Monday, November 2, 2026

वेध माझा ऑनलाइन।
मी अगोदर चेअरमन झालो त्यानंतर बाळासाहेब पाटील झाले मी आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या काळात आमच्या साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून काम केलं आहे त्यावेळी मी साहेबाना भेटायला मंगळवार पेठेतील त्यांच्या जुन्या घरी यायचो त्यावेळी मला साहेबांनी मोलाचा सल्ला दिला ते म्हणाले होते की कारखान्यात आर्थिक शिस्त लावून घ्या कारखानदारीत ती महत्वाची असते शिवाजीराव देसाई यांनी काटकसरीने कारखाना चालवला तुम्ही पण त्यांच्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन काम करा असा मोलाचा सल्ला मला त्यावेळी पी डी पाटील साहेबांनी दिला होता अशी आठवण मंत्री शंभूराज देसाई सांगून बाळासाहेब पाटील देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगलं काम करत असल्याचेही ते म्हणाले

कराड पालिकेच्या नवीन पम्पिंग स्टेशन 1 च्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते

यावेळी आपल्या भाषणात बाळासाहेब पाटील यांनी शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून चांगलं काम जिल्ह्यात करत आहेत असे सांगितले त्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले बाळासाहेब पाटील यांनी आमच्या कामाचे कौतुक केलं त्यावेळी बर वाटल आम्ही दोघे जुने सहकारी आहोत आम्ही एकत्र काम केलं आहे आमचे राजकीय पक्ष वेगळे असतील पण सध्या आम्ही कराडात पालिकेत एकत्र काम करत आहोत हे माझे जुने सहकारी आहेत असे सांगून बाळासाहेब पाटील यांनी देसाई यांचे आपल्या भाषणात कौतुक केल्यावर त्यावर आपल्या भाषणातही देसाई यांनी  बाळासाहेब पाटील यांच्याही कामाचे कौतुक केले या दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्यावर पत्रकारांच्यात याचबाबत बराचवेळ चर्चा रंगली होती

सुप्रिया सुळे यांच्या जावयाला १२०० एकर जमीन दिल्याच्या आरोपावर देसाईंचे सावध उत्तर! म्हणाले...मला याबाबत माहितीच नाही: सरकारने जमीन दिली याची माहिती सरकारमधील मंत्र्यालाच माहिती नाही याचे राज्यभरातून आश्चर्य व्यक्त ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या जावयाला १२०० एकर जमीन दिल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणावर सावध भूमिका घेतली आहे. या आरोपाबाबत आपल्याला सध्या पुरेशी माहिती नाही. संबंधित माहिती घेतल्यानंतरच यावर भाष्य करणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या जावयाला जमीन दिल्याच्या आरोपावर महायुतीतीलच एका ज्येष्ठ मंत्र्याने तूर्तास प्रतिक्रिया देणे टाळल्याची चर्चा असताना ज्या सरकारने जमीन दिली त्या सरकारमधील मंत्र्यालाच याबाबतची माहिती नाही याचे आश्चर्य सर्वत्र व्यक्त होत आहे 

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवावरून महायुतीतील अंतर्गत नाराजीही समोर येत आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील घटक पक्षांकडून फसवणूक झाल्याची शंका व्यक्त केल्यानंतर युतीतील समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना देसाई यांनी गोरे यांनी कोणत्याही घटक पक्षाचे नाव घेतले नसल्याचे सांगितले. महायुतीतील वीसपेक्षा अधिक घटक पक्ष एकत्र बसून पराभवाची कारणमीमांसा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने आपल्या परीने निवडणुकीत प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.

सांगलीला पाणी रोखल्याच्या आरोपावर देसाई यांनी कोयना धरणातील पाणीसाठ्याचा संदर्भ दिला. अल निनोच्या प्रभावामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा १८ टीएमसीने कमी असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि राखीव साठ्याचे नियोजन लक्षात घेऊन पाणी सोडण्याच्या प्रमाणाचा अभ्यास करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

किणी टोलनाक्यावरील ऊसदर आंदोलनाबाबत बोलताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाने पुढाकार घेऊन बैठक आयोजित करावी आणि ऊसदराच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढावा, अशी भूमिका देसाई यांनी मांडली.

दरम्यान, महिला पोलिसाच्या वाढदिवसाच्या रील प्रकरणावरही देसाई यांनी भूमिका मांडली मात्र सुप्रिया सुळे यांच्या जावयाला जमीन दिल्याच्या आरोपाबाबत मात्र त्यांनी माहिती घेतल्यानंतरच बोलण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या आरोपाच्या अनुषंगाने पुढे कोणती माहिती समोर येते आणि देसाई त्यावर काय भाष्य करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष ; पाणी साचण्याच्या समस्येकडे आणि महामार्गालगतच्या गटर्सच्या प्रलंबित कामाचे मांडले अभ्यासपूर्ण प्रश्न ; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड येथे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्येकडे आणि महामार्गालगतच्या गटर्सच्या प्रलंबित कामांच्या प्रश्नांकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कराड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा झाली. बैठकीला आमदार मनोज घोरपडे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची विशेष उपस्थिती होती. 

बैठकीत आमदार डॉ. भोसले म्हणाले, कराड येथे राष्ट्रीय महामार्गालगत गोटे परिसर, मलकापूर येथे जय मोटर्स, पाचवड फाटा परिसर आदी ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच अनेक ठिकाणी गटार व्यवस्थेची कामे प्रलंबित आहेत. तीदेखील तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्गाची उंची अधिक असल्यामुळे त्याला जोडणारा अप्रोच रस्ताही उंच झाला आहे. परिणामी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी यांची गंभीर दखल घेऊन, या समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. 

बैठकीला सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 


कराड पालिकेच्या पंपिंग स्टेशन क्रमांक 1 चे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाइन।
आज सोमवारी सायंकाळी शहरातील शनिवार पेठेतील यशवन्त हायस्कुल मागील परिसरातील कराड पालिकेच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशन क्रमांक 1 चे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कराडच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली

यावेळी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव  तसेच सर्व  नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळासाहेब पाटील व नगराध्यक्ष यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पालकमंत्री देसाई यांचे आभार मानले 

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरे ... मला माहित नाही... माहिती घेतो... आणि मग बोलतो अशाच सुरात दिली... मात्र काही प्रश्नावर ते सविस्तर बोलले हेही खरे आहे!

त्यापैकी पदवीधर निवडणुकीतील पराभवावरून  जयकुमार गोरेंच्या विधानावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली
पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर जयकुमार गोरेंनी महायुतीतील घटक पक्षांवर फसवणुकीची शंका व्यक्त केली होती. यावर बोलताना शंभूराज देसाईंनी गोरेंनी कुणाचंही नाव घेतलं नसल्याचं म्हटलंय. महायुतीतील वीसपेक्षा अधिक घटक पक्ष एकत्र बसून पराभवाची कारणं शोधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेने आपल्या परीने प्रयत्न केल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे यांच्या जावयाला सरकारने १२०० एकर सुपीक जमीन दिल्याच्या आरोपावर देसाईंनी सावध भूमिका घेतली. या प्रकरणाची आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने माहिती घेतल्यानंतरच भाष्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सांगलीला पाणी रोखल्याच्या आरोपावरही देसाईंनी स्पष्टीकरण दिलं. अल निनोच्या प्रभावामुळे कोयना धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टीएमसीने कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी आणि राखीव साठ्याचं नियोजन लक्षात घेऊन पाणी सोडण्याच्या प्रमाणाचा अभ्यास जलसंपदा विभागाला करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

किणी टोलनाक्यावर ऊसदरासाठी होणाऱ्या आंदोलनाबाबतही देसाईंनी भूमिका स्पष्ट केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन संचालक मंडळाने पुढाकार घेऊन बैठक आयोजित करावी आणि ऊसदराच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांनी म्हटलंय.


उड्डाणपुलावर "बिर्थडे सेलिब्रेशन' करणाऱ्या "त्या' महिला पोलिसावर कारवाई होणारच ! पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडच्या पत्रकारांना दिली ग्वाही ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडमधील कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसाने कराडच्या नवीन झालेल्या उड्डाणपुलावर आपला वाढदिवस साजरा करत त्याठिकाणी केलेल्या सेलिब्रेशन ची रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली होती तेव्हापासून शहर व परिसरात या विषयी संताप व्यक्त केला गेल्याचे पहायला मिळाले यावर माहिती घेऊन त्या संबंधित महिलेवर कारवाई करणार असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

याबाबत अधिक माहिती अशी की,

कराडमधील कोल्हापूर नाका ते नांदलापूर हा साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल... सुरुवातीपासूनच हा पूल चर्चेत आहे... प्रशस्त रस्ता आणि अडथळ्यांचा अभाव यामुळे वाहनांचा वेग इथं सुसाट सुटलाय... याच सुसाट वेगानं काही दिवसांपूर्वी चार युवकांचा जीव घेतला... भरधाव कारच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले... या दुर्घटनेनं संपूर्ण कराड हादरलं... उड्डाणपुलावर वेगाला लगाम घालण्यासाठी प्रशासन काही ठोस पावलं उचलेल, अशी अपेक्षा होती... मात्र, आता याच पुलावर महिला पोलिसांच्या बर्थ डे सेलिब्रेशनची रिल समोर आलीय...

रात्रीच्या अंधारात उड्डाणपुलावर नवी कोरी कार थांबवायची... कारसमोर पोझ द्यायच्या... बोनेटवर बसून केकसोबत वाढदिवस साजरा करायचा... आणि पायरों गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी करायची... असा सगळा शाही थाट या रिलमध्ये दिसतोय... सार्वजनिक महामार्गावर वाहन थांबवून अशा पद्धतीनं सेलिब्रेशन करणं कितपत योग्य? विशेष म्हणजे, हा प्रकार करणारी व्यक्ती पोलीस दलातील महिला कर्मचारी आहे....

एकीकडे उड्डाणपुलावर अपघातांचा धोका... दुसरीकडे चार युवकांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच अशा प्रकारचं सेलिब्रेशन... त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय... कायद्याचे धडे देणाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसवायचे का? नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा थेट सवाल कराडकर उपस्थित करत आहेत...

आता ही रिल व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला पोलिसांवर कारवाई होणार का? अशी चर्चा शहर व परिसरातील सर्वच स्तरातून होत असताना याबाबत पत्रकारांनी मंत्री शंभूराज देसाई याना विचारले असता त्या "रीलस्टार' महिला पोलिसावर कारवाई होणारच...अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी यावेळी बोलताना दिली आहे... 


कराडच्या उड्डाणपुलावर चौघांचा बळी गेला... याच उड्डाणपुलावर एका महिला पोलिसाचा बर्थडे सेलिब्रेशनचा धिंगाणा ; रिल झाली व्हायरल ; महामार्गावर वाहन थांबवून सेलिब्रेशन केल्याबद्दल पोलीस कारवाई करणार का? कराडकरांच्यात जोरदार चर्चा ;


वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या उड्डाणपुलावर चौघांचा बळी गेला... अपघातानं चौघांची घरं उद्ध्वस्त झाली... पण याच उड्डाणपुलावर आता एका महिला पोलिसांचा बर्थ डे सेलिब्रेशनचा धिंगाणा समोर आलाय... नवी कोरी कार उड्डाणपुलावर थांबवली... कारच्या बोनेटवर केक ठेवला... पायरों गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी केली... आणि या सगळ्या थाटाचा रिल बनवून सोशल मीडियावर टाकला... विशेष म्हणजे, कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच महिला पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करण्यात आलीय... त्यामुळे कराडकरांचा संताप अनावर झालाय...

कराडमधील कोल्हापूर नाका ते नांदलापूर हा साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल... सुरुवातीपासूनच हा पूल चर्चेत आहे... प्रशस्त रस्ता आणि अडथळ्यांचा अभाव यामुळे वाहनांचा वेग इथं सुसाट सुटलाय... याच सुसाट वेगानं काही दिवसांपूर्वी चार युवकांचा जीव घेतला... भरधाव कारच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले... या दुर्घटनेनं संपूर्ण कराड हादरलं... उड्डाणपुलावर वेगाला लगाम घालण्यासाठी प्रशासन काही ठोस पावलं उचलेल, अशी अपेक्षा होती... मात्र, आता याच पुलावर महिला पोलिसांच्या बर्थ डे सेलिब्रेशनची रिल समोर आलीय...

रात्रीच्या अंधारात उड्डाणपुलावर नवी कोरी कार थांबवायची... कारसमोर पोझ द्यायच्या... बोनेटवर बसून केकसोबत वाढदिवस साजरा करायचा... आणि पायरों गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी करायची... असा सगळा शाही थाट या रिलमध्ये दिसतोय... सार्वजनिक महामार्गावर वाहन थांबवून अशा पद्धतीनं सेलिब्रेशन करणं कितपत योग्य? विशेष म्हणजे, हा प्रकार करणारी व्यक्ती पोलीस दलातील महिला कर्मचारी आहे....

एकीकडे उड्डाणपुलावर अपघातांचा धोका... दुसरीकडे चार युवकांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच अशा प्रकारचं सेलिब्रेशन... त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय... कायद्याचे धडे देणाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसवायचे का? नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा थेट सवाल कराडकर उपस्थित करत आहेत...

आता ही रिल व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला पोलिसांवर कारवाई होणार का? महामार्गावर अशा प्रकारे वाहन थांबवून सेलिब्रेशन केल्याची दखल पोलीस प्रशासन घेणार का? की सोशल मीडियावर रिल व्हायरल होईल आणि प्रकरण तिथंच थंडावेल? याकडे कराडकरांचं लक्ष लागलंय...




Sunday, November 1, 2026

पाटण सोसायटी गटात 104 मतदारांपैकी शंभूराज देसाई यांच्यासोबत 58 मतदारांनी येऊन मतदान केले ; शंभूराज देसाई म्हणाले... विजय आमचाच ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकित 
पाटणमध्ये पाटण विकास सेवा सोसायटी गटात मंत्री शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर हे उमेदवार आहेत पाटण विकास सेवा सोसायटी गटात महायुतीत चुरशीची लढत होत आहे

शंभूराज देसाई यांच्यासोबत येऊन 104 पैकी 58 ठरावधारक  मतदारानी मतदान केले 
मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे 
दरम्यान आपण सामान्य मतदारांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवत असल्याचं सांगत आपल्याला अनेक सहकाऱ्यांनी विश्वासाने मतदान केल्याचा दावाही शंभूराज देसाई यांनी केला आहे त्यामुळे विजय आपला असल्याचे ते म्हणाले... 

दरम्यान कराडमध्ये  दोन दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी 'सबको मौका मिलता है' असं विधान केल्याबाबत विचारलं असता, निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन यावर चर्चा करणार असल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं...