Sunday, November 22, 2020

पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध - आ पृथ्वीराज चव्हाण

कराड : राज्यात पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणूक सुरु आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर हे दोघेही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत्या 28 नोव्हेंबरला वर्षपूर्ती करीत आहे. वर्षभरातच राज्य सरकारला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला त्यातूनही ह्या सरकारने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय असो, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पॅकेज असो तसेच कोरोनाच्या परिस्थितीत राज्यातील जनतेला वेळोवेळी सुविधा देण्यात राज्य सरकार अग्रभागी होते. अश्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले आहेत. याचप्रमाणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडून दिल्याने पक्षाची संपूर्ण ताकद त्या आमदाराच्या मागे असते व आता तर तीन पक्षाचे आपले महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यामुळे शिक्षकांचे, संस्था चालकांचे व पदवीधरांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न महाविकास आघाडी सरकार सोडविण्यास कटिबद्ध असेल असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मलकापूर (ता. कराड) येथे पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिला. यावेळी राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, जेष्ठ नेते रघुनाथराव कदम, रयत सह साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर, किरण लाड, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अजितराव पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण, विठ्ठलराव शिखरे, महेंद्र भोसले, नंदकुमार पालकर आदी पदाधिकारी तसेच पदवीधर व शिक्षक मतदार उपस्थित होते. 

याप्रसंगी आ पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले कि, पक्षीय पातळीवर पहिल्यादाच ही निवडणूक होत आहे. पक्षाची ताकद मागे असल्याने पदवीधर व शिक्षकांच्या प्रतिनिधींना पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ताकद मिळेल यासाठीच सुज्ञ शिक्षक व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्यावेत असे आवाहन या निमित्ताने करतो. 

याप्रसंगी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले कि, पदवीधरांचे व शिक्षकांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. त्याच्या सोडवणुकीचा प्रयत्न त्यांच्या प्रतिनिधींनी करणे गरजेचे असते परंतु असे प्रयत्न याआधी कधीही झाले नाहीत त्यामुळेच पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणूनच पदवीधर व शिक्षक मतदारांना माझे कळकळीचे आवाहन आहे कि, कोणीही उमेदवार येऊन मीच पक्षाचा, संघटनेचा अधिकृत उमेदवार आहे असे भासवू शकतो अश्या भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पदवीधर साठी अरुण लाड, तर शिक्षक साठी जयंत आसगावकर यांनाच प्रथम क्रमांकाचे पसंती मत देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे. 

यावेळी  अ‍ॅड. उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, किरण लाड अजितराव पाटील आदींची भाषणे झाली. 
--------------------------------------

No comments:

Post a Comment