Monday, November 2, 2026

कराड पालिकेच्या पंपिंग स्टेशन क्रमांक 1 चे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाइन।
आज सोमवारी सायंकाळी शहरातील शनिवार पेठेतील यशवन्त हायस्कुल मागील परिसरातील कराड पालिकेच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशन क्रमांक 1 चे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कराडच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली

यावेळी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव  तसेच सर्व  नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळासाहेब पाटील व नगराध्यक्ष यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पालकमंत्री देसाई यांचे आभार मानले 

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरे ... मला माहित नाही... माहिती घेतो... आणि मग बोलतो अशाच सुरात दिली... मात्र काही प्रश्नावर ते सविस्तर बोलले हेही खरे आहे!

त्यापैकी पदवीधर निवडणुकीतील पराभवावरून  जयकुमार गोरेंच्या विधानावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली
पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर जयकुमार गोरेंनी महायुतीतील घटक पक्षांवर फसवणुकीची शंका व्यक्त केली होती. यावर बोलताना शंभूराज देसाईंनी गोरेंनी कुणाचंही नाव घेतलं नसल्याचं म्हटलंय. महायुतीतील वीसपेक्षा अधिक घटक पक्ष एकत्र बसून पराभवाची कारणं शोधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेने आपल्या परीने प्रयत्न केल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे यांच्या जावयाला सरकारने १२०० एकर सुपीक जमीन दिल्याच्या आरोपावर देसाईंनी सावध भूमिका घेतली. या प्रकरणाची आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने माहिती घेतल्यानंतरच भाष्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सांगलीला पाणी रोखल्याच्या आरोपावरही देसाईंनी स्पष्टीकरण दिलं. अल निनोच्या प्रभावामुळे कोयना धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टीएमसीने कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी आणि राखीव साठ्याचं नियोजन लक्षात घेऊन पाणी सोडण्याच्या प्रमाणाचा अभ्यास जलसंपदा विभागाला करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

किणी टोलनाक्यावर ऊसदरासाठी होणाऱ्या आंदोलनाबाबतही देसाईंनी भूमिका स्पष्ट केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन संचालक मंडळाने पुढाकार घेऊन बैठक आयोजित करावी आणि ऊसदराच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांनी म्हटलंय.


उड्डाणपुलावर "बिर्थडे सेलिब्रेशन' करणाऱ्या "त्या' महिला पोलिसावर कारवाई होणारच ! पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडच्या पत्रकारांना दिली ग्वाही ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडमधील कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसाने कराडच्या नवीन झालेल्या उड्डाणपुलावर आपला वाढदिवस साजरा करत त्याठिकाणी केलेल्या सेलिब्रेशन ची रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली होती तेव्हापासून शहर व परिसरात या विषयी संताप व्यक्त केला गेल्याचे पहायला मिळाले यावर माहिती घेऊन त्या संबंधित महिलेवर कारवाई करणार असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

याबाबत अधिक माहिती अशी की,

कराडमधील कोल्हापूर नाका ते नांदलापूर हा साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल... सुरुवातीपासूनच हा पूल चर्चेत आहे... प्रशस्त रस्ता आणि अडथळ्यांचा अभाव यामुळे वाहनांचा वेग इथं सुसाट सुटलाय... याच सुसाट वेगानं काही दिवसांपूर्वी चार युवकांचा जीव घेतला... भरधाव कारच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले... या दुर्घटनेनं संपूर्ण कराड हादरलं... उड्डाणपुलावर वेगाला लगाम घालण्यासाठी प्रशासन काही ठोस पावलं उचलेल, अशी अपेक्षा होती... मात्र, आता याच पुलावर महिला पोलिसांच्या बर्थ डे सेलिब्रेशनची रिल समोर आलीय...

रात्रीच्या अंधारात उड्डाणपुलावर नवी कोरी कार थांबवायची... कारसमोर पोझ द्यायच्या... बोनेटवर बसून केकसोबत वाढदिवस साजरा करायचा... आणि पायरों गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी करायची... असा सगळा शाही थाट या रिलमध्ये दिसतोय... सार्वजनिक महामार्गावर वाहन थांबवून अशा पद्धतीनं सेलिब्रेशन करणं कितपत योग्य? विशेष म्हणजे, हा प्रकार करणारी व्यक्ती पोलीस दलातील महिला कर्मचारी आहे....

एकीकडे उड्डाणपुलावर अपघातांचा धोका... दुसरीकडे चार युवकांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच अशा प्रकारचं सेलिब्रेशन... त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय... कायद्याचे धडे देणाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसवायचे का? नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा थेट सवाल कराडकर उपस्थित करत आहेत...

आता ही रिल व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला पोलिसांवर कारवाई होणार का? अशी चर्चा शहर व परिसरातील सर्वच स्तरातून होत असताना याबाबत पत्रकारांनी मंत्री शंभूराज देसाई याना विचारले असता त्या "रीलस्टार' महिला पोलिसावर कारवाई होणारच...अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी यावेळी बोलताना दिली आहे... 


कराडच्या उड्डाणपुलावर चौघांचा बळी गेला... याच उड्डाणपुलावर एका महिला पोलिसाचा बर्थडे सेलिब्रेशनचा धिंगाणा ; रिल झाली व्हायरल ; महामार्गावर वाहन थांबवून सेलिब्रेशन केल्याबद्दल पोलीस कारवाई करणार का? कराडकरांच्यात जोरदार चर्चा ;


वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या उड्डाणपुलावर चौघांचा बळी गेला... अपघातानं चौघांची घरं उद्ध्वस्त झाली... पण याच उड्डाणपुलावर आता एका महिला पोलिसांचा बर्थ डे सेलिब्रेशनचा धिंगाणा समोर आलाय... नवी कोरी कार उड्डाणपुलावर थांबवली... कारच्या बोनेटवर केक ठेवला... पायरों गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी केली... आणि या सगळ्या थाटाचा रिल बनवून सोशल मीडियावर टाकला... विशेष म्हणजे, कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच महिला पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करण्यात आलीय... त्यामुळे कराडकरांचा संताप अनावर झालाय...

कराडमधील कोल्हापूर नाका ते नांदलापूर हा साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल... सुरुवातीपासूनच हा पूल चर्चेत आहे... प्रशस्त रस्ता आणि अडथळ्यांचा अभाव यामुळे वाहनांचा वेग इथं सुसाट सुटलाय... याच सुसाट वेगानं काही दिवसांपूर्वी चार युवकांचा जीव घेतला... भरधाव कारच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले... या दुर्घटनेनं संपूर्ण कराड हादरलं... उड्डाणपुलावर वेगाला लगाम घालण्यासाठी प्रशासन काही ठोस पावलं उचलेल, अशी अपेक्षा होती... मात्र, आता याच पुलावर महिला पोलिसांच्या बर्थ डे सेलिब्रेशनची रिल समोर आलीय...

रात्रीच्या अंधारात उड्डाणपुलावर नवी कोरी कार थांबवायची... कारसमोर पोझ द्यायच्या... बोनेटवर बसून केकसोबत वाढदिवस साजरा करायचा... आणि पायरों गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी करायची... असा सगळा शाही थाट या रिलमध्ये दिसतोय... सार्वजनिक महामार्गावर वाहन थांबवून अशा पद्धतीनं सेलिब्रेशन करणं कितपत योग्य? विशेष म्हणजे, हा प्रकार करणारी व्यक्ती पोलीस दलातील महिला कर्मचारी आहे....

एकीकडे उड्डाणपुलावर अपघातांचा धोका... दुसरीकडे चार युवकांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच अशा प्रकारचं सेलिब्रेशन... त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय... कायद्याचे धडे देणाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसवायचे का? नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा थेट सवाल कराडकर उपस्थित करत आहेत...

आता ही रिल व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला पोलिसांवर कारवाई होणार का? महामार्गावर अशा प्रकारे वाहन थांबवून सेलिब्रेशन केल्याची दखल पोलीस प्रशासन घेणार का? की सोशल मीडियावर रिल व्हायरल होईल आणि प्रकरण तिथंच थंडावेल? याकडे कराडकरांचं लक्ष लागलंय...




Sunday, November 1, 2026

पाटण सोसायटी गटात 104 मतदारांपैकी शंभूराज देसाई यांच्यासोबत 58 मतदारांनी येऊन मतदान केले ; शंभूराज देसाई म्हणाले... विजय आमचाच ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकित 
पाटणमध्ये पाटण विकास सेवा सोसायटी गटात मंत्री शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर हे उमेदवार आहेत पाटण विकास सेवा सोसायटी गटात महायुतीत चुरशीची लढत होत आहे

शंभूराज देसाई यांच्यासोबत येऊन 104 पैकी 58 ठरावधारक  मतदारानी मतदान केले 
मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे 
दरम्यान आपण सामान्य मतदारांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवत असल्याचं सांगत आपल्याला अनेक सहकाऱ्यांनी विश्वासाने मतदान केल्याचा दावाही शंभूराज देसाई यांनी केला आहे त्यामुळे विजय आपला असल्याचे ते म्हणाले... 

दरम्यान कराडमध्ये  दोन दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी 'सबको मौका मिलता है' असं विधान केल्याबाबत विचारलं असता, निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन यावर चर्चा करणार असल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं... 


ऍड उदयसिह पाटील यांनी 146 मतदारांपैकी 105 मतदारांना ट्रॅव्हल्समधून कराडच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मतदान केंद्रावर आणले ; अतुलबाबा म्हणाले ;विजय उदयदादांचाच होणार ...


वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज कराड सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे नेते ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष  धनाजी पाटील यांच्यात लढत होत असून यानिमित्ताने महायुतीत बंडखोरी झाली असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जमा असल्याचे पाहायला मिळत आहे 

राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 146 मतदारांपैकी आपल्यासोबत 105 मतदारांना सहलीवरून ट्रॅव्हल्स मधून कराडच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मतदान केंद्रावर आणले आहे.त्याचा सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले हेही होते.यावेळी आमदार अतुलबाबांनी उदयदादा हेच या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला

Saturday, October 31, 2026

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान ; जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश ; पोलिसांचा चोख बंदोबस्त ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई  आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
 
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेशदेखील याठिकाणी लागू केले आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहलीला पाठवण्यात आलेले मतदार आता थेट मतदान केंद्रावर पोहचणार असल्याची माहिती आहे.

यानिवडणुकीत दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यानिवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी पृथ्वीराज चव्हाणांचे घेतले आशीर्वाद

वेध माझा ऑनलाइन 
: पुणे पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड झालेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी आज कराड येथील पाटण कॉलनीमधील निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदवीधर आणि युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तसेच जनहिताचे मुद्दे प्रभावीपणे विधिमंडळात मांडण्यासाठी त्यांनी आपली भूमिका सक्षमपणे पार पाडावी, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

यावेळी हर्षदा देशमुख-जाधव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे आशीर्वाद घेतले. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देणे, युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच सर्वसामान्यांच्या आणि जनहिताच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे मांडणे यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास आ. हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या विचारधारेनुसार पदवीधर, युवक तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील, कराडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक सौरभ पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, NSUI जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अमित जाधव, पंचायत समिती सदस्य रवींद्र बडेकर, सातारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल चव्हाण, रोटरी अध्यक्षा गौरी चव्हाण, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा महामूलकर, संगीता साळुंखे, सैदापूरचे नाना जाधव, सचिन पाटील, ॲड. एम. टी. देसाई, ॲड. पंडितराव हरदास, ॲड. धीरज जाधव, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, प्रशांत देशमुख, अक्षय सुर्वे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष देवदास माने, युवक काँग्रेस कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, मलकापूर काँग्रेस अध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.