटम देत थेट इशाराच दिलाय. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असताना दुसरीकडे ओबीसी समाज याला विरोध दर्शवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत नियोजित असलेलं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 

No comments:

Post a Comment