Thursday, November 26, 2020

आज जिल्ह्यात 583 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 583 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 344 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *344 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 17, फलटण येथील 4, कोरेगांव येथील 29, वाई येथील 11, खंडाळा येथील 27, रायगांव येथील 15, पानमळेवाडी येथील 18, मायणी येथील 8, महाबळेश्वर येथील 44, पाटण येथील 8, दहिवडी येथील 48, म्हसवड येथील 11 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 78 असे एकूण 344 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -242729*
*एकूण बाधित -50529*  
*घरी सोडण्यात आलेले -48078*  
*मृत्यू -1703* 
 *उपचारार्थ रुग्ण-748* 

00000

No comments:

Post a Comment