Monday, June 8, 2020

18 जण पॉझिटिव्ह सापडले ; प्रशासनाची झोप उडाली ;रुग्ण संख्या अधिकच वाढू लागल्याने वाढली चिंता

 सातारा (जी मा का )आताच आलेल्या रिपोर्टनुसार 18 पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक आता भयभीत झाले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. प्रशासनाची याच कारणाने  तारांबळ उडाली असून कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती घट्ट होत चालला असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाल्याचे दिसते आहे.जिल्ह्यातील रुग्ण संख्या 649 झाली आहे

कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 5,
वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1
जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1
खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1
महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1
माण तालुक्यातीन वडजल येथील 3, भालवडी येथील 1
 व भालवडी येथील 1 .



Sunday, June 7, 2020

जिल्ह्यात आणखी 10 जण बाधित ; मृत्यू पश्चात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा दि. 8 (जिमाका) :  सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये *वाई तालुक्यातील* पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला.
*खंडाळा तालुक्यातील* आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यु
 झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता.
*खटाव तालुक्यातील* पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष व  विसापूर येथील   71 व 62 वर्षीय पुरुष
*जावली तालुक्यातील* काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील 28 व 26  पुरुष व 50 वर्षीय महिला
यांचा  समावेश आहे.

*181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
 एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणं निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

कुख्यात दाऊद इब्राहिम जिवंत आहे,,की मेलाय... हे केंद्र सरकारने जनतेला सांगावे ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई : कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, दाऊदला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या भारतातील मुद्रीत तसेच टीव्ही माध्यमातून येत असून यातील सत्य काय आहे याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दाऊद हा भारताचा शत्रु असून तो भारतासाठी मोस्ट वॉटेंड आहे. पण २०१४ पासूनच दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग झाले असून आतापर्यंत सहा वेळा दाऊद मरुन जीवंत झाला आहे. मोदी सत्तेवर येताच आता दाऊदची खैर नाही, मोदींच्या नेतृत्वामुळे पाकिस्तान भयभीत झाला असून दाऊदही प्रचंड घाबरला आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यासाठी फोन केला, अशा बातम्या आल्या होत्या. आश्र्चर्य म्हणजे या चॅनेल्सची सूत्रे साक्षात आयएसआय पर्यंत पोहोचली आहेत असे ते स्वत:च म्हणतात. मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते. म्हणून या वाहिन्यांच्या प्रमुखांना ‘रॉ’चे एजंट केले तर देशाला फायदा होईल असे सावंत म्हणाले.

देशातील चॅनेलवर हेडलाईन्स काय यावी हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व मोदींचे तथाकथित जेम्स बाँड अजित डोवाल ठरवत असतात अशी चर्चा सुरू असते. जेव्हा जेंव्हा मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार होते, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तेव्हा तेव्हा दाऊदला वाहिन्यांवर मारले जाते हा योगायोग दिसून आला आहे. किंवा भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम हे विषय चर्चेला घेतले जातात.दाऊदला फरफटत भारतात आणू अशा वल्गना मोदींसहित भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत केल्या परंतु आजपर्यंत दाऊदला भारतात आणण्यात त्यांना काही शक्य झालेले नाही. परंतु दाऊदची बेगम मात्र राजरोसपणे देशात मोदी सरकारच्या कार्यकाळात येऊन परतही गेली. नेपाळ हा भारताचा मित्र राष्ट्र पण आता मात्र हा चिमुटभर देशही भारताला डोळे वटारत आहे. चीनने सीमेवर आगळीक केलेली असून चीनचे सैन्य लडाखमध्ये ६० किलोमीटर भारताच्या सीमेच्या आत आले आहे. परराष्ट्रीय धोरण फसलेले आहे. तसेच कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकारला मोठे अपयश आले आहे. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्नही सोडवता आला नाही. स्वातंत्र्यानंतर झालेले सर्वात मोठे स्थलांतर झाल्याचे विदारक चित्र जगाने पाहिले आहे. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून देशभरात मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या अपयशामुळे देशात चिंतेचे वातावरण असून सरकारच्या अपयशावर सर्वत्र चर्चा होत असल्यामुळेच आता दाऊदला पुन्हा मारले गेले अशी शंका जनतेला येत आहे. केंद्र सरकारने हा संशय दूर करण्यासाठी खुलासा करुन सोक्षमोक्ष लावावा,असे सावंत म्हणाले.

Saturday, June 6, 2020

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 10 आमदार होणार निवृत्त ; काँग्रेसच्या 4 तर राष्ट्रवादीच्या 6 आमदारांचा समावेश

कराड
आज विधानपरिषदेतील तब्बल १० राज्यपाल नामनियुक्त सदस्य निवृत्त होणार आहेत.मुदत संपणा-या या आमदारांमध्ये काँग्रेसच्या ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी झालेली निवडणूक चांगलीच गाजली असतानाच आज ( शनिवारी ) राज्यपाल नामनियुक्त १० विधानपरिषदेतील आमदारांची मुदत संपत असून,मुदत संपणा-या सदस्यांत प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.या यादीत काँग्रेसचे ५ राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर घटक पक्षांच्या एका आमदाराचा समावेश आहे.विधान परिषदेत असणारे राज्यपाल नामनियुक्त सदस्य हुस्नबानू खलिफे,जनार्दन चांदूरकर,आनंदराव पाटील,रामहरी रूपनवर हे काँग्रेसचे ४ तर प्रकाश गजभिये,विद्या चव्हाण,राहुल नार्वेकर,ख्वाजा बेग,रामराव वडकुते,जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आमदार आज शनिवारी ६ जून रोजी निवृत्त होत आहेत.तर काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे. असे एकूण १२ आमदार निवृत्त होत आहेत.त्यापैकी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर,रामराव वडकुते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्या कारणाने या दोन जागा रिक्त होत्या. या दोन रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती करावी अशी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.मात्र राज्यपालांनी या रिक्त जागेवर नियुक्त्या केल्या नव्हत्या.

साहित्य,कला,समाजसेवा आणि सहकार आदी क्षेत्रातील व्यक्तींची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी तरतूद घटनेत आहे.राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीकडून ज्या  नावांची शिफारस केली जाईल.ती या निकषावर तपासण्याचे काम राज्यपाल काटेकोरपणे करण्याची शक्यता आहे.तिन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असून,सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे १२ सदस्य राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवले जाणार आहेत.महाराष्ट्र विकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांना याद्वारे विधानपरिषदेवर संधी दिली जावू शकते.मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे केली तरी ते तत्काळ निर्णय घेण्याची शक्यता नसल्याने विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून १२ सदस्यांची नियुक्ती विविध कारणांनी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हा मुद्दा राजभवन विरुद्ध राज्य सरकार अशा वादाचाही ठरण्याची शक्यता आहे.राज्यपाल या नियुक्त्याबाबत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

कराड तालुक्यातील तुळसन आणि कसे येथील 2 महिला सापडल्या पॉझिटिव्ह

सातारा दि. 6 ( जि. मा. का )
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
     वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून  मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.
*211 जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला*
वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 13 ग्रामीण रुग्णालय वाई येथील 80, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 45, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 व रायगाव येथील 41 असे 211 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.
00

कृष्णा हॉस्पिटल मधून 23 जण झाले कोरोनामुक्त ; आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. 6 : सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील एकूण 23 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 144 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कराड तालुक्यातील म्हासोली येथील 27 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरूष, कलेढोण येथील 45 वर्षीय महिला, सदुर्पेवाडी-सळवे-पाटण येथील 35वर्षीय पुरूष, मोरगिरी-पाटण येथील 72 वर्षीय महिला, दहिवडी-माण येथील 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, देगाव-वाई येथील 42 वर्षीय महिला, धामणी येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय युवक, 35 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय पुरूष, मालनपूर-चिखली-वाई येथील 24 वर्षीय युवक, सिधांतवाडी-वाई येथील 52 वर्षीय पुरूष, मानेचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, आढे-पाटण येथील 35 वर्षीय पुरूष, म्हावशी-पाटण येथील 45 वर्षीय पुरूष, कास-खुर्द येथील 44 वर्षीय पुरूष, शामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, शिराळ-पाटण येथील 52 वर्षीय महिला, तामिनी-पाटण येथील 7 वर्षीय मुलगी, मोरगिरी-पाटण येथील 65 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संतोष टकले, डॉ. राहुल फासे, राहुल माळी, अवधूत अवसरे, श्रीनिवास जोशी, विशाल पाटील, इम्रान इनामदार, रश्मी पंढरपुरे, दीपाली धोत्रे, वनिता नावडकर, श्रीपाद खुपसंगीकर, अस्मिता देशपांडे, नंदिनी चव्हाण, महेंद्र आलाटे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर,डॉ. विश्वास पाटील, विक्रम पवार यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

आज एकूण 43 कोरोना मुक्त
 जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर खावली येथून 6 व मायणी येथून 2 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यासाठी  चांगली ठरत चाललेली बाब म्हणजे आज अखेर उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या जास्त असून ती  303 इतकी आहे.
बरे होऊन घरी गेलेल्या मध्ये खंडाळा तालुक्यातील घाटदरे येथील 51 व 70 वर्षीय 2 पुरुष, सातारा तालुक्यातील निंब येथील 30 वषी्रय पुरुष,  जावळी तालुक्यातील मोरघर येथी ल 24 वर्षीय महिला व 3 वर्षीय बालक, आणि खटाव तालुक्यातील बनपूरीतील 38 वर्षीय पुरुष व शेळकेवाडी येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रात्री 8 पर्यंत जिल्ह्यातील कोरोना अपडेट असे आहे, एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 620 इतकी झाली असून 6835 नमुने हे निगेटिव्ह आले आहेत.  एकूण बाधित रुग्णांपैकी 303 इतके बाधित रुग्ण बरे पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.  तर 291 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत कोरोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या 26 इतकी आहे.
000

लोकशाही आघाडीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा ; शिवछत्रपतींच्या प्रतिमेस केले अभिवादन

कराड
 शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या दिमाखात साजरा होत असताना येथील लोकशाही आघाडीच्या वतीने देखील याच दिवसाचे औचित्य साधून  येथील पालिकेतील लोकशाही आघाडीच्या दालनामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील,नगरसेवक मोहसीन आंबेकरी,शिवाजी पवार तात्या,जयंत बेडेकर,अमित शिंदे,सचिन चव्हाण,महेश पाटील, रोहित वाडकर आदी उपस्थित होते.