Wednesday, October 8, 2025

माजी मंत्री शामराव अष्टेकर यांचे निधन ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड उत्तरचे माजी आमदार,माजी क्रिडा मंत्री शामराव बाळकृष्ण अष्टेकर (वय ९१) यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले.
आज सायंकाळी त्यांच्यावर पुणे येथे  अंत्यसंस्कार होणार आहेत .पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान असलेले शामराव आष्टेकर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

Saturday, October 4, 2025

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक जयंत बेडेकर यांच्या शुभेच्छा फ्लेक्सवर बाळासाहेबांबरोबर आमदार अतुलबाबाही झळकले ...

वेध माझा ऑनलाईन।
माजी आ बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक व लोकशाही गटाचे सक्रिय कार्यकर्ते जयंत बेडेकर यांनी नवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी शहरात फ्लेक्स लावले होते त्यावर नेते माजी आ बाळासाहेब पाटील यांच्या फोटोसह आमदार डॉ अतुलबाबा यांचाही फोटो  होता  त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे यातुन संकेत मिळत आहेत का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे 

सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर हे  माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात केवळ वार्डातच नाही तर संपूर्ण शहरात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते नेहमीच 24x7 मदतीसाठी पुढे असतात त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या या प्रवृत्तीचा अनेकांना  सामाजिक फायदा झालेला दिसूनही येतो
त्यांच्या पत्नी सौ बेडेकर या कराड पालिकेच्या मागील एका झालेल्या निवडणुकीतून  नगरसेविका म्हणून पालिकेत निवडून गेल्या होत्या मात्र यावेळी सोमवार पेठेतून लोकशाही आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून जयंत बेडेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे ..नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जयंत बेडेकर यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा प्रचार केल्याचे ते स्वतःउघडपणे सांगतात  दरम्यान अतुल भोसले यांना लोकशाही गटातील अनेकांनी या निवडणुकीत मदत केल्याची चर्चाही शहरात असते.. आमदार भोसले यांच्या गावातील अनेक कार्यक्रमातून लोकशाही गटाचे काही माजी नगरसेवक उपस्थित असलेले दिसतात.. त्यामुळे या एकूणच शहरातील वातावरणामुळे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत एकमेकाला मदत करणार का? अशा चर्चा यानिमित्ताने आहेत ...
माजी नगरसेवक सुहास पवार यांनीही याच दोन नेत्यांचे फोटो आपल्या फ्लेक्सवर लावत शहरात जोरदार आखाडी साजरी केली होती त्यावेळी देखील अशीच चर्चा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने झाली होती.....त्याचे कारण असे की...माजी नगरसेवक सुहास पवार तसेच जयंत बेडेकर हे दोघेही माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर व पहिल्या फळीतले समर्थक आहेत... आणि अशा कट्टर समर्थकांच्या फ्लेक्स बोर्डवर जर... आमदार अतुलबाबा झळकत असतील तर मग  होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर यातूनच पडद्याआड मनोमिलनाचे राजकारण शिजतय का ? अशी शंका घेण्यासाठी वाव आहे अशीही गावात चर्चा आहे...

कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आ डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ; मोफत शासकीय सेवांचाही नागरिकांना दिला लाभ ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आ डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक व भाजपचे शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांच्या मित्रमंडळच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते तसेच काही शासकीय योजनांचा लाभ देखील यावेळी अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने नागरिकांना देण्यात आला
कराडच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक नगरपरिषद शाळा क्रमांक १० मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी १५० हुन अधिक नागरिकांनी या सर्व आरोग्य व शासकीय अशा एकूणच सर्व उपलब्ध सेवांचा लाभ घेतला.

यावेळी अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने लाडकी बहीण KYC अपडेट, वय वंदना, आयुष्मान भारत,कास्ट सर्टिफिकेट, डोमासेल, रेशनकार्ड अपडेट अश्या सर्व शासकीय योजना येथील नागरिकांसाठी राबवण्यात आल्या या सर्व योजनांचा लाभ गरजू नागरिकांनी यावेळी घेतला 
त्यासोबतच यावेळी मोफत सर्व रोगनिदान शिबीरामध्ये सर्जरी,स्त्रीरोग बालरोग कान नाक घसा,नेत्ररोग त्वचारोग दंत चिकित्सा तसेच फिजिओथेरपी,मानसोपचार आदी आजारावर मोफत उपचार तपासणी व मोफत औषधे देण्यात आली.या शिबिरास कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कडून डॉक्टर्स आणि औषधे मोफत सेवा देण्यात आली.
यावेळी स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला १५० हुन अधिक नागरिकांनी यावेळी उपलब्ध सेवांचा लाभ घेतला.
भाजपा कराड शहर अध्यक्ष मा. सौ. सुष्मा लोखंडे, ऍड. सौ. तबस्तुम मुल्ला, सौ. काटवटे व भाजपा पदाधिकारी त्या सोबत कराड दक्षिणचे आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा. श्री. दिलीप जाधव आणि सागर माने, ओंकार ढेरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमेटी अध्यक्ष मा.श्री.राहूल भोसले, श्री. सुदेश थोरवडे मा. श्री. सुनिल थोरवडे, श्री. शिवराज इंगवले, श्री. भावेश शहा, श्री. किशोर आठवले, श्री. सागर लादे, श्री. विवेक भोसले, श्री. नितीन भोसले,श्री. वाजीद मुल्ला, श्री. संतोष मुटेकर, श्री. विकी वाघमारे, मा. सुमित कांबळे, वैभव आवळे,मंगेश वीर, अतिश थोरवडे, निखिल साळुंखे, राहूल थोरवडे, रोहित कांबळे, अनिकेत वास्के
तसेच विविध पदाधिकारी आणि वेगवेगळ्या स्थानिक कमेटी, बचत गटातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली.


Wednesday, October 1, 2025

माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांचे सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर आरोप ; काय म्हणाले...


वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामान्य सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. सभासदांचे हक्क पायदळी तुडविले.सहकाराच्या नियमांचे पालन करूनच मी सह्याद्रीचा सभासद म्हणून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये ५ वर्ष रखडलेल्या कारखान्याच्या विस्तार वाढीचाही प्रश्न होता. त्यामध्ये नवीन विस्तारीकरणासाठी किती कंपन्यांनी सहभाग घेतला होता? कोणत्या कंपन्यांनी टेंडर भरली होती? कोणाला काम 
देण्यात आले त्याची कॉपी, प्रोसिडिंग नक्कल व करारनामा मागितले होते. मात्र या प्रश्नाबाबत टुकार उत्तर देऊन सभा गुंडाळण्याचे काम अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी केली. 

कराड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद निवास थोरात बोलत होते. यावेळी शैलेश चव्हाण, भरत चव्हाण आनंदराव थोरात, विश्वास जाधव आदींची उपस्थिती होती. 

ते पुढे म्हणाले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा दावा अध्यक्ष बाळासाहेब पाटील करतात. मग वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे का टाळता? प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचा बोलताना माईक का बंद करता?असा सवाल करत त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत. मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता  अध्यक्षांनी केलेली चिडचिड म्हणजे 'खाई त्याला खवखवे' अशीच परिस्थिती असल्याचा टोलाही निवास थोरात यांनी यावेळी लगावला माझ्या व्यक्तिगत कर्जाबाबत टीका टिप्पणी केली व तुम्हाला जी माहिती पाहिजे ती साखर आयुक्तालय येथून घ्या असे मुजोर उत्तर दिले. हा प्रकार लांच्छनास्पद आहे याशिवाय मयत वारसदार सभासदांच्या प्रश्नावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही ही बाब चुकीची आहे असेही ते म्हणाले

खरंतर या सर्व प्रकाराबाबत मी साखर आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी कारखाना प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील ती माहिती दिलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत विचारले असता त्याचेही उत्तर देत नाहीत. ही दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही असेही थोरात म्हणाले. 

वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा दावा अध्यक्ष बाळासाहेब पाटील करतात. मग वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे का टाळता? प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचा बोलताना माईक का बंद करता?असा सवाल करत त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत. मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता  अध्यक्षांनी केलेली चिडचिड म्हणजे 'खाई त्याला खवखवे' अशीच परिस्थिती असल्याचा टोला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

कराड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद निवास थोरात बोलत होते. यावेळी शैलेश चव्हाण, भरत चव्हाण ,आनंदराव थोरात, विश्वास जाधव आदींची उपस्थिती होती. 

निवास थोरात म्हणाले, सह्याद्री कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र या सभेत सामान्य सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. सभासदांचे हक्क पायदळी तुडविले.सहकाराच्या नियमांचे पालन करूनच मी सह्याद्रीचा सभासद म्हणून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये ५ वर्ष रखडलेल्या कारखान्याच्या विस्तार वाढीचाही प्रश्न होता. त्यामध्ये नवीन विस्तारीकरणासाठी किती कंपन्यांनी सहभाग घेतला होता? कोणत्या कंपन्यांनी टेंडर भरली होती? कोणाला काम 
देण्यात आले त्याची कॉपी, प्रोसिडिंग नक्कल व करारनामा मागितले होते. मात्र या प्रश्नाबाबत टुकार उत्तर देऊन सभा गुंडाळण्याचे काम अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले. उलट माझ्या व्यक्तिगत कर्जाबाबत टीका टिप्पणी केली व तुम्हाला जी माहिती पाहिजे ती साखर आयुक्तालय येथून घ्या असे मुजोर उत्तर दिले. हा प्रकार लांच्छनास्पद आहे .

खरंतर याबाबत मी साखर आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी कारखाना प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील ती माहिती दिलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत विचारले असता त्याचेही उत्तर देत नाहीत. ही दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही. याशिवाय मयत वारसदार सभासदांच्या प्रश्नावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही ही बाब चुकीची आहे.

कराडात काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांचा निषेध ; प्रशासनाला निवेदन सादर;

वेध माझा ऑनलाईन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना जीवंतपणे छातीत गोळ्या घालण्याची धमकी भाजपाचे प्रवक्ता पिंटू महादेवन यांनी केरळमधील एका भाषणात उघडपणे दिली होती. या अमानुष व लोकशाहीला गळा घालणाऱ्या वक्तव्याचा कराडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे केरळचे मा. मुख्यमंत्री यांना संबंधित प्रवक्त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील,  राजेंद्र चव्हाण, माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात, पाटील, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी,  सुभाषराव पाटील, विठ्ठलराव शिखरे, नानासो जाधव, दीपक पाटील, गजानन आवळकर, संजय माळी, दत्तात्रय काशीद, शशिकांत महापुरे, नितीन पाटील, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, कराड चे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, संतोष जगताप, पंकज पिसाळ, भीमराव पाटील, शब्बीर मुजावर, देवदास माने, जयवंतराव पाटील, सुरेश भोसले, सयाजी पाटील आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, “विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये संविधान बचावासाठी चळवळ उभी केली आहे. मात्र, या विचाराला दडपून टाकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. याचाच प्रत्यय भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्या वक्तव्याने झाला आहे. महात्मा गांधींजींची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने राहुल गांधींची हत्या करण्याचा कट त्यांनी व्यक्त केला, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. संविधान वाचवण्याचा विचार देशभर राहुल गांधी करत असताना भाजप त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.

"त्या' भाजपा प्रवक्त्याला अटक करा ; कराड तालुका काँग्रेसकडून निवेदन सादर; कराड तालुक्यात काँग्रेसने तडकाफडकी तालुकाध्यक्ष का बदलले ? कराड दक्षिणमध्ये वाढलेली मते व त्याबाबतचे पत्रकारांना पुरावे देण्याचं काय झाले? काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देणे का टाळले ; पत्रकारांच्यात चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवंतपणी गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्त्याला अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने कराडचे मा. तहसीलदार यांना देण्यात आले.दरम्यान माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांची यावेळी उपस्थिती नव्हती याची चर्चा पत्रकारांच्यात पुन्हा झाली यावेळी पत्रकारांनी याच काही संदर्भातील विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तरे देणे उपस्थित नेत्यांनी टाळले

यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील,  राजेंद्र चव्हाण, माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात, पाटील, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी,  सुभाषराव पाटील, विठ्ठलराव शिखरे, नानासो जाधव, दीपक पाटील, गजानन आवळकर, संजय माळी, दत्तात्रय काशीद, शशिकांत महापुरे, नितीन पाटील, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, कराड चे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, संतोष जगताप, पंकज पिसाळ, भीमराव पाटील, शब्बीर मुजावर, देवदास माने, जयवंतराव पाटील, सुरेश भोसले, सयाजी पाटील आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान नुकतेच काँग्रेसने कराड तालुक्यात नामदेव पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नेमणूक अचानक का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे  विश्वासू मानले जात होते. तथापि, शिंदे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच त्यांना डावलून काँग्रेसने तातडीने नूतन अध्यक्ष नेमल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पत्रकारांनी आज उपस्थित काँग्रेस नेत्यांना विचारणा केली असता आजचा तो विषय नाहीये त्यावर नंतर बोलू असे म्हणत नेत्यांनी उत्तर देणे टाळले 
तसेच कराड दक्षिणमध्ये 40 हजारांनी मते वाढल्याचा दावा काँग्रेसचे ओबीसी नेते भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याबाबत पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र पत्रकारांनी याच संदर्भात विचारले असता काँग्रेसच्या नेत्यांनी याचेही उत्तर देण्याचे सरळसरळ टाळले. “हा प्रश्न काँग्रेसनेच उपस्थित केला आहे, आम्ही फक्त स्पष्टीकरण मागतो आहोत” असे पत्रकारांनी स्पष्ट सांगितले तरीही या नेत्यांनी विषयांतर करत उत्तर देणे टाळले.
दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने पत्रकारांच्यात चर्चा आणखी रंगली. शिंदे हे भाजप आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आणि त्याच वेळी तालुकाध्यक्षपदाची तडकाफडकी झालेली नवीन नेमणूक या दोन्ही चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहेत... 
दरम्यान यावेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यामुळे... जर आरोप व दावे खरे असतील तर उत्तरे का दिली नाहीत? अशी चर्चा सुरू झाली आहे.