Friday, June 5, 2020

आणखी 19 जण पॉझिटिव्ह ; जिल्ह्यात कोरोनाची दहशत वाढली

सातारा दि. 6 (जिमाका) : सातारा जिल्हयातील एकोणीस जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा कोविड बाधित आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे वडगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
काल रात्री उशिरा प्राप्त  झालेल्या रिपोर्टनुसार *फलटण तालुक्यातील होळ* येथील 7 व तांबवे येथील  6.
*कराड तालुकयातील तुळसण* येथील 5.
*खंडाळा तालुक्यातील शिरवळ* येथील 1.
यामध्ये 3 ते 65 वर्षे वयोगटातील अकरा पुरुष व आठ महिलांचा समावेश असुन एक जण प्रावास करुन आलेला व अठरा जण कोविड बाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत.
000000

कराड तालुक्यात सापडले दोन जण पॉझिटिव्ह

सातारा दि. 5 (जिमाका)
कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष असे दोन जणांचा रिपोर्ट कोरोना  (कोविड 19) बाधित आहेत. तसेच 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*6 जणं कोरोनामुक्त*
कोविड केअर केंद्र खावली ता. सातारा येथील 2 व   कोविड  केअर केंद्र, रायगाव ता. जावली येथील 4 असे एकूण 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 68, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 15, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 93, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 असे एकूण 215 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

Thursday, June 4, 2020

जिल्ह्यातील 18 जण सापडले पोझिटिव्ह ; रुग्ण संख्येत पडली आणखी भर ; चिंता वाढली

सातारा दि. 5 (जिमाका)
 सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला  आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये *खटाव तालुक्यातील* साठेवाडी येथील 76 वर्षीय महिला, गुरसाळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष
(मृत)
*खंडाळा तालुक्यातील* अर्बन सिटी धनगरवाडी 50 वर्षीय महिला
*सातारा तालुक्यातील* समर्थनगर कोंडोली सातारा येथील 19 वर्षीय युवक, करंडी येथील 25 वर्षीय महिला
*कराड तालुक्यातील* वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवती
*फलटण तालुक्यातील* जोरगाव येथील 25 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक व 12 वर्षांचा मुलगा, कोळकी येथील
25 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला.
*जावली तालुक्यातील* प्रभूचीवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कावडी येथील 15 वर्षाचा मुलगा, 58 वर्षीय पुरुष,
 47 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक.
*माण तालुक्यातील* वडजल येथील 55 वर्षीय पुरुष
*175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

...तर नव्याने पुरवणी अर्थसंकल्प मांडणे गरजेचे ; आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

कराड
कोरोना महामारीच्या लॉकडाउन मुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीत केंद्र शासनाने १ फेब्रुवारी ला सादर केलेले वार्षिक अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ करीता अंदाजित केलेले राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) कर व कराशिवाय महसूल, कर्जाद्वारे उभा करावयाचा निधी तसेच विकास कामांवरील नवीन  प्राधान्यक्रम अशा सर्वच आकड्यांचे संदर्भ बदलले आहेत यासाठी अर्थसंकल्पाची फेरमांडणी होणे गरजेचे आहे.म्हणून संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प मांडणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराजबाबानी ट्विटर वरून व्यक्त केले आहे.

२२ मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत भारताचा आर्थिक विकासदर उणे राहील असा अंदाज वर्तवला आहे. गोल्डमन सॅक्स, नोमुरा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी सुद्धा यावर्षी भारताचा आर्थीक विकासदर उणे ५-७ टक्के असेल असे अंदाज वर्तविले आहेत.
लॉकडाऊन सुरू होण्या पूर्वीपासूनच भारताची अर्थव्यवस्था सतत घसरत होती. २०१९-२० आर्थीक वर्षातील अर्थव्यवस्थेचा विकासदर फक्त ४.२% नोंदवला गेला आहे, जो या दशकातील नीचांकी विकासदर आहे. हे सर्व लक्षात घेता संसदेच्या जूनमध्ये सुरु होणाऱ्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी नवीन अर्थसंकल्पाची फेरमांडणी करून बदललेल्या परिस्थितीत महसूलाची स्थीती, कर्ज काढण्याबद्दलचे अंदाज तसेच खर्चाची प्राथमिकता, विकासखर्चात संभाव्य कपात ही सर्व माहिती संसदेसमोर सादर केली पाहिजे आणि संसदेची नव्याने मंजूरी घ्यावी अशी मागणी मी करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे

नवी मुंबई,ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकांना जिल्हाअंतर्गत प्रवास करता येणार


मुंबई : राज्य सरकारने आज आदेश जारी करून राज्यातील लॉकडाऊनच्या नियमावलीत काही बदल केले आहेत. नव्या आदेशानुसार मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये  प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे आता ठाणे,नवी मुंबई,कल्याण-डोंबिवली,बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील  महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊन मध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूकीस बंदी केली होती यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणे शक्य नव्हते.राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या आदेशात खासगी कार्यालये काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.तसेच यामुळे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे आणि एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे. या नव्या आदेशानुसार मुंबई एमआरआर रिजनमध्ये  प्रवासाची परवानगी देण्यात आली असल्याने ठाणे,नवी मुंबई,कल्याण-डोंबिवली,बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील  महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करणे सुलभ झाले आहे.

Facebook

खासगी कार्यालये 8 जून पासून होणार चालू ; राज्य सरकारचा आदेश जारी

मुंबई
लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊनमधून शिथीलता देण्यास  सुरुवात करण्यात केली असून, येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश आज राज्य सरकारने जारी केला आहे. खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचा-यांच्या हजेरीत सुरू करता येवू शकतील असे या आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमधून आता काही प्रमाणात शिथीलता देण्यास सुरूवात केली आहे.राज्य सरकारने आज एक आदेश जारी करीत येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे.अशी कार्यालये सूरू करताना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असे या आदेशात म्हटले आहे. इतर कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागेल.आपली कार्यालये सुरू करताना कंपनीला कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा लागणार.अशा कार्यालयातून कर्मचारी घरी परतल्यानंतर कोणालाही लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

येत्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.त्याच बरोबर विद्यापीठ आणि महाविद्यालय,शैक्षणिक संस्थांचे कार्यालयाचेही कामकाज सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये केवळ शिकवण्याचे काम करणारे कर्मचारी यांना वगळून इतर कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ई शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे,उत्तरपत्रिका तपासणे आणि निकालाचे काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आणखी एक जण सापडला पॉझिटिव्ह

सातारा दि. 4 (जिमाका)
 कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या 16 नमुन्यांपैकी खटाव तालुक्यातील वडगाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित आला असून उर्वरित 15 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल 3 जून रोजी पाठविण्यात आलेल्या सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 16 जणांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. असे एकूण 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*161 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 28, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 14, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 52, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 व रायगाव येथील 11 असे एकूण 161 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 579 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 254 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 301 रुग्णांवर उपचार सुरु असून 24  जणांचा मृत्यु झालेला आहे.

0000