Wednesday, October 23, 2024

डॉ अतुल बाबांचा अर्ज भरण्यासाठी उदयनराजे खास साताऱ्यातून कराडात दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
डॉ अतुल भोसले हे आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत त्यांनी साधेपणाने अर्ज भरण्याचे ठरवले असले तरी ते आज अर्ज भरत असल्याचे ज्यांना ज्यांना कळले ती सगळी लोक त्यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिले आहेत 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित राहिले आहेंत 
उदयनराजे यांच्या लोकसभेतील विजयासाठी डॉ अतुल भोसलेचे योगदान खूप मोठे आहे आज उदयनराजे डॉ भोसलेंच्या वेळेला आवर्जून उपस्थित राहिले आहेत

आज डॉ अतुल भोसले आणि इंद्रजीत गुजर साधेपणाने आप- आपला उमेदवारी अर्ज भरणार

वेध माझा ऑनलाइन।
आज गुरुवारी भाजपा चे नेते डॉ अतुल भोसले आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत तसेच नगरसेवक इंद्रजीत गुजर देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत  हे दोघेही कोणताही गाजावाज़ा न करता किवा शक्ति प्रदर्शन न करता आप आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने भरणार असल्याचे समजते

आज गुरूवारी सकाळी 11,30 वाजता डॉ अतुल भोसले आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत कोणत्याही प्रकारचे शक्ति प्रदर्शन न करता ते अर्ज भरणार आहेत त्यानी या निवडणुकीसाठी आपली तयारी जोरदार सुरु ठेवली आहे त्यानी आपल्या प्रचारात अद्याप तरी आघाडी घेतल्याचे दिसते त्यांचे सोशल मिडियावर खुप मोठ्या प्रमाणात फैन फॉलोइंग असल्याचे दिसते युवकांचा महिलांचा तसेच सर्वच वर्गाचा मोठा पाठीम्बा त्याना मिलताना दिसतो आहे त्यामुळे मागच्या विधानसभेला राहिलेली केवळ काही मतांची मागील कसर यावेळी भरून काढून विजयी गुलाल खेचुन आननार असल्याची शपथ त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे 

नगरसेवक इंद्रजीत गुजर है देखील आज दुपारी 1 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यानी देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी करत मतदार संघ पिंजुन काढला आहे त्याना भागा भागात युवकांचा महिलांचा तसेच सर्वच वर्गाचा खुप मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे 
नुकतीच त्यांची शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी खास भेट घेवून निवडणुकी संदर्भात कमरा बन्द चर्चा केली होती गुजर है उद्धव ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते आहेत 

शिंदे गट ; पहिली यादी तयार ; 45 नावे जाहीर ; शंभुराजे आणि महेश शिंदे यांना उमेदवारी जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पक्षाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं त्या पक्षाने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिंदेंनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. सातारा जिल्ह्यात पाटण मतदार संघातून शंभूराज देसाई तर कोरेगाव मतदार संघातून महेश शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून चाचपणी सुरु ; रात्रीच्या बैठका ; दिवसभरात गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु!

वेध माझा ऑनलाइन।

महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेनं नुकतीच आपली पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची देखील पहिली यादी जाहीर झाली. सातारा जिल्ह्यातील फक्त वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा यादीत समावेश आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधून उमेदवारी घोषित केलेल्या दीपक चव्हाण यांनी साथ सोडल्यानंतर येथील जागेला उमेदवारच उरला नसल्याने ती जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून चाचपणी सुरु असली तरी ‘उत्तर’ मात्र सापडेनासे झाले आहे.

कराड उत्तर या मतदारसंघात कायम जोरदार लढतीची चर्चा असते. पण ऐनवेळी ती विरून जाते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदार संघ तसा पहिला तर महायुतीत अजितदादा पवार गटाकडे जायला हवा. मात्र, या मतदार संघावर भाजप आणि आता शिंदे गट शिवसेनेने डोळा लावून बसल्याने या मतदार संघातील जागा वाटपाचे सूत्र अजूनही सुटलेले नाही. मात्र, सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. रात्रीच्या बैठका आणि दिवसभरात गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा घडामोडी या ठिकाणी घडत आहेत.

महाविकास आघाडीची प्रत्येकी 85 जागांवर सहमती - 18 जागा मित्रपक्षांना देणार -

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांनी प्रत्येकी 85 जागांवर लढण्यास सहमती दर्शवली आहे. आघाडीतील इतर सर्व पक्ष समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट या पक्षांसाठी इतर जागा सोडण्यात येतील अशी माहिती, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्याची माहिती राऊत यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.


प्रत्येक़ी 85 जागा : 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 85 जागा प्रत्येक पक्षाला असा निर्णय घेण्यात आलाय. 270 जागांवर सहमती झाल्यावर इतर 18 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येतील.

जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी ७ अर्ज दाखल ; वाचा सविस्तर ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ७अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी १, कोरेगावसाठी २ उमेदवारांचे ३, माणमधून १, कराड उत्तरमधून २ अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास काल दि. 22 ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 30 नामनिर्देशन पत्र वाटप झालेले असून, आज दुसऱ्या दिवशी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 15 जणांनी एकूण 22 नामनिर्देशनपत्राची खरेदी केली. दरम्यान, आज अखेर एकूण 52 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले आहे.


विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. आज दि. 23 ऑक्टोबर अखेर खुल्या प्रवर्गातील 30, अनुसूचित जातीतील 17, अनुसूचित जमाती ०, अपक्ष उमेदवार 23, पक्षीय उमेदवार 17 आदीकडून अर्ज खरेदी करण्यात आले.

यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज., महाराष्ट्र नवनिर्माण सेने पार्टीकडून 1 अर्ज,, वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षा कडून 1, भारतीय जनता पार्टी कडून 2 अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटणा यांचेकडून 1 अर्ज, अपक्ष-23 अर्ज असे अर्ज खरेदी केले आहेत.

अजितदादाना सातारा जिल्हयाला मिळाला नवा जिल्हाध्यक्ष : कोंण आहे ?

वेध माझा ऑनलाइन।
मागील वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीबरोबर गेले. त्यावेळी राष्ट्रवादीकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. दोन महिन्यांनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची नियुक्ती झाली. पण, वर्षभरातच जिल्हाध्यक्षांनी काडीमोड घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गेली दहा दिवसांपासून नवीन जिल्हाध्यक्ष नव्हता. मात्र, अजितदादांनी आता नवीन दुसरा जिल्हाध्यक्ष शोधला असून बाळासाहेब सोळसकर यांच्या नावावर त्यांनी आज शिक्कामोर्तब केले आहे