Saturday, October 19, 2024

खासदार संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूक लढविणार ? रोहीत पाटील यांच्याशी लढत होण्याची शक्यता .

वेध माझा ऑनलाइन।
कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटलेला नाही. हा मतदार संघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाईल असे म्हटले जात असून प्रभाकर पाटील हे हाती घड्याळ बांधतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील यांचा सामना रोहीत पाटील यांच्याशी होणार असे म्हटले जात आहे.प्रभाकर पाटील माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र आहेत

कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीत कवठेमहांकाळ जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही या मतदार संघातून राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होते काय याकडे लक्ष लागले आहे. कारण भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रभाकर पाटील राष्ट्रावादीच्या अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. महायुतीत हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार हे निश्चित झालेले नाही. मात्र भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे. महायुतीत हा मतदार संघ राष्ट्रवादी अजितदादा यांच्या वाट्याला जाईल असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीत अजितदादांकडे सक्षम उमेदवार नसल्याने प्रभाकर पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतील असे म्हटले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित आरआर पाटील रिंगणात उतरणार असल्याचे नक्की असल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी दोन गटात सामना रंगणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


Friday, October 18, 2024

शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी ; कोणाची कोठून उमेदवारी असणार ?

वेध माझा ऑनलाइन ।
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी मिळाली आहे. 
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार? याची संभाव्य यादी समोर आली आहे. यात बारामतीतून कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण इतर जागांवरील उमेदवारांची नावं समोर आली आहेत
शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
इस्लामपूर- जयंत पाटील
तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील
शिराळा- मानसिंग नाईक
उत्तर कराड- बाळासाहेब पाटील
कोरेगाव- शशिकांत शिंदे
फलटण – दीपक चव्हाण
माण खटाव- प्रभाकर देशमुख
शिरुर- अशोक पवार
जुन्नर- सत्यशील शेरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
आंबेगाव- देवदत्त निकम
वडगाव शेरी- बापू पठारे
दौंड- रमेश आप्पा थोरात
माळशिरस- उत्तमराव जानकर
कर्जत जामखेड- रोहित पवार
काटोल- अनिल देशमुख
विक्रमगड- सुनील भुसारा
घनसावंगी – राजेश टोपे
बीड- संदीप क्षीरसागर
मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
जिंतूर- विजय भांबळे
अहेरी- भाग्यश्री अत्राम
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
परळी- राजाभाऊ पड
लक्ष्मण पवार- गेवराई
आष्टी- भीमराव धोंडे
केज- पृथ्वीराज साठे
माजलगाव- रमेश आडसकर
राहुरी- प्राजक्त तनपुरे
देवळाली- योगेश घोलप
दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
जामनेर- गुलाबराव देवकर
अकोला- अमित भांगरे
पारनेर- राणी लंके
खानापूर – सदाशिव पाटील
चंदगड- नंदाताई बाभूळकर
इचलकरंजी- मदन कारंडे
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झालं असल्याचं चित्र आहे. काही जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून वाद सुरु आहे. याचा परिणाम शरद पवार गटाच्या उमेदवार यादीवर झाला आहे. शरद पवार गटाची उमेदवारी यादी आज येणार होती. परंतू शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रसमधील वादामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.

दादा बारामतीतूनच ! अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी तयार ! आणखी कोणाची उमेदवारी कौठून असणार ?

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार? याची चर्चा होत आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार आहे याची माहिती मिळाली आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी मिळाली आहे यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? हे पाहुया...


अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
बारामती – अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवळ
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
अहेरी- धर्मारावबाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
खेड, आळंदी- दिलीप मोहिते
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
मावळ- सुनील शेळके
वाई- मकरंद पाटील
चिपळूण- शेखर निकम
पिंपरी- अण्णा बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
हडपसर- चेतन तुपे
अकोले- किरण लहामटे
करमाळा- संजय शिंदे
मोर्शी- देवेंद्र भुयार
कोपरगाव- आशुतोष काळे
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
माजलगाव- जयसिंह सोळंके
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक
अमरावती शहर- सुलभा खोडके
इगतपुरी- हिरामण खोसकर

Wednesday, October 16, 2024

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.

कमलालक्ष्मीचे निवास्थान म्हणून पुराणात कराडचा उल्लेख आहे. कराड शहराच्या पश्चिमेस कोयना नदीकाठी श्री दैत्यनिवारणी देवीचे मंदिर आहे. दैत्यांचा नाश करणाऱ्या श्री दैत्यनिवारणी देवीची अष्टभूजा मूर्ती असून, याठिकाणी दरवर्षी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. नदीकाठी असलेल्या या मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून भाविक व कराडवासीयांमधून होत होती. 

याबाबत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत, भाविकांची ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. या मागणीची दखल घेत, महायुती सरकारने ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे’ या योजनेअंतर्गत श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.

कराडच्या ऐतिहासिक श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झाल्याने, मंदिराची सुरक्षितता जपण्यास मदत होणार आहे. या निधीबद्दल महायुती सरकारचे आणि डॉ. अतुल भोसले यांचे कराडवासीयांमधून आभार व्यक्त केले जात आहेत. 


Tuesday, October 15, 2024

4 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी : सर्व विमाने केली इमर्जन्सी लैंड ;


वेध माझा ऑनलाइन।
मंगळवारी चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांचे इमर्जन्सी लँडिंग केले. मात्र, चौकशीअंती या धमक्या खोट्या ठरल्या.

मंगळवारी सोशल मीडियावरुन चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. ज्यात दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा समावेश आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांचे इमर्जन्सी लँडिंग केले. X वर चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी लगेचच अनेक विमानतळांवर विशेष दहशतवादविरोधी पाऊल उचलले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानांमध्ये अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचा ही समावेश आहे.
सोमवारी मुंबई येथून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, चौकशीअंती नंतर या धमक्या खोट्या असल्याचं समोर आलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्लाइट (QP 1373) आणि एअर इंडियाच्या दिल्ली ते शिकागो (AI 127) फ्लाइटसह चार विमानांना धोका लक्षात घेता. अयोध्या विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, स्पाइसजेट आणि आकसा एअरची विमाने सुरक्षितपणे उतरली आहेत. त्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान कॅनडाकडे वळवण्यात आले आहे. विमान वाहतूक सुरक्षा सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, सर्व बाबतीत खबरदारी घेतली जात आहे.
एक्सवरुन एअरलाइन्स आणि पोलिसांच्या हँडलला टॅग केले आणि दावा केला की या विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. सोमवारीही चार वेगवेगळ्या एक्स हँडलने मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. सुरक्षा आणि गुप्तचर संस्था, एअरलाइन्स आणि विमानतळ चालकांनी सोमवारी दहशतवादविरोधी सुरक्षा तपासणी केल्यानंतर संदेश बनावट असल्याचे घोषित केले.


बिअर बार वाढविण्यासाठी जनतेनं मंत्रिमंडळात पाठवलं आहे का?; जयंत पाटील यांची टिका ;

वेध माझा ऑनलाइन।
पाटणला काय वाढले तर बिअरबार वाढले. यासाठी मंत्रिमंडळात पाठवले होते हे वाटत नाही. बार वाढविण्याचा कार्यक्रम त्यापेक्षा महाराष्ट्रही पाटणसारख्या दुर्गम भागात वेगळं काही वाढलं नाही. त्यामुळे हि वेगळी संस्कृती महाराष्ट्रात आणणारी हि लोकं महाराष्ट्र विकायला काढायच्या कामात आता गुंतलेली असल्याची टीका पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे नेते पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली.

पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेअंतर्गत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, दीपक पवार तसेच पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील जवळपास 60 ते 65 पेक्षा जास्त मतदार संघात जाऊन आली आहे. राज्यातील अतिशय दुर्गम अशा गडचिरोली पासून ते सावंतवाडी पर्यंत जवळपास सर्व जिल्ह्यात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. राज्यभर फिरल्यावर खात्री झाली कि महाराष्ट्रातील वातावरण लोकसभेच्या पेक्षा अधिक सुधारलेले आहे. आज सर्व लोक हे भाजप सरकार घालवल पाहिजे असे म्हणत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर वातावरण वेगळं होत. बघता बघता निवडणूक सुरु झाली आणि महाराष्ट्रातील जनतेने आदरणीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याची परिणीती महाराष्ट्रात भाजपचा ३१ ठिकाणी पराभव झाला. १० जागांच्या ऐवजी आपला ८ जागांवर विजय झाला आणि एक जागा सातारा जिल्ह्याची होती.
पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हातील फरक न कळलेल्या आपल्या मतदारांनी ३७ हजार हि मते पापणीला घातली आणि आमची शिट ३५ हजाराच्या मताने पडली. १० पैकी जवळपास ९ ठिकाणी जनतेने शरद पवार यांच्या बाजूने कौल आला. महाराष्ट्रातील जनता पवार साहेबासारख्या ८४ वर्षाच्या योद्धाच्या पाठीशी आजही उभी राहत आहे. कारण स्वाभिमान हा मराठी माणसाच्या कणाकणात आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजला; आचारसंहिता लागू, ‘या’ दिवशी होणार मतदान ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेत झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाकडून आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीपासूनच घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सातारा जिल्ह्यात पहायला मिळणार असली तरी वंचित बहुजन आघाडीकडून देखील जिल्ह्यातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
 
 निवडणुकीचा कार्यक्रम…

विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे