Wednesday, October 23, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू व्यक्तिने पहाटे मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट: चर्चांना उधाण

वेध माझा ऑनलाइन
आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता अनेक नेते हे सावधगिरीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये विविध पक्षातील आमदार, नेते हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठी सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. . त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.


लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर आज पहाटेच मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.

संजय राउत हा कुत्र्यासारखा...शहाजी बापूं पाटील यांची जीभ घसरली

वेध माझा ऑनलाइन।
संजय राऊत हा भुकणारा महाराष्ट्रातला कुत्र्यासारखा माणूस आहे. त्याचा फार विचार करण्याची गरज नाही’, असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तर महाराष्ट्राला बौद्धिक दृष्ट्या भडकवणे, फेक नेरेटिव्ह तयार करणे, लोकांच्यात एक भीतीग्रस्त वातावरण तयार करणे आणि काम करत असलेल्या नेत्यांबद्दल कलुषित वातावरण निर्माण करून सत्तेची राजकीय पोळी भाजण्याचे काम संजय राऊत करत असल्याचा आरोपही शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊत हा आमदारांच्या मतावर खासदार होत आहे. त्याने नगरपालिकेत साधे नगरसेवकपदाला उभे राहून बघावे, असे म्हणत शहाजी बापूंनी संजय राऊतांना थेट आवाहन केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या सांगोल्यात सभा होणार आहेत, याची मला कल्पना आहे. ते माझ्या विरोधात काय बोलतायत मी जर बोलायला लागलो तर ते येथून पळून जातील. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब आहे. त्यामुळे काही मर्यादा आम्ही पाळतो परंतु संजय राऊतवर बोलताना मी कसलीही मर्यादा पाळणार नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.

अजितदादा गटाकडून नवाब मलिक वेटिंगवर!

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत मुंबईतून कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. या यादीत सर्व मातब्बर नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पण नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे अजितदादा यांनी नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलिक यांना तिकीट मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.

अजितदादा बारामतीतूनच उभे राहणार : अजितदादा गटाची संपूर्ण यादी पहा..

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. महत्वाचा पक्ष असलेल्या महायुती सरकार मधील भाजप पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीच्या जागेवर स्वत: अजित पवार लढणार असल्याचे या यादीमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय इतरही महत्वाच्या जागेंवर देखील राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून जिंकत आलेल्या राष्ट्रवादी बळकट जागांवर अजित पवार यांनी उमेदवार दिले आहेत. जसे बारामती मतदार संघातून स्वत: अजित पवार लढणार आहेत. कागल मधून हसन मुश्रीफ , हडपसर मधून चेतन तुपे, येवला मतदार संघातून छगन भुजबळ यांना उमेदवार घोषित करण्यात आले आहे. आता राज्यातील राजकीय समीकरणे बबदलल्यामुळे यंदाच्या वेळची लढत रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- हसनमु शरीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
कळमनेर- अनिल पाटील
तुमसर- राजू कारेमोरे
अहेरी- धर्मराव बाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन- आदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
आळंदी खेड- दिलीप मोहिते
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
मावळ-सुनील शेळके
चिपळूण- शेखर निकम
पिंपरी- अण्णा बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
हडपसर- चेतन तुपे
अकोले- किरण लहामटे
करमाळा- संजय शिंदे
मोर्शी -देवेंद्र भुयार
कोपरगाव- आशुतोष काळे
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
माजलगाव- प्रकाश सोळंके
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
अनुषक्ती नगर- सना मलिक
शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक
अमरावती शहर- सुलभा खोडके
इगतपुरी-हिरामण खोसकर

ठाकरेंकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; कोण कोण आहे उमेदवार?

वेध माझा ऑनलाईन।
 महायुतीकडून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महावकास आघाडीतील राजकीय पक्षांकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे. शिवसेना युबीटी पक्षाने माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे. आज तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह, वसंत गितेंनाही ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून कोण उमेदवार...
सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)

२)वसंत गिते(नाशिक मध्य) 

३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य) 

४)एकनाथ पवार (लोहा कंधार)

५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा

६ )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा

७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा

८ )अमर पाटील, सोलापूर दक्षिण

 ९) गणेश धात्रक, नांदगाव

 १०)दीपक आबा साळुंखे पाटील,  सांगोला

११) प्रविणा मोरजकर, कुर्ला 

१२) एम के मढवी, ऐरोली 

१३) भास्कर जाधव, गुहागर 

 १४)वैभव नाईक, कुडाळ

 १५) राजन साळवी, राजापूर लांजा 

 १६) आदित्य ठाकरे, वरळी 

 १७) संजय पोतनीस, कलिना 

१८) सुनील प्रभू, दिंडोशी 

१९) राजन विचारे, ठाणे शहर 

२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली 

२१) कैलास पाटील, धाराशिव 

२२) मनोहर भोईर, उरण 

२३) महेश सावंत, माहीम 

२४)श्रद्धा जाधव, वडाळा 

२५) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी  

२६) नितीन देशमुख  - बाळापूर 

२७)  किशनचंद तनवाणी - छत्रपती संभाजी नगर मध्ये 

 २८)छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे

 २९)वैजापूर मतदारसंघ  - दिनेश परदेशी*

 ३०) कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत*

 ३१) सिल्लोड  मतदारसंघ - सुरेश बनकर

३२) राहुल पाटील - परभणी 

३३) शंकरराव गडाख -नेवासा 

३४) सुभाष भोईर  - कल्याण ग्रामीण 

३५) सुनील राऊत - विक्रोळी

३६) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम 

३७) उन्मेश पाटील - चाळीसगाव 

३८) स्नेहल जगताप - महाड 

३९) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व  

४०) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी

पाटणमधुन शंभूराज देसाई यांच्या विरोधात हर्षद कदम ; उद्धव ठाकरेनी जाहिर केली उमेदवारी

वेध माझा ऑनलाइन।
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम याना माजी मंत्री शंभुराज देसाई यांच्या विरोधात पाटण विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या वतीने ही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे 

ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते हर्षद कदम हे सातत्याने माजी मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात आपली भूमिका मांडत आले आहेत
मतदार संघातिल अनेक प्रश्न मांडत त्यानी विविध आंदोलने सातत्याने केली आहेत 

प्रामुख्याने शंभूराज देसाई यानी छत्रपति उदयनराजे भोसले याना पाटण मधे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देण्याचे विधान केले होते... मात्र जिल्ह्यात उदयनराजे याना सर्वात कमी मताधिक्य त्याठिकानी मिळाले... त्याची जबाबदारी घेवून, मी राजीनामा देतो... असा स्टंट माजी मंत्री देसाई यांनी केला होता... 

त्यावेळी देसाई यांचा हा राजीनामा देण्याचा फक्त स्टंटआहे ते पदाला चिटकुन राहणार आहेत...राजीनामा देणार नाहीत...असे हर्षद कदम यांनी सांगून त्यांच्या स्टंट मधली हवाच घालवली होती...त्याची Jजिल्ह्यात जोरदार चर्चा झाली होती...सध्या होणाऱ्या या निवडणुकीत याच दोघांची लढत पहायला मिळणार आहे...

कॉंग्रेसच्या अजित आप्पा चिखलीकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा ; भाजप शिवसेना महिला आक्रमक ; निवेदनाद्वारे केली मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
हॉटेल पंकज येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्यानिमिताने आयोजित मेळाव्यात अजित अप्पा पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणातुन तमाम महिलांबद्‌दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन महिलांना लज्जा- उत्पन्न होईल असे अपमान कारक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा -सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे 


निवेदनात म्हटले आहे की भारतीय संस्कृतीमध्ये महिलाना देवता समान स्थान  आहे. तरी अजित अप्पा चिखलीकर या काँग्रेसी वृत्तीच्या घाणेरड्या नराधमाने महिला उघडया बसल्या होत्या का? अशी किळसवाणी आणि खालच्या पातळीवर जाउन भाषा वापरली तरी या महामूर्ख नराधमावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे अजित आप्पा चिखलीकर यांना अटक करुन तडीपार  करावे अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . 

महिलांविषयी वापरलेल्या या अपशब्दाच्या निषेधार्थ येथील दत्त चौकात आज आंदोलन करण्यात येणार होते पण आचारसंहितेचा आदर करून आंदोलन निवेदन देवून संपवण्यात आले. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी नेत्या कविता कचरे, कराड माजी नगराध्यक्ष रोहिणीताई  शिंदे, पदाधीकारी स्वाती पिसाळ, नम्रता कुत्लकर्णी  सुरेखा ताई माने, कविता माने,
शाखाप्रमुख कल्पना पवार, कराड शहराध्यक्ष गायत्री पाठक, शिवसेना तालुकाप्रमुख संध्या दाभाडे,  दिपाली जाधव , विजया भोसले, सामाजिक कार्यकर्त्या व पोलीस मित्र संघटना सातारा जिल्हाध्यक्ष राधिका पन्हाळे, शिवसेना शाखाप्रमुख चांदणी मुळे, कराड तालुका शिवसेना नीता लोंढे, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण नेत्या दैवशीला मोहिते, मंजिरी कुलकर्णी, उपस्थित होत्या