वेध माझा ऑनलाइन / गुंगी गुडिया प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी म्हटले की, ‘इतक्या घाण वृत्तीची काँग्रेस आहे, त्यांनी त्यांची जात दाखवून दिली. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल. आम्ही त्यांना काही बोललो तर चालेल का? त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. तुम्हाला आया बहिणी आहेत की नाही. माझी राहुल गांधींना विनंती आहे की त्यांनी या अध्यक्षांना काढूण टाकले पाहिजे. काँग्रेसवाल्यांना लाज राहिली नाही.’
.
No comments:
Post a Comment