Sunday, November 8, 2020

नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील ; शहराचे उभरते नेतृत्व ; युवकांचे आशास्थान...

कराड
 स्वर्गीय,आदरणीय पी डी पाटील साहेब यांचे नातू, पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांचे पुतणे लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील यांचा वाढदिवस काल रविवार दि 8 रोजी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कराड शहराचे उभरते नेतृत्व व युवकांचे आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे...त्यांच्याविषयी थोडक्यात...  

नगरसेवक सौरभ पाटील हे त्यांच्या वक्तृत्व व अभ्यासू स्वभावामुळे पहिल्यांदाच निवडून येऊन देखील शहरातील लोकप्रिय नगरसेवक म्हणून  सर्वपरिचित झाले आहेत.वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची व विषयाला पारखून त्याचे विश्लेषण करण्याची त्यांची खासियत आहे.कार्यकर्त्यांना बळ देण्याचा त्यांच्या हातखंडा आहे. निष्ठवंत कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे मोठी फौज आहे. एकूणच शहराला त्यांच्या रूपाने एक परिपक्व व वैचारिक युवा नेतृत्व मिळाले आहे त्यामुळे, ते सर्वांचे आशास्थान आहेत हेही यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. 
सौरभ पाटील यांचा वाढदिवस काल साजरा झाला. त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येकजण त्यांचे अभिनंदन करताना दिसत होता.विशेष म्हणजे त्यांच्या विरोधकांनीदेखील त्यांचे भरभरून स्वागत करत अभिनंदन केलेले काल शहराने पाहिले. सौरभ पाटील यांच्या संस्कारित स्वभावगुणांमुळे त्यांची शहरात सभ्य राजकारणी म्हणून प्रतिमा आहे. शहरात असणाऱ्या अनेक सोशल मीडियावर काल फक्त त्यांचाच वाढदिवस साजरा होत होता हे वैशिठ्य म्हणावे लागेल. 
ते पालिकेत रोज सकाळी नियमितपणे आपल्या दालनात हजर राहून येणाऱ्या प्रत्येकाचे कोणतेही काम असेल तर ते करण्याचा प्रयत्न करत असतात.केवळ आपल्या वार्डातीलच नव्हे,तर संपूर्ण शहरातील कामे करण्यात ते आपला इंटरेस्ट दाखवतात. शहरातील विविध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ते नेहमीच अग्रेसर दिसतात. त्यांच्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वृत्तीचे सर्वदूर कौतुक होत असते.कोणताही बडेजाव नाही. पुढारपणाचा आव नाही.सर्वसामान्य जनतेबरोबर राहून त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपत ते आपल्या पहिल्याच राजकीय इनिंग मध्येच प्रत्येकाला "आपला माणूस' वाटणारे नेतृत्व म्हणून शहरातुन आता पुढे येऊ लागले आहेत. 
लॉक डाऊन पिरियड मध्ये त्यांनी अनेक गरजुना कोणताही गाजावाजा न करता भरभरून मदत केली आहे.लाघवी बोलणे,मृदु स्वभाव वैचारिकतेकडे झुकते माप, आणि समोरच्याला माणूस म्हणून समजून घेण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याकडे एक परिपक्व नेता म्हणून शहरातील युवक मोठ्या आशेने पाहत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून काल त्यांच्या वाढदिनी त्यांच्या सहकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेच...पण विरोधक व  वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. ही कौतुकास्पद बाब काल सर्वानाच पहायलाही मिळाली, त्यामुळे खऱ्या अर्थाने  राजकारणापलीकडे जाऊन आपलासा वाटणारा नेता तात्यांच्या रूपाने शहराला मिळाला आहे, शहरातील युवकांचे ते आशास्थान बनले आहेत...
आपुलकीचे नाते जपणाऱ्या तात्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... 

No comments:

Post a Comment