Friday, February 16, 2024

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं विधान ; मराठा आरक्षण मिळणार पण नेमकं कुणाला?

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ दाखल केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणावर टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार तसेच कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी असतील त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पाहिजे. सरकार मराठा आरक्षणाबाबतीत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणतंही आंदोलन करायला नव्हतं पाहिजे. पण जे आता सुरू आहेत ते आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आहे.



Thursday, February 15, 2024

सातारा जिल्हा नियोजन समितीवर 14 नामनिर्देशित सदस्य - पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शिफारस :

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्हा नियोजन समीतीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिफारशींवर 14 सदस्य नामनिर्देशित करण्यात आले आहेत

त्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे...

विधिमंडळ सदस्यांमधून
आमदार महेश शिंदे
आमदार जयकुमार गोरे

नामनिर्देशित सदस्य - 
प्रदीप साळुंखे
राजेंद्र यादव
प्रदीप माने
धैर्यशील कदम
राहुल बर्गे
संतोष जाधव
अमरसिंह घाडगे
जयवंत शेलार
चंद्रकांत जाधव
वासुदेव माने
पुरुषोत्तम जाधव
रणजित भोसले
अशी या सदस्यांची नावे आहेत





डॉ.अतुल भोसले यांचा कराड शहर भाजपच्या वतीने सत्कार

वेध माझा ऑनलाइन। कराड  शहरावरती जीवापाड प्रेम करणारे व नेहमीच संकटाच्या काळात धावून येणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व सातारा लोकसभा प्रभारी डॉ.अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.

त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कराड शहराच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कराड शहराचे अध्यक्ष एकनाथ बागडी,सातारा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सरचिटणीस किसन चौगुले, मुकुंद चरेगावकर ,किरण मुळे, रमेश मोहिते, सुधाकर कांबळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Wednesday, February 14, 2024

कराडच्या वैकुंठ स्मशानभूमी येथे दहनासाठी वेळेचे बंधन नको ; लोकशाही आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ;

वेध माझा ऑनलाइन । कराड नगरपरिषदेने,  वैकुंठ स्मशानभूमी कराड येथे दहनासाठी घातलेल्या वेळेच्या बंधना विरोधात, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही आघाडी कराड शहर यांच्यावतीने, अध्यक्ष मा. श्री जयवंत पांडुरंग पाटील (काका) यांनी लोकशाही आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिकांसमवेत मा.मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद कराड यांना लेखी निवेदन देऊन स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रारंभी कराड नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या आदरणीय स्व. पी. डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकारी नागरिकांनी अभिवादन केले.

निवेदनात असे म्हटले आहे की 'कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये कराड शहरातील तसेच कराड शहरानजीकच्या गांवामधील अनेक ग्रामस्थ व नागरिक त्यांच्या नातेवाईकांचे निधन झालेनंतर, पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दहनासाठी आणले जाते. त्यास वेळेचे- काळाचे बंधन कधीच नव्हते. परंतू नुकतेच कराड वैकुंठ स्मशामभूमीत दहनासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वैकुंठ स्मशामभूमीत पार्थिव दहन करता येणार नाही, असे फलक आपणांतर्फे वैकुंठ स्मशामभूमी परिसरात लावले आहेत.

खरे पाहता स्मशामभूमीत दहनासाठी पार्थिव आणण्यासाठी वेळेचे घातलेले बंधन अत्यंत चुकीचे, जनतेच्या व समाजाच्या भावनांशी खेळ करणारे आहे. कारण काही नागरिक बंधु-भगिनींचे देहावसान घरी वृध्दापकाळाने, काहीचे अपघाची निधन, काहीचे दुर्धर अशा आजाराने रात्री-अपरात्री निधन होते अशा वेळी नातेवाईकांना पार्थिव जास्त वेळ घरी ठेवणे भावनिक व आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. निधन होणारी व्यक्ती या सर्वच सदन, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणार नाहीत. आपण जर वेळेचे बंधन घातले तर ज्याची अर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा नागरिकांनी आपल्या नातेवाईकांचे पार्थिव कोठे ठेवायचे? त्यांना ते दवाखान्यात ठेवणे परवडणारे नाही. सध्याची महागाई पाहता नातेवाईकांना दवाखान्याचे बिल भरणे देखील शक्य नसते अशा वेळी आपण वेळेचे बंधन घालून महागाईत आणखी भर घालत आहात. तसेच योग्य वेळेत दहन न करता आलेने होणारी कुटुंबांतील सदस्यांची भावनिक व मानसिक कुचंबना याचा विचार करता हे बंधन सामाजिकदृष्ट्या अनिष्ट व घातक आहे.

 या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
तरी आपणांस लोकशाही आघाडी व कराड शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करणेत येते की,- सदर वेळेचे बंधन त्वरीत रद्द करावे अन्यथा लोकशाही आघाडीचेवतीने तीव्र आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्यावी.' असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री जयवंत पांडुरंग पाटील (काका), उपाध्यक्ष ॲड. विद्याराणी साळुंखे, सचिव नरेंद्र पवार, सहसचिव व मुसद्दीक आंबेकरी, खजिनदार रवींद्र मुंढेकर, सह खजिनदार राकेश शहा यांचेसह माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे, सुहास पवार,  उदय हिंगमिरे,शिवाजी पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, प्रविण पवार, अजय सूर्यवंशी, भारत थोरवडे, सोहेब सुतार, अशपाक मुल्ला, दीपक कटारिया,  साबीर आंबेकरी, अमरसिंह बटाणे, आदिल आंबेकरी, निहाल मसुरकर, गणेश हिंगमिरे, सोहेल बारस्कर, अबुकर सुतार, प्रताप भोसले, राहुल भोसले, मंगेश वास्के, गणेश कांबळे,सचिन चव्हाण, रोहित वाडकर, चांद पालकर, विनायक पाटील, अहमद मुल्ला, प्रशांत शिंदे,अजिंक्य देव, संजय मोरे, रफिक मुल्ला, सतीश भोंगाळे, रमेश सातुरे आदींनी उपस्थित राहून निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Tuesday, February 13, 2024

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर ; वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे रस्त्याचे होणार चौपदरीकरण; फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही होणार निर्मिती ;

वेध माझा ऑनलाइन।  कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या ५० कोटींच्या निधीतून कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही निर्मिती होणार असल्याने, या नव्या प्रकल्पामुळे कराड शहराच्या प्रगतीला चालना मिळणार आहे. 

भाजपा महायुती सरकारने गेल्या वर्षभरात राज्यात रखडलेल्या विकासाला पुन्हा चालना देत, नवनव्या प्रकल्पांसाठी निधीची बरसात सुरू केली आहे. विशेषतः कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांना ताकद देण्याचे धोरण राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबिलेले आहे. जनतेच्या हितासाठी आणि कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड कार्यरत असलेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रत्येक मागणीला हिरवा कंदील दाखवीत, राज्य सरकारच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 

गेल्याच आठवड्यात कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १३१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भोसले यांनी कराड दक्षिणच्या विकासासाठी भविष्यातही भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. चव्हाण यांच्याकडे केली होती. मुख्यत्वे कराड शहराच्या विकासासाठी मोठा विकासप्रकल्प मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. 

अतुलबाबांच्या मागणीची दखल घेत ना. चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराड शहरातील रस्ते विकासासाठी ५० कोटींच्या निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश सी.आर.आय.एफ. योजनेत करत ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत मंजूर झालेला हा राज्यातील निवडक रस्त्यांपैकी एक रस्ता असून, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे कराडच्या या रस्त्याला आता नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या ५० कोटींच्या निधीतून कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. शिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे मॉर्निंग वॉक अथवा सायकलिंग करणाऱ्या आरोग्यहितदक्ष नागरिकांसाठी सुरक्षित व स्वतंत्र मार्गाची सोय उपलब्ध होणार आहे. याशिवाय या रस्त्यावर अन्य अनुषंगिक सेवासुविधा जसे की, प्रसाधनगृह, स्वच्छतागृहे, पार्किंग स्लॉट, सायकल पार्किंग स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामुळे कराड शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना भाजपचे बळ!
कराड दक्षिण मतदारसंघाच्या आणि विशेषतः कराड शहराच्या विकासासाठी भाजपचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अतुलबाबांना राज्यात ओळखले जात असून, डॉ. अतुलबाबांकडून जनविकासासाठी आलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता करून, भाजपकडून त्यांना बळ दिले जात आहे. डॉ. अतुलबाबांची लोकसेवेची तळमळ बघून, कराड दक्षिणमध्ये विविध विकास कामांसाठी भरघोस निधीचा वर्षाव होत असून, कराड शहरासाठी मंजूर झालेल्या ५० कोटींच्या निधीमुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.


Monday, February 12, 2024

येत्या 72 तासात भाजप काँग्रेसचा मोठा गट फोडणार ? ; भाजप कडून हालचाली सुरू ! काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार? ; चर्चांना उधाण ;

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली घडत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी 10 ते 12 आमदारांचा गट फुटून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण या सर्व घडामोडींना नेमकी सुरुवात कधीपासून झाली? याची माहिती समोर येत आहे.येत्या 72 तासात मोठ्या घडामोडींची शक्यताअसून भाजप काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची खेळी करणार असल्याची माहिती मिळाली आहे

 यापुर्वी अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत भाजप प्रवेशाच खंडन केलं होतं. पण आता त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा थेट राजीनामा दिल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी पक्की असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आपला पक्ष प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अमित शाह येत्या 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस, पुढचे 72 तास महाराष्ट्रात वेगवान घडामोडी
भाजपचं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे. भाजप पडद्यामागे मोठी राजकीय खेळी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. यामध्ये काँग्रेस आमदारांचादेखील समावेश आहे. भाजप नेत्यांची काँग्रेस नेत्यांशी बोलणी सुरु आहे. भाजप काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची खेळी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेश होणार आहे.

...शिंदे, अजित पवारांसारखे अशोक चव्हाण पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणार का? संजय राऊत यांचा सवाल ...

वेध माझा ऑनलाईन। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून सत्ताधारी विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तर कालपर्यंत अशोक चव्हाण सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले…अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे. तर पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.