हॉटेल पंकज येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्यानिमिताने आयोजित मेळाव्यात अजित अप्पा पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणातुन तमाम महिलांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन महिलांना लज्जा- उत्पन्न होईल असे अपमान कारक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा -सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की भारतीय संस्कृतीमध्ये महिलाना देवता समान स्थान आहे. तरी अजित अप्पा चिखलीकर या काँग्रेसी वृत्तीच्या घाणेरड्या नराधमाने महिला उघडया बसल्या होत्या का? अशी किळसवाणी आणि खालच्या पातळीवर जाउन भाषा वापरली तरी या महामूर्ख नराधमावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे अजित आप्पा चिखलीकर यांना अटक करुन तडीपार करावे अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
महिलांविषयी वापरलेल्या या अपशब्दाच्या निषेधार्थ येथील दत्त चौकात आज आंदोलन करण्यात येणार होते पण आचारसंहितेचा आदर करून आंदोलन निवेदन देवून संपवण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी नेत्या कविता कचरे, कराड माजी नगराध्यक्ष रोहिणीताई शिंदे, पदाधीकारी स्वाती पिसाळ, नम्रता कुत्लकर्णी सुरेखा ताई माने, कविता माने,
शाखाप्रमुख कल्पना पवार, कराड शहराध्यक्ष गायत्री पाठक, शिवसेना तालुकाप्रमुख संध्या दाभाडे, दिपाली जाधव , विजया भोसले, सामाजिक कार्यकर्त्या व पोलीस मित्र संघटना सातारा जिल्हाध्यक्ष राधिका पन्हाळे, शिवसेना शाखाप्रमुख चांदणी मुळे, कराड तालुका शिवसेना नीता लोंढे, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण नेत्या दैवशीला मोहिते, मंजिरी कुलकर्णी, उपस्थित होत्या
No comments:
Post a Comment