वेध माझा ऑनलाइन।
: सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेल्समध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य तसेच संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल्सना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. आढळून आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी व पुढील कायदेशीर कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली.
या कारवाईनंतर शहरात कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
No comments:
Post a Comment