राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या निर्णयासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. त्यांच्या विशेष प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंञी एकनाथ शिंदे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,कराड चे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे अर्जुन कोळी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment