वेध माझा ऑनलाइन।
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी प्रक्रिया मिरजेतील मार्केट यार्ड मध्ये सुरू आहे. आठ टेबल वर 25 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या सहा जागांसाठी 13 उमेदवार मैदानात होते. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या विजय घोषित करण्यापूर्वीच समर्थकांची जल्लोषाची जय्यत तयारी केली होती. मिरज मिशन चौकात जेसीबीने गुलाल उधळण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. डॉल्बीचा दणदणाट, क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालण्याची तयारी करण्यात आली आहे. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी 45 मतांचा कोटा पूर्ण केला. एकूण 88 मता पैकी विजयासाठी 45 मतांची आवश्यकता होती. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मतमोजणीच्या ठिकाणीच पडळकर समर्थकांकडून जल्लोष करण्यास सुरूवात झाली
जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर 54 मतांनी विजयी झाले आहेत. विरोधी उमेदवार विनोद पवार यांना 34 मते पडली आहे.
No comments:
Post a Comment