Saturday, July 5, 2025

एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, - उद्धव ठाकरेंचं मोठं विधान ; राज-उद्धव आले 18 वर्षांनी एकत्र ;

वेध माझा ऑनलाईन।आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी, असं मोठं विधान राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या विषयावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आज हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून वरळी डोम येथे विजय मेळावा घेण्यात येत आहे. यावेळी ठाकरे बंधु तबवळ 18 वर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले आहे.

यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मला कल्पना आहे. अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत. राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी त्यांनी मला सन्मानिय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना सन्मानिय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो. अप्रतिम मांडणी राजने केलीय. माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वजण समोर बसले. पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो, अशीही भावना यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

सरकारने तब्बल २,२८९ महिलांना या योजनेतून वगळल्याची माहिती आली समोर ;

वेध माझा ऑनलाईन; विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का बसला आहे. कारण सरकारने तब्बल २,२८९ महिलांना या योजनेतून वगळल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व महिला लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या. तसेच या सर्व महिला सरकारी कर्मचारी असल्याची माहिती छाननी दरम्यान समोर आली आहे. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी

वेध माझा ऑनलाईन।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातारा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींना आजही लाभ मिळत आहे. या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “खरं तर जून महिन्याचे १५०० रुपये कधी येणार याकडे मागील अनेक दिवसापासून राज्यातील महिला वर्ग वाट बघत आहे. महिना उलटूनही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होते. अखेर आजपासून जून महिन्याचे १५०० रुपये जमा होणार असून यामुळे सातारा जिल्ह्यातीलही लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ज्या महिलांनी पात्र नसतानाही अर्ज भरला आहे अशा महिलांना वगळण्याचे काम सरकार कडून सुरु आहे. आत्तापर्यंत लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा घरी चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश आहे. अशावेळी तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त आधार लिंक्ड बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन बॅलेंस चेक करायचा आहे. किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.
लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत करण्यात आली आणि त्यानंतर या योजनेची अत्यंत जलद गतीने यशस्वीरित्या अंमलबजावणी करत जुलै 2024 पासून अर्ज सुरू करण्यात आले. ही योजना सरकारच्या पद्धतीने योग्यरित्या अंमलबजावणी होत असली तरी या योजनेवर वेळोवेळी टीका करण्यात आली आणि ही योजना वादाच्या भवऱ्यात देखील सापडली. अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचे निश्चित करण्यात आले.
आदिती तटकरे यांनी याबाबत काल रात्री ट्विट करत म्हंटल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. 

कोयना धरणात किती पाणीसाठा ?

सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा 60.04 टक्क्यांवर पोहोचला असून जुलै महिन्यापर्यंत सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

कोयना धरणात पाणीपातळी 646.28 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 56.410 टीएमसी असून 56.34 टक्के पाणी पातळी आहे तर धरणात 32 हजार 437 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 1 हजार 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 37.17 टक्के पाणी जास्त आहे. धोम धरणात पाणीपातळी 741.43 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 7.100 टीएमसी असून 60.74 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 2 हजार 308 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 36.83 टक्के पाणी जास्त आहे.धोम बलकवडी धरणात पाणीपातळी 794.53 मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा 1.540 टीएमसी असून 38.89 टक्के पाणी पातळी आहे.
वेध माझा ऑनलाईन।

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच असून शुक्रवार आणि शनिवार कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. 

कोयनानगर येथे १०७, नवजा १२९ आणि महाबळेश्वरला ४९ मिलीमीटरची नोंद झाली तर एक जूनपासून कोयनेला १ हजार ८०६, नवजा १ हजार ५९६ आणि महाबळेश्वरला १ हजार ६८५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणीसाठा आहे तर धरणात ५८.४५ इतकी टक्केवारी झाली आहे.

Friday, July 4, 2025

भाजपवाले अवाक; मुनगंटीवारांनी केली फडणवीसांकडे असलेल्या उर्जा खात्यावर टीका ;

सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारच्या कारभाराचे बाभडे काढले. कृषी पंपाच्या धोरणावरून मुनगंटीवारांनी फडणवीसांकडे असलेल्या उर्जा खात्यावर टीकास्त्र डागलं. कृषीपंप द्या म्हणून हजारो शेतकऱ्यांचे अर्ज सरकारकडे आले आहेत. मात्र सरकार त्यांना बळजबरीने सोलार पंप थोपवत असल्याचा मुनगंटीवार म्हणाले. कृषी पंप हवेत म्हणून महाराष्ट्रामधल्या 47 हजार 197 शेतकऱ्यांनी चेक भरले. पण सरकारने आता फक्त सोलार पंप घ्या असं म्हणत त्यापैकी तब्बल 45 हजरा 114 चेक परत केले आहेत. शिवाय ज्या कंपन्यांचे सोलार पंप सरकारने दिलेत, त्यापैकी अनेक नादुरुस्त आहेत.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिथे भूजल पातळी खोल आहे तिथे सोलार पंपाला मर्यादा येतात. मोठ्या शेतीसाठी सोलार पंपाची कार्यक्षमता अपुरी पडते. मात्र दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना सोलार पंपच देण्यासाठी आग्रही आहे. याशिवाय डीपी कनेक्शन सुद्धा लवकर मिळत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत असेही मुनगंटीवार म्हणाले.

मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का ? राऊतांचे संकेत काय ?

वेध माझा ऑनलाइन :
होणार विजयी मेळावा ठाकरे बंधूंचा असला तरी त्यात इतर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हजर राहणार असल्याची माहिती आहे. मुंबईतल्या वरळी डोंबच्या सभागृहात जवळपास सात ते आठ हजार लोक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉल बाहेर रस्त्यावर सुद्धा एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. हिंदी सक्तीच्या जीआर विरोधात आधी ठाकरे बंधूंनी मोर्चांची घोषणा केली होती. पण सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याच आयोजन करत एकत्र येण्याच ठरवलं. म्हणजेच दोघांनीही एकत्र यायचं हे यातनं सिद्ध होतं आणि संजय राऊतांनी पाच तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या गोष्टी घडतील असंही म्हटलंय. म्हणजेच वरळीतला मेळावा दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे.मेळाव्यासंदर्भात एक टीझर सुद्धा जारी करण्यात आलाय. ज्यामध्ये दोन सिंह दाखवले असून एका सिंहाच्या मदतीला दुसरा सिंह जातो त्यावरून नेमकं अडचणीत कोण आहे हे टीझरमधून स्पष्ट होत नाही, असं म्हणत शिंदेंचे मंत्री शिरसाठ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.