Sunday, April 12, 2020

डांगेना बाजूला ठेवा... आणि सर्वच नगरसेवकांनी शहरासाठी एकत्र या... नगराध्यक्षा शहराच्या आरोग्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरल्या...


अजिंक्य गोवेकर
कराड
येथील पालिकेतील राजकारण कोणत्या वेळेला तापेल हे सांगता येत नाही.नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी येथील मुख्याधिकारी डांगे यांची शहरातील औषध फवारणी बाबतीतील पोलखोल केल्यानंतर अनेक नगरसेवक याबाबतीत लोकांसाठी म्हणून पुढे येऊन बोलू लागले. खरतर, येथील प्रत्येक नेत्याला शहराची काळजी आहे. मात्र सीओ. च्या अडमुठे पणाचा शहरापुढे मोठा प्रश्न आहे.त्या करिता सध्या सर्वच नगरसेवकांनी पार्टीचे जोडे बाजूला ठेवून आपापल्या पद्धतीने कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याची  गरज आता निर्माण झाली आहे.दरम्यान नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी पुन्हा पालिकेच्या अग्निशामक गाडीतून सम्पूर्ण शहरातून औषध फवारणी करण्यास स्वतः रस्त्यावर उतरून सुरूवात केली आहे.
शहरात सध्या औषध फवारणीचा मुद्दा जोरात चर्चेत आहे. पालिकेच्या वतीने फवारणी चालू असताना ती अध्यक्षांमुळे बंद झाल्याचे सीओ. चे म्हणणे आहे,तर सीओ. नि मोठ्या गाडीतून होणारी फवारणी थांबवून ती खासगी ट्रेकटर मधून कोणाच्या फायद्यासाठी सुरू केली? असा उलट सवाल नगराध्यक्षानी सीओ.ना केला. या दोघांच्या वादात शहरातील फवारणी थांबली हे भोंगळ व स्वार्थी राजकारण असल्याचे सांगत या बाबत संबंधित शासन पातळीवर तक्रार करण्याची तयारी यादव गटाने दाखवली.म्हणजे एकूणच सर्व नगरसेवक शहराबाबतीत संवेदनशील असताना एकमेकांत समज,गैरसमजातून गावाला वेठीस धरण्याचा प्रकार घडत असल्याचा या निमित्ताने लोक आरोप करु लागले, त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीला सीओ. यांची दरवेळी प्रमाणे वादग्रस्त कामाची पद्धत कारणीभूत ठरत आहे का? हे पाहून त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवत सर्वच नगरसेवकांनी राजकारण विरहित गावासाठी एकत्र आले पाहिजे व कोरोनाशी लढा दिला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे.
शहरात सध्याचे जे  राजकारण सुरू आहे त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर नगराध्यक्षा सौ. शिंदे असतील,लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील असतील, गटनेते यादव व त्यांचे सहकारी नगरसेवक असतील हे सगळेच शहरासाठी झटत आहेत.ही वेळ नाही राजकारण करण्याची अशी या सगळ्यांचीच भावना आहे.शहराबाबत सर्वानाच आपल्या कुटुंबइतकेच प्रेम आहे. असे असताना यांच्यात वाद का होत आहेत... याचा परामर्ष काढणे गरजेचं आहे.
सीओ. डांगे यांची कारकीर्द तशी शहरात वादगरत म्हणूनच चर्चेत असते.त्यांचे स्वच्छते बाबतीतील काम कौतुकास्पद झाले खरे,पण त्यांना ते कौतुक फार पचल्याचे दिसले नाही. त्या नंतर त्यांनी येथील व्यापाऱ्यांना त्रास होणारी व दुजाभाव करणारी  राबवलेली अतिक्रमण मोहीम असो, काही अधिकार नसताना स्वतः चा जाहीर केलेला व नंतर जनतेने हाणून पाडलेला लॉक डाऊन असो,  किंवा नगराध्यक्ष याना अधिकार नसताना बजावलेली अपत्रतेची नोटीस असो या आणि अशा अनेक फ्लॉप कामाच्या निमित्ताने त्यांची मानसिकता शहराबद्दल काय असावी हे समजून येते.आणि अशा व्यक्तीच्या नादाला लागून आपसात वाद घालण्याची ही वेळ नाही हे आतातरी कळायला हवे. पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की या सीओ. ने  गावचे वाटोळे केले,याने आमच्या पार्टीचा इस्कोट केला, आणि आता पार्टी कोण चालवतय हेच मला कळेना झालंय...म्हणजे शहराचे उपनगराध्यक्ष जेव्हा इतपत बोलतात तेव्हा या सीओ. चा पालिकेच्या राजकारणातील हस्तक्षेप किती वाढलाय हे लक्षात येते. गावाबद्दल काडीची आपुलकी नसलेल्या अशा रावसाहेबांच्या नादाला किती लागायचे याचाही विचार होणे गरजेचे आहे.
सध्याच्या घडीला कोरोनाच संकट मोठं आहे अशावेळी नगरसेवकांच्यात वाद होईल अशी कोणतीही गोष्ट जबाबदार अधिकारी म्हणून यांच्याकडून झालीच नाही पाहिजे.मात्र त्यांनी  नगरसेवकांच्यात वाद लावण्याचा उद्योग अध्यक्षांच्या सहीचा मुद्दा पुढे करून केला आणि शहरात फवारणी युद्ध पेटले.नगराध्यक्षाच्या सहीशिवाय या सीओ नी बँकेतून चेक वठवल्याच्या चर्चा पालिकेत ऐकायला मिळतात, आणि सही शिवाय हे सीओ फवारणी करू का शकले नाहीत? याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही. यावेळेला असे राजकारण करण्यामागे आपल्या व नगराध्यक्षा यांच्या एकमेकांशी असणाऱ्या वादाच्या उकराउकरी ची संधी आता आपल्याला मिळाली आहे अस त्यांना वाटल असाव कदाचित ? मात्र याची आता गरज नव्हती.इतर भानगडी जशा झाकली मूठ ते ठेवतात तशी ही बाब चर्चेची न होता आपसात क्लिअर होऊन शहरातील फवारणी व मदतीचा ओघ कायम राहिला असता, मात्र तसे झाले नाही. उलट सीओ. ना यावेळेला शहरात चाललेलं एकूण सगळंच काम,, आहे असं व्यवस्थित चालू ठेऊन आपली शहरातील असणारी इमेज मोठी करण्याची संधी होती खरी,मात्र ती त्यांनी आपल्या हाताने घालवली, व नेत्यांच्यात वाद लावून शहरात याबाबत उगाचच चर्चा घडवून आणली. तर दुसरीकडे नगराध्यक्षानी या चर्चेला उत्तरे देऊन पुन्हा शहराच्या सेवेसाठी रस्त्यावर येऊन त्या लोकांच्या आरोग्यासाठी कार्यरत झाल्या आहेत.  सीओ नि मात्र यानिमित्ताने आपली आणखी एक फ्लॉप इनिंग खेळून स्वतःच हसू पुन्हा करून घेतलं आशा यानिमित्ताने आता चर्चा सुरू झाल्यात. सिओ. यांनी अतिक्रमनाच्या बाबतीत असच केलं होतं,नगरसेवकांना काही कल्पना न देता चुकीच्या पद्धतीने ही मोहीम राबवून शहरातील लोकं नाराजं केली,आणि नंतर निस्तरायला नगरसेवकांना तोंडाला दिले .तोच प्रकार आता इथं होताना दिसला म्हणजे, सहीचा मुद्दा उपस्थित केला सीओ. नी ...व आपसात वाद  घालत बसले नगरसेवक... यामध्ये नुकसान शहराच होतंय हे लक्षात घेऊन संबंधितांनी  सीओ. डांगे याना यापुढील निर्णय प्रक्रियेपासून लांब ठेवणे गरजेचे आहे,म्हणजे सगळेच नगरसेवक एकत्रितपणे आणि एकविचाराने शहरातील कोरोनाशी यशस्वीपणे दोन हात करू शकतील अशी शहरात चर्चा आहे.

No comments:

Post a Comment