निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द केवळ राजकीय औपचारिकता न ठेवता तो प्रत्यक्षात उतरविण्याची भूमिका अतुलबाबांनी घेतली. त्यामुळे उंडाळकर यांच्या विजयामागे राजकीय पाठबळाबरोबरच परस्पर विश्वासाचे नातेही अधोरेखित झाले आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतःची राजकीय भूमिका आणि स्थान कायम ठेवतानाच सहकारातील सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळण्याची भूमिका अतुलबाबांनी घेतली. यामुळे त्यांच्या राजकीय व्यवहारातील विश्वासार्हतेची चर्चा सुरू झाली आहे.
राजकारणात डावपेच महत्त्वाचे असतात पण दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती नेतृत्वाची खरी ओळख ठरते. उदयसिंहदादा पाटील उंडाळकर यांच्या विजयाच्या निमित्ताने अतुलबाबा भोसले यांनी हीच भूमिका अधोरेखित केली असून, जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
No comments:
Post a Comment