श्री. अभिषेक भोसले
office_of_abhishek bhosale
+919096665511
युवा उद्योजक समाजसेवक
प्रति
मा. मुख्याधिकारी साहेब
कराड नगरपरिषद कराड
दि: 29-06-2026
विषय :- बुधवार पेठ मधील साठे इमारत मुख्य रस्ता ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट यांच्या समोरील रस्त्यावर भाजी मंडई बसून न देणे बाबत........
महोदय,
आम्ही सर्व अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.
कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.
त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी.
No comments:
Post a Comment