Thursday, April 16, 2020

ना.शंभूराज देसाई यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा...प्रशासनाला केल्या महत्वपूर्ण सूचना...

सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री व वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॉकडाऊन काळातील वाशिम जिल्हयातील उपाययोजनां संदर्भात सर्व शासकीय जिल्हास्तरीय अधिकारी यांचा आढावा घेतला.केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच रास्तभाव दुकानांमधून वितरीत होणाऱ्या अन्नधान्य वितरणाची कार्यवाही अधिक गतीने करून प्रत्येक पात्र व्यक्तीला धान्य मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी आढावा बैठकीत दिल्या.

          लॉकडाऊन परिस्थितीत वाशिमला जाणे शक्य नसल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर,जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आदी सहभागी झाले होते.

           यावेळी वाशिम जिल्ह्यात आपल्या वेळोवेळीच्या सुचनानुसार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ५० बेडचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींवर उपचारासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कोविद केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या ६ सेंटरची एकूण क्षमता ५०० बेड ठेवण्यात येणार आहे. आपले आदेशानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या १ कोटी रुपयांमधून पीपीई कीट,मास्क, व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी हृषीकेशफ मोडक यांनी यावेळी सांगत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.

             तसेच जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.तसेच चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांची वाहने सुद्धा जप्त केली जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहऱ्यावर मास्क,रुमाल,गमछा न बांधणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी दिली.

              यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने जिल्ह्यात यापुढे सुद्धा संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी.जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश देवू नये, मुंबई, पुणे शहरातून वाशिमकडे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून त्यांची अडवणूक करण्याकरीता औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्हयाच्या हद्दीवर चेकपोस्ट करण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे त्यानुसार त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगून त्यांनी विविध योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाची कार्यवाही अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या हिस्स्याचे धान्य मिळेल,यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन त्याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा.धान्य वाटपाबाबत तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी,त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवून लोकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन दयावा अशा सुचनाही ना.देसाईंनी यावेळी दिल्या.

जिल्हयातील सर्व
अधिकाऱ्यांनीही स्वत:च्या
आरोग्याची काळजी घ्या. -- ना.देसाई.

              कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना जिल्हयामध्ये राबविताना जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी जनतेच्या काळजीबरोबर स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेवून काम करावे. वाशिम जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांचे काम उत्कृष्ट असून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली टीमवर्क करुन चांगल्या प्रकारे कोरोनावर वाशिम जिल्हयाने प्रतिबंध केला आहे ही कौतुकास्पद बाब आहे असेही ना.देसाई म्हणाले..

कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी 21 हजार जण इच्छुक...मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद...


मुंबई : कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरोग्य क्षेत्राशी सबंधित २१ हजार जणांनी तशी इच्छा व्यक्त केली असून त्यांचे अर्ज आता  छाननी करून त्या त्या जिल्ह्यांकडे प्रत्यक्ष सोपविण्याचे काम सुरु आहे.

कोरोनाच्या या लढ्यात शासनाला प्रत्यक्ष सहभागी होऊन मदत करावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. डॉक्टर्स, आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता  covidyoddha@gmail.com   या ई मेलवर नोंदवावे  असे सांगितले होते.

अवघ्या ५ दिवसांत २१ हजार जणांनी विविध अर्ज करून तशी इच्छा व्युक्त केली. यामध्ये ९४३ डॉक्टर्स, ३३१२ परिचारिका, ११४१ फार्मसिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ८६३, वार्ड  बॉय७६६, पॅरा वैद्यकीय ६१४, इतर वैद्यकीय ५६९, सैन्यातील निवृत्त ७६ तसेच इतर व्यक्तींमध्ये समाज सेवक, वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून  काम करण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. या सर्वांसाठी एक गुगल फॉर्म देण्यात आला. त्यातून सुमारे १८ हजार व्यक्तींनी हे फॉर्म भरून दिले.

आता या व्यक्तींना आवश्यकतेनुसार विविध जिल्ह्यांत पाठविण्यात येईल. सबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे  या वैद्यकीय स्वयंसेवकांना जबाबदारी देतील असे काल झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ठरले.

पाच जण निगेटिव्ह ; नऊ जण विलीगिकरण कक्षात दाखल


सातारा: क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 5 कोरोना अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 9 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 4 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 3, कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे 2 नागरिकांना तीव्र जंतु संसर्गामुळे अशा एकूण 9 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

Wednesday, April 15, 2020

कराड पालिकेतील "त्या' धाडसी वाघांचा लोकशाही आघाडीच्या दालनात सत्कार



कराड- कराड तालूक्यातील कोरोना बाधीत व्यक्तीचे निधन झाल्या नंतर ते मृतदेह आपल्या ambulance ने वैकुंठ स्मशानभूमी येथे धाडसाने घेऊन जाणारे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर बर्गे तसेच त्या बाधितांचा  दहनविधी करणारे पालिका कर्मचारी श्री. राम भिसे, श्री मनोज गायकवाड, श्री पराशूराम अवघडे, श्री योगेश कांबळे, श्री भगवान ढेकळे, श्री सतीश भिसे, श्री भास्कर काटरे यांचा लोकशाही आघाडी च्या पालिकेतील दालनात सत्कार करण्यात आला.त्यावेळी नगरसेवक सौरभ पाटील,  बांधकाम सभापती  हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, तसेच शिवाजी पवार तात्या, आणि जयंत बेडेकर आदी उपस्थित होते
  

सातारा जिल्ह्यात चार रुग्ण पोसिटीव्ह आढळले...



सातारा :
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याचे पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार  कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

Tuesday, April 14, 2020

मे महिन्याच्या 3 तारखेपर्यंत भारत लॉक डाऊन- पंतप्रधानांची घोषणा

मेपर्यंत भारत लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात सुरू असणाऱ्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मेपर्यंत भारतात लॉकडाऊन असल्याचं सांगितलं आहे.

व 

काय आहे मोदींची सप्तपदी 



नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी :-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ''देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे.'
देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 'तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. एवढचं नाहीतर प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या कर्तव्याचं पालन केलं आहे.  अनेकांना खूप त्रास सहन करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हीच खरी आदरांजली आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यातं लॉकडाऊनमध्येच नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,' असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, 'कोरोनाचं वैश्विक संकट आहे त्यामध्ये कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य नाही. पण जर जगभरातील मोठ्या देशांतील कोरोनाचे आकडे पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारत फार चांगल्या परिस्थितीत आहे. महिन्या भरापूर्वी अनेक देश कोरोनाच्या आकड्यांमध्ये भारतासोबत होते. पण आता त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिलं तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे. पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.'
'जगभरातील कोरोनाच्या प्रादूर्भावाची स्थिती आपल्या सर्वांना माहितच आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 100 होण्याआधीच भारतानं विदेशी नागरिकांना 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे फक्त 550 रूग्ण होते तेव्हाच भारतानं 21 दिवसांचा लॉकडाऊन केला. भारतानं कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची वाट नाही पाहिली. तात्काळ निर्णय घेऊन समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
देशातील जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, 'कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे. या सगळ्या प्रयत्नांनंतरही करोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्यानं सगळ्यांना सतर्क केलं आहे. भारतात पण करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसं व्हायचं, नुकसान कमी कसं होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला आहे.'

Sunday, April 12, 2020

डांगेना बाजूला ठेवा... आणि सर्वच नगरसेवकांनी शहरासाठी एकत्र या... नगराध्यक्षा शहराच्या आरोग्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरल्या...


अजिंक्य गोवेकर
कराड
येथील पालिकेतील राजकारण कोणत्या वेळेला तापेल हे सांगता येत नाही.नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी येथील मुख्याधिकारी डांगे यांची शहरातील औषध फवारणी बाबतीतील पोलखोल केल्यानंतर अनेक नगरसेवक याबाबतीत लोकांसाठी म्हणून पुढे येऊन बोलू लागले. खरतर, येथील प्रत्येक नेत्याला शहराची काळजी आहे. मात्र सीओ. च्या अडमुठे पणाचा शहरापुढे मोठा प्रश्न आहे.त्या करिता सध्या सर्वच नगरसेवकांनी पार्टीचे जोडे बाजूला ठेवून आपापल्या पद्धतीने कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याची  गरज आता निर्माण झाली आहे.दरम्यान नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी पुन्हा पालिकेच्या अग्निशामक गाडीतून सम्पूर्ण शहरातून औषध फवारणी करण्यास स्वतः रस्त्यावर उतरून सुरूवात केली आहे.
शहरात सध्या औषध फवारणीचा मुद्दा जोरात चर्चेत आहे. पालिकेच्या वतीने फवारणी चालू असताना ती अध्यक्षांमुळे बंद झाल्याचे सीओ. चे म्हणणे आहे,तर सीओ. नि मोठ्या गाडीतून होणारी फवारणी थांबवून ती खासगी ट्रेकटर मधून कोणाच्या फायद्यासाठी सुरू केली? असा उलट सवाल नगराध्यक्षानी सीओ.ना केला. या दोघांच्या वादात शहरातील फवारणी थांबली हे भोंगळ व स्वार्थी राजकारण असल्याचे सांगत या बाबत संबंधित शासन पातळीवर तक्रार करण्याची तयारी यादव गटाने दाखवली.म्हणजे एकूणच सर्व नगरसेवक शहराबाबतीत संवेदनशील असताना एकमेकांत समज,गैरसमजातून गावाला वेठीस धरण्याचा प्रकार घडत असल्याचा या निमित्ताने लोक आरोप करु लागले, त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीला सीओ. यांची दरवेळी प्रमाणे वादग्रस्त कामाची पद्धत कारणीभूत ठरत आहे का? हे पाहून त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवत सर्वच नगरसेवकांनी राजकारण विरहित गावासाठी एकत्र आले पाहिजे व कोरोनाशी लढा दिला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे.
शहरात सध्याचे जे  राजकारण सुरू आहे त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर नगराध्यक्षा सौ. शिंदे असतील,लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील असतील, गटनेते यादव व त्यांचे सहकारी नगरसेवक असतील हे सगळेच शहरासाठी झटत आहेत.ही वेळ नाही राजकारण करण्याची अशी या सगळ्यांचीच भावना आहे.शहराबाबत सर्वानाच आपल्या कुटुंबइतकेच प्रेम आहे. असे असताना यांच्यात वाद का होत आहेत... याचा परामर्ष काढणे गरजेचं आहे.
सीओ. डांगे यांची कारकीर्द तशी शहरात वादगरत म्हणूनच चर्चेत असते.त्यांचे स्वच्छते बाबतीतील काम कौतुकास्पद झाले खरे,पण त्यांना ते कौतुक फार पचल्याचे दिसले नाही. त्या नंतर त्यांनी येथील व्यापाऱ्यांना त्रास होणारी व दुजाभाव करणारी  राबवलेली अतिक्रमण मोहीम असो, काही अधिकार नसताना स्वतः चा जाहीर केलेला व नंतर जनतेने हाणून पाडलेला लॉक डाऊन असो,  किंवा नगराध्यक्ष याना अधिकार नसताना बजावलेली अपत्रतेची नोटीस असो या आणि अशा अनेक फ्लॉप कामाच्या निमित्ताने त्यांची मानसिकता शहराबद्दल काय असावी हे समजून येते.आणि अशा व्यक्तीच्या नादाला लागून आपसात वाद घालण्याची ही वेळ नाही हे आतातरी कळायला हवे. पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की या सीओ. ने  गावचे वाटोळे केले,याने आमच्या पार्टीचा इस्कोट केला, आणि आता पार्टी कोण चालवतय हेच मला कळेना झालंय...म्हणजे शहराचे उपनगराध्यक्ष जेव्हा इतपत बोलतात तेव्हा या सीओ. चा पालिकेच्या राजकारणातील हस्तक्षेप किती वाढलाय हे लक्षात येते. गावाबद्दल काडीची आपुलकी नसलेल्या अशा रावसाहेबांच्या नादाला किती लागायचे याचाही विचार होणे गरजेचे आहे.
सध्याच्या घडीला कोरोनाच संकट मोठं आहे अशावेळी नगरसेवकांच्यात वाद होईल अशी कोणतीही गोष्ट जबाबदार अधिकारी म्हणून यांच्याकडून झालीच नाही पाहिजे.मात्र त्यांनी  नगरसेवकांच्यात वाद लावण्याचा उद्योग अध्यक्षांच्या सहीचा मुद्दा पुढे करून केला आणि शहरात फवारणी युद्ध पेटले.नगराध्यक्षाच्या सहीशिवाय या सीओ नी बँकेतून चेक वठवल्याच्या चर्चा पालिकेत ऐकायला मिळतात, आणि सही शिवाय हे सीओ फवारणी करू का शकले नाहीत? याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही. यावेळेला असे राजकारण करण्यामागे आपल्या व नगराध्यक्षा यांच्या एकमेकांशी असणाऱ्या वादाच्या उकराउकरी ची संधी आता आपल्याला मिळाली आहे अस त्यांना वाटल असाव कदाचित ? मात्र याची आता गरज नव्हती.इतर भानगडी जशा झाकली मूठ ते ठेवतात तशी ही बाब चर्चेची न होता आपसात क्लिअर होऊन शहरातील फवारणी व मदतीचा ओघ कायम राहिला असता, मात्र तसे झाले नाही. उलट सीओ. ना यावेळेला शहरात चाललेलं एकूण सगळंच काम,, आहे असं व्यवस्थित चालू ठेऊन आपली शहरातील असणारी इमेज मोठी करण्याची संधी होती खरी,मात्र ती त्यांनी आपल्या हाताने घालवली, व नेत्यांच्यात वाद लावून शहरात याबाबत उगाचच चर्चा घडवून आणली. तर दुसरीकडे नगराध्यक्षानी या चर्चेला उत्तरे देऊन पुन्हा शहराच्या सेवेसाठी रस्त्यावर येऊन त्या लोकांच्या आरोग्यासाठी कार्यरत झाल्या आहेत.  सीओ नि मात्र यानिमित्ताने आपली आणखी एक फ्लॉप इनिंग खेळून स्वतःच हसू पुन्हा करून घेतलं आशा यानिमित्ताने आता चर्चा सुरू झाल्यात. सिओ. यांनी अतिक्रमनाच्या बाबतीत असच केलं होतं,नगरसेवकांना काही कल्पना न देता चुकीच्या पद्धतीने ही मोहीम राबवून शहरातील लोकं नाराजं केली,आणि नंतर निस्तरायला नगरसेवकांना तोंडाला दिले .तोच प्रकार आता इथं होताना दिसला म्हणजे, सहीचा मुद्दा उपस्थित केला सीओ. नी ...व आपसात वाद  घालत बसले नगरसेवक... यामध्ये नुकसान शहराच होतंय हे लक्षात घेऊन संबंधितांनी  सीओ. डांगे याना यापुढील निर्णय प्रक्रियेपासून लांब ठेवणे गरजेचे आहे,म्हणजे सगळेच नगरसेवक एकत्रितपणे आणि एकविचाराने शहरातील कोरोनाशी यशस्वीपणे दोन हात करू शकतील अशी शहरात चर्चा आहे.